Coronavirus: चीनमधून येणाऱ्या फ्लाइटमधील निम्म्या प्रवाशांना कोरोनाव्हायरसची लागण; सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

मिलान (इटली) – बिजिंग, चीनहून इटलीतील मिलान शहरात जाणाऱ्या विमानातील निम्म्या प्रवाशांना करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यामुळे चीनमधून इतर देशांमध्ये करोना पसरण्याचा धोका आणखी वाढला आहे. या कारणास्तव भारत आणि अमेरिकेसह सात देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना विमानात चढण्यापूर्वी कोविड निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणे बंधनकारक केले आहे. चीनहून मिलानला जाणाऱ्या दोन फ्लाइटमध्ये … Read more

इंडिगो विमानाची कराचीत एमर्जन्सी लँडिग; जाणून घ्या काय आहे कारण?

नवी दिल्ली :  संयुक्त अरब अमिरातीतील शारजाहहून हैदराबादला येणारं इंडिगो विमान आज सकाळी पाकिस्तानातील कराचीला वळवण्यात आल्याची घटना घडली आहे.  संबंधित विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे विमान कराचीला उतरवले असल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली असल्याचेही म्हटले आहे. इंडिगो कंपनीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात,“शारजाहहून हैदराबादला येणारी इंडिगो फ्लाइट 6E-1406 पाकिस्तानातील कराचीला … Read more

बिहारमधून उड्डाणानंतर विमानाने घेतला पेट; सर्व प्रवासी सुखरुप

पाटणा – पाटण्यावरून दिल्लीला निघालेल्या एका विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेचच पेट घेतल्याची घटना आज घडली. विमानाला आग लागल्याचे लक्षात आल्यावर हे विमान तातडीने उतरवण्यात आले आणि विमानातीलसर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्पाईसजेट कंपनीच्या या विमानामध्ये 200 प्रवासी होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर लगेचच विमानाला आग लागल्याचे अधिकाऱ्यांना समजले. विमानतळाच्या शेजारील फुलवारी शरीफ … Read more

रात्रीच्या वेळी उड्डाणापूर्वी होणार विमानांची तपासणी

स्पाईसजेटच्या दुर्घटनेनंतर डीजीसीएची घोषणा मुंबई – स्पाइसजेटच्या मुंबई-दुर्गापूर विमान प्रवासादरम्यान उघडकीस आलेल्या घटनेवर विमान वाहतूक नियामक मंडळ कठोर झाले आहे. ही घटना डोळे उघडवणारी असल्याचे सांगत डिसीजीएने घोषणा केली, की आता विमानांची रात्री उड्डाणापूर्वी तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी दरम्यान विमानांमध्ये काही खराबी आढळून आल्यास ते विमान उड्डाण करू शकणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले … Read more

मुंबई-दुर्गापूर विमानाला खराब हवामानाचा फटका; 40 प्रवासी गंभीर जखमी; पहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

मुंबई : मुंबई वरून पश्चिम बंगालच्या दुर्गापूरकडे जाणाऱ्या स्पाईस जेट कंपनीच्या विमानाला वादळाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, या वादळामुळे जवळपास 40 प्रवासी जमखी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. B737 मॅक्स या स्पाईस जेटच्या विमानात हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. मुंबईवरून निघालेल्या विमानाचे पश्चिम बंगलाच्या दुर्गापरू जिल्ह्यातील काढी नझरुल इस्लाम … Read more

Video | माईक टायसनची पुन्हा सटकली; सहप्रवाशाला ठोसे मारुन केले जखमी

फ्लोरीडा – जागतिक मुष्टियोद्धा व माजी विजेता खेळाडू माईक टायसन याच्या रागाचा फटका विमान प्रवासासाठी दाखल झाल्याच्या दरम्यान एका सहप्रवासी व्यक्तीला बसला. टायसनची इच्छा नसताना त्याच्याशी सतत बोलण्याचा प्रयत्न करत असेलल्या व्यक्तीला टायसनने ठोसे मारुन जखमी केले. यानंतर विमानातील क्रुसह अन्य काही व्यक्तींनी टायसनला त्याच्यापासून दूर नेले. मात्र, टायसनचा राग इतका अनावर झाला की त्याने … Read more

भारत-अमेरिका विमानसेवा पुन्हा होणार सुरु

नवी दिल्ली – भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या विमानांची सेवा 21 जानेवारीपासून म्हणजेच शुक्रवारपासून पूर्ववत होईल, अशी घोषणा एअर इंडियाने केली आहे. बोईंग बी या विमानाची निर्मिती करणाऱ्या कंपनीने विमानसेवा सुरु करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला असून टेक ऑफ आणि लॅंडिंगमधील अडथळे दूर झाले असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अमेरिकेत आणि भारतात दोन्हीकडे अडकून पडलेल्या प्रवाशांना आता … Read more

आंतरराष्ट्रीय विमानांमुळे करोनाबाधित संख्येत वाढ

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय विमानांचे आगमन सुरूच आहे. त्यामुळे करोनाबाधित संख्येत वाढ होत आहे, असा दावा दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी बुधवारी केला. त्यातून त्यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचे मानले जात आहे. मागील काही दिवसांपासून दिल्लीतील करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. त्यासाठी आपचे नेते जैन यांनी आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांना जबाबदार धरले. … Read more

मोदींची लालबहादूर शास्त्रींशी तुलना तर राहुल गांधींचा सामोसे खातानाचा फोटो प्रचंड व्हायरल; चर्चांना उधाण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत. त्यामुळेच मोदी जेव्हा एखादी गोष्ट किंवा फोटो पोस्ट करतात तेव्हा त्याची चर्चा जगभरामध्ये होते. सध्या असेच चित्र पहायला मिळत आहे मोदींनी अमेरिकेसाठी उड्डाण केल्यानंतर एअर इंडिया वनमधून पोस्ट केलेल्या एका फोटोची. विशेष म्हणजे मोदींनी हा फोटो पोस्ट केल्यानंतर … Read more

अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस करणार अंतराळ प्रवास; २० जुलैला भरणार उड्डाण

वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये  ज्यांचा  सहभाग आहे असे अ‌ॅमेझॉनचे उद्योगपती जेफ बेजोस हे पुढील महिन्यात अंतराळची सैर करणार आहेत. बेजोस  आपली कंपनी ‘ब्लू ओरिजिन’च्या पुढच्या महिन्यात संचालित होणाऱ्या पहिल्या मानवी अंतराळ उड्डाणातून प्रवास करणार आहे. इंस्टाग्रामवर सोमवारी जेफ बेजोस यांनी याविषयीची माहिती दिली. जेफ बेजोस  यांनी, “त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ आणि लिलावातील एक विजेता … Read more