पिंपरी | रुग्णालयांसह औद्योगिक कंपन्यांचे फायर ऑडिट करा

पिंपरी, (प्रतिनिधी) – वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रुग्णालयांसह अन्य आस्थापने व औद्योगिक कंपन्यांचे आणि वाणिज्य वापराचे ठिकाणी तातडीने फायर ऑडिट करण्याची मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना त्याबाबातचे लेखी निवेदन त्यांनी दिले. त्यामध्ये सावळे यांनी म्हटले की, मार्च महिन्यापासूनच उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. … Read more

पिंपरी | सरकारी कार्यालयांचे सेफ्टी ऑडिट करा

पिंपरी, (प्रतिनिधी) – राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील सरकारी कार्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांचे सेफ्टी ऑडिट करण्यात यावे. तसेच कार्यालयाबाहेर सेफ्टी व फायर ऑडिट झाल्याचे प्रमाणपत्र लावण्यात यावे. अशी मागणी कृषी, पर्यावरण, शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेचे अध्यक्ष सुरज गजानन बाबर यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे केली आहे. याबाबत बाबर यांनी आयुक्तांना … Read more

‘वर्दळीच्या भागांचे तातडीने फायर ऑडिट करा’, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे पालिकेला आदेश

पुणे – टिंबर मार्केटला आग लागल्याची घटना ताजी असतानाच; सोमवारी पुन्हा 4 घटना घडल्या. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने वर्दळीच्या आणि अरुंद बाजारपेठा असलेल्या भागांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. याबाबत मनपा आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, “आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे दाटवस्ती तसेच वर्दळीच्या दाट भागांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. या … Read more

पुणे जिल्ह्यातील सरकारी, खासगी कोव्हीड रुग्णालयांचे फायर ऑडीट करण्याचे आदेश

पुणे : ऑक्सिजनगळतीमुळे नाशिक येथे घडलेल्या दुर्घटनेचे गाभिर्य लक्षात घेता, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सरकारी, खासगी कोव्हीड रुग्णालयांचे फायर ऑडीट करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. नाशिकच्या दुर्घटनेनंतर राज्यातील विविध रुग्णालयांच्या फायर ऑडीट तसेच ऑक्सिजन प्लांटचे तांत्रिक तपासणी करण्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. राज्य सरकारने त्याबाबत निर्देश जारी केले … Read more

फायर ऑडिटची माहिती 21 जानेवारीपर्यंत द्या : आरोग्य आयुक्‍तांचे आदेश

भंडारा येथील रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सूचना पुणे – भंडारा येथील रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपकरणे आणि कार्यप्रणाली कार्यान्वित असण्याबाबत दक्षता घेण्यात यावी आणि गेल्या 5 वर्षांत झालेल्या फायर अपघात आणि केलेल्या उपाययोजनांची माहिती 21 जानेवारीपर्यंत पाठवावी, असे आदेश राज्याचे आरोग्य आयुक्‍त डॉ. रामास्वामी एन. यांनी सर्व जिल्ह्यांना दिले आहेत. आरोग्य … Read more

भंडारा अग्नितांडव : ‘त्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही’

मुंबई – भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून त्यात १० नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेवर सर्वच स्तरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती घेण्याबरोबरच घटनेच्या चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यावर टीका करताना निलेश राणे म्हणाले कि, भंडारा जिल्हा … Read more

कोविड रुग्णालयांचेही फायर ऑडिट आवश्‍यक – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – देशभरात करोनाचा संसर्ग वाढल्यानंतर रुग्णांवर उपचार करण्यासाठी काही ठिकाणी स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्यात आले, तर काही रुग्णालयांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले. अशा सर्व कोविड रुग्णालयांचेही फायर ऑडिट करून घ्यावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना दिले आहे. तसेच यासंदर्भात चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा … Read more

शाळांचे अग्निरोधक लेखापरीक्षण करा

पुणे – सुरत येथील खासगी शिकवणी वर्गाच्या इमारतीच्या लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आणि खासगी संस्थांच्या शाळांचे स्थापत्य, वीज आणि अग्निरोधक यंत्रणेचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी दिले आहेत. याबाबत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालकांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिले आहेत. मंगळवारी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. … Read more

पुणे – रस्त्यावरील हॉटेल्‌समध्येही सुरक्षेचा अभाव

स्वच्छता आणि सुरक्षेचे मानंकन पाळले जात नसल्याचे पाहणीतून समोर पुणे – स्विट मार्ट प्रमाणे शहरातील छोटे हॉटेल व्यावसायिक आणि रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते सुद्धा स्वच्छता आणि सुरक्षेचे मानंकन पाळत नसल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे स्वीट मार्टमधील भटारखाने सोसायटीमधील बॉम्ब असतील; तर रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे रस्त्यावरील बॉम्ब असेच म्हणावे लागेल. पुणे शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये स्वीट मार्टची दुकाने … Read more

पुणे – ‘त्या’ क्‍लासचालकांवर कारवाईची जबाबदारी कोणाची?

असुरक्षित कोचिंग क्‍लासेस : विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्‍यात पुणे – शहराच्या मुख्य व उपनगर भागातील खासगी क्‍लासचालक शालेय विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क वसूली करतात. मात्र आगीसह इतर घटनांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी क्‍लासचालकांकडून कोणत्याही उपाययोजना राबविल्या जात नाहीत. या क्‍लासचालकांवर कारवाई कधी होणार व कोण करणार? असा प्रश्‍न सध्या उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. सुरतमधील कोचिंग क्‍लासेसच्या … Read more