#SriLankaFloods : श्रीलंकेतही अतिवृष्टीचे सावट; आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू तर 19 हजाराहून अधिक लोक…

कोलोंबो – श्रीलंकेत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. आठवड्याच्या शेवटी किमान १५ लोक ठार झाले आणि ५ हजाराहून अधिक कुटुंबांतील १९ हजाराहून अधिक लोक बाधित झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. राजधानी कोलंबोसह सात जिल्ह्यांमधून मृत्यूची नोंद झाली आहे. तेथे ३०० मिमी पेक्षा जास्त मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला, झाडे उन्मळून पडली, … Read more

Saudi Arabia : सौदी अरेबियामध्ये पूराचे थैमान; 2 जणांचा मृत्यू

जेद्दाह :- सौदी अरेबियामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरामध्ये आतापर्यंत दोघाजणांचा मृत्यू झाला आहे. तर पूरामुळे राजधानी जेद्दाहमधील वाहनेही वाहून जाऊ लागली आहेत. गुरूवारी सौदीमध्ये तब्बल 965 मि.मी. पाऊस झाला होता. सौदीतील पावसाच्या वार्षिक सरासरीपेक्षाही हा पाऊस जास्त आहे. या पावसाची संततधार अद्यापही सुरूच आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अद्याप कोणताही … Read more

48 तासांनंतर पाणीपुरवठा

पुणे – आंबील ओढ्याला आलेल्या पुरामुळे महापालिकेच्या पद्मावती जलशुद्धीकरण केंद्रात पावसाचे पाणी घुसले होते. त्यामुळे या जलकेंद्रातून तब्बल पाच पुणेकरांना केला जाणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. अखेर हा पुरवठा अवघ्या दोन दिवसांत सुरळीत करण्यात महापालिकेला यश आले आहे. या जलकेंद्रातील मोटारी बदलून तसेच इतर अत्यावश्‍यक कामे करण्यासाठी प्रशासनाने 5 दिवसांचा कालावधी निश्‍चित केला होता. मात्र, … Read more

कॅन्टोन्मेंट हद्दीत पावसाचे पाणी जिरण्याची योजनाच नाही

पुणे – स्मार्ट कॅन्टोन्मेंट मानल्या जाणाऱ्या पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्त्यांभोवती पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी कोणतीच सुविधा नसल्याने अनेकदा पावसाचे पाणी साचून राहते. बरेचदा ही परिस्थिती इतकी वाईट असते, की नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते. याचा फटका वारंवार बसत असून, यावर सक्षम उपाय करण्याची मागणी होत आहे. सिमेंटचे चककीत रस्ते, दुतर्फा असलेली हिरवळ आणि साफसफाई…पुणे … Read more

पाऊस रेंगाळणार

पुणे – यंदा भरभरून देणाऱ्या मोसमी पावसाचा मुक्‍काम आणखी वाढणार आहे. साधारणत: सप्टेंबरअखेर भारतातून परतणाऱ्या मान्सूनचा प्रवास यंदा 5 ऑक्‍टोबरनंतर सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर मान्सून पूर्णपणे देशाबाहेर 15 ऑक्‍टोबर नंतरच जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. देशात मान्सूनचा मुक्काम चार महिन्यांचा असतो. सप्टेंबरअखेर मान्सून केरळमार्गे परततो, पण, यंदा हा प्रवासच सुरू झालेला नाही. राजस्थानातून … Read more

उत्तराखंडमध्ये ढगफुटी, ३ घरांचे नुकसान

उत्तराखंड – चामोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यात आता ढगफुटी आणि भूस्खलनामुळे अनेक घरांच नुकसान झाल आहे. चामोली जिल्ह्यात शनिवारी रात्री ३ घरांचे नुकसान झाले असून २ घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. या भागातील लोकांना सध्या सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चामोरी जिल्ह्याचे दंडाधिकारी … Read more