Pune : गॅलरीच्या लोखंडी जाळीत अडकले होते 1 वर्षाचे बाळ; अग्निशमन दल जवानांनी केली सुखरूप सुटका

पुणे – लोखंडी जाळीत अडकलेल्या चिमुकल्याची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली आहे. शुक्रवारी (17 नोव्हेंबर)  सिहंगड कॉलेज रस्यावर हिंगणे खुर्द, राजश्री सोसायटीत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक लहान बाळ अडकल्याची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळाली होती. त्यानंतर सिहंगड अग्निशमन केंद्र येथून तातडीने अग्निशमन वाहन रवाना झाले आणि त्यांनी चिमुकल्याची सुटका केली. घटनास्थळी पोहोचताच जवानांना … Read more

Pune | विहीरीत पडलेल्या महिलेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचविले प्राण

पुणे : सोमवार पेठेतील पेशवेकालीन दांडेकर वाड्यातील विहिरीमध्ये पाय घसरुन पडलेल्या महिलेला अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत मदत करुन तिचे प्राण वाचविले. सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजता ही घटना घडली. या महिलेची प्रकृती आता स्थिर असून तिच्यावर के ई एम रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी सांगितले की, सोमवार पेठेत दांडेकर … Read more

अग्निशामक दलाचे जवान ठरले “देवदूत’

पिंपरी (प्रतिनिधी) – प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या पिंपरीच्या खराळवाडी भागात शनिवारी (दि. 16) सकाळी एक गाय ड्रेनेजमध्ये अडकली होती. नागरिकांच्या मदतीने अग्निशामक दलाने गायीला सुखरूपरित्या बाहेर काढले. मात्र अग्निशामक दलाच्या “देवदूत’ नावाच्या वाहनातून आलेले जवान त्या गायीसाठी “देवदूत’ ठरल्याची चर्चा शहरात सुरू आहे. , अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 11.10 वाजताच्या सुमारास खराळवाडी येथील सोनरुपा अपार्टमेंट नजीक सार्वजनिक शौचालयाजवळील ड्रेनेजच्या चेंबरमध्ये गाय अडकली असल्याची माहिती मुख्य अग्निशमन केंद्रास मिळाली. त्यानुसार अग्निशामक दलाच्या “देवदूत’ या वाहनातून अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. काही स्थानिक नागरिक गाईला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. खराळवाडी प्रतिबंधित परिसर असल्याने अग्निशामक दलाने घटनास्थळावरील अनावश्यक गर्दी कमी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर गायीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी ड्रेनेज चेंबरच्या कडेच्या तुटलेल्या लोखंडी सळया आणि सिमेंट बाजूला केले. दोन रेस्क्यू बेल्ट गाईच्या पोटाशी अडकवण्यात आले. ते बेल्टचे लूप मजबूत बांबूमध्ये अडकवून अग्निशमन कर्मचारी आणि घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी एकत्रितपणे गाईला सुखरूप बाहेर काढले.

वाॅर्नच्या कॅपची कोटींची उड्डाणे; ऑस्टोलियातील आगपीडितांना मदत

सिडनी : ऑस्टोलियातील  भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या तसेच त्याची झळ पोहोचलेल्या पीडितांच्या मदतीसाठी महान गोलंदाज शेन वाॅर्न याने केलेली मदत संपूर्ण क्रीडाक्षेत्रासाठी डोळ्यात अंजन घालणारी ठरली. वाॅर्नच्या बॅगी ग्रीन कॅपचा लिलाव आज या पिडीतांच्या मदतनिधीसाठी झाला त्यात जवळपास ५ कोटी रूपयांची उभारणी झाली. Thankyou so much to everyone that placed a bid & a huge … Read more