South Korea : सिओलमध्ये भीषण आग; 60 हून अधिक घरे जळून खाक तर 500 लोक…

सिओल, – दक्षिण कोरियाची राजधानी सिओलमधील झोपडपट्टी भागातील गुर्योंग गावात आज सकाळी आग लागली. या भीषण आगीत 60 हून अधिक घरे जळून खाक झाली तर 500 लोकांना त्यांच्या घरातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, या घटनेत किती जणांचा मृत्यू झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अग्निशमन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, परिसरात आग लागताच लोकांमध्ये घबराट पसरली, … Read more

लग्नाची तयारी सुरु असताना अचानक लागली आग; 5 जणांचा मृत्यू

मोरादाबाद – उत्तर प्रदेशमध्ये लग्नस्थळी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या मोरादाबाद येथे लग्नाची तयारी सुरू असता अचानक इमारतीला आग लागली. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असून, सात जण गंभीर जखमी झाले आहे. लग्न असलेली इमारत ही तीन मजल्याची होती. या इमारतीला आग लागल्याची माहित मिळाताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे पाच बंब … Read more

गाढ झोपेतच काळाचा घाला; मध्यप्रदेशमध्ये घराला भीषण आग लागून सात जणांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील इंदौर शहरात आज पहाटेच एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शहरातील स्वर्णबाग कॉलनीत एका दुमजली घराला भीषण आग लागून सात जणांचा  होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. आग लागली त्यावेळी या घरात राहणारे लोक गाढ झोपेत होते, बहुतेकांचा झोपेत भाजल्याने आणि गुदमरून … Read more

बाणेर येथील रेनॉल्ट सर्व्हिस सेंटरला भीषण आग; पाच गाड्या भस्मसात

पुणे – बाणेर येथील रेनॉल्ट सर्व्हिस सेंटरला भीषण आग लागली. मध्यरात्री तीनच्या सुमारास ही आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशामन दल तातडीने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. या आगीत ५ चारचाकी वाहने आणि इतर साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

पुणे : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संस्थेला भीषण आग

पुणे – सदाशिव पेठ येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संस्थेला भीषण आग लागली आहे. भंगाराच्या साहित्याला आग लागली असल्याचे समोर येत आहे. याची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

येरवड्यातील नेताजी हायस्कूलच्या रेकॉर्ड रूमला आग

येरवडा – येरवडा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या रेकॉर्ड रूमला सकाळी आग लागली. यामध्ये सर्व कागदपत्रे जाळून खाक झाली आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली. माहितीनुसार, सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शाळेच्या शिपाई वैशाली काशीद या शाळेत हजर झाल्यानंतर इमारतीवरील सर्व मजल्यांची पाहणी करीत … Read more

यवत येथे खाद्यतेल गोदामाला भीषण आग

यवत – दौंड तालुक्यातील यवत येथे ‘तांबोळी इंटरप्राईजेस’ नावाच्या खाद्यतेल व आदी वस्तूंच्या गोदामाला आग लागल्याची घटना आज (दि.२३) मार्च रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत तांबोळी इंटरप्राईजेसचे मालक आरीफ अब्दुलभाई तांबोळी (वय ४५ वर्षे, ता. दौंड) यांचे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. … Read more

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; कार जळून खाक

पेठ – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एका कारने अचानक पेट घेतल्यामुळे ही कार जळून खाक झाली. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कार चालक बचावला आहे.   माहितीनुसार, पेठ (ता. आंबेगाव) बायपास रस्त्यावर हॉटेल आदित्य तारा जवळ टाटा जेस्ट गाडीने अचानक पेट घेतला. गाडी मालक प्रदीप सोमवंशी (रा. भोसरी) यांना गाडीच्या डॅश … Read more

बारामती न्यायालय परिसरात अचानक लागली आग

आग वेळीच आटोक्यात आल्याने अनर्थ टळला बारामती (प्रतिनिधी) : शहरातील भिगवण रोड लगत असलेल्या जिल्हा सत्र न्यायालय परिसरात अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. बारामती नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने वेळेत येऊन आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. बारामती जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात असलेल्या झाडांना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. हे चित्र पाहून कार्यालयीन अधिक्षक … Read more

रास्ता पेठेतील बिल्डिंगला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 6 गाड्या दाखल 

पुणे – रास्ता पेठेतील मद्रासी गणपतीजवळील एका बिल्डिंगला भीषण आग लागली आहे. मध्यरात्री 3 वाजता ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्यांच्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. परंतु, या आगीत 3 फ्लॅट व 2 दुकाने जळाली असून 1 चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.  दरम्यान, … Read more