PUNE: फुल बाजारातही उत्सव; श्रीराम सोहळ्यामुळे मागणी

पुणे – श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. मंदिर सजावट, तसेच घरगुती ग्राहकांकडून फुलांना मागणी वाढल्याने फुले महागली आहेत. सध्या गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीप्रमाणे फुलांना मागणी असल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड फूल बाजारातील फूल व्यापारी सागर भाेसले यांनी सांगितले. मार्गशीर्ष महिन्यात लग्नसराई, तसेच दर गुरुवारी महिलांकडून श्री महालक्ष्मी व्रत केले जात असल्याने … Read more

सातारा : बळीराजाच्या फुलांना मिळाली सोनेरी झळाली

लक्ष्मीपूजनादिवशी झेंडूच्या फुलांना चांगला भाव; शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण कराड – दिवाळी सणातील लक्ष्मीपूजनला मोठे महत्त्व आहे. यानिमित्त आपल्या विविध व्यवसाय, उद्योगांच्या ठिकाणी, तसेच घरगुती लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. येथील बाजारपेठेत लक्ष्मीपूजना दिवशी झेंडूच्या फुलांचा दर गगनाला भिडले होते. बळीराजावर लक्ष्मीची कृपा झाल्याचे झेंडूच्या फुलाला सुवर्ण झळाली मिळाल्याचे पाहायला मिळाले. येथील शिवतीर्थ दत्त … Read more

सणासुदीला शेवंतीचे भाव तेजीत

जुन्नर – सर्वत्र नवरात्री उत्सव सुरू असून शेवंतीसह विविध फुलांना मोठी मागणी होत आहे. आजमितीस मुंबई बाजारात 100 ते 120 प्रतिकिलो पर्यंत बाजारभाव मिळत असून येत्या दसऱ्यापर्यंत आणखीन बाजार वाढतील, अशी माहिती कुसुर येथील युवा शेतकरी सुधीर बोचरे यांनी दिली. सध्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या कुसुर, वडज, निरगुडे तसेच निमगाव, सावरगाव, गुंजाळवाडी आदी परिसरात शेवंती, … Read more

फुलांना बहर; मागणी अन्‌ दरही वाढले

पिंपरी – नवरात्रीच्या उत्सवामुळे फुलांना बहर आला असून मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याच बरोबर दरही वाढले आहे. मावळ व पिंपरी चिंचवडच्या उपनगरांतून फुलांची आवक सुरू झाली आहे. सध्या बाजारात मावळ परिसरातून तिळाची फुले विक्रीसाठी येत असून किरकोळ बाजारात 10 ते 20 रुपयांना वाट्याने ही फुले विकली जात आहेत. गणेशोत्सवानंतर सुरू झालेल्या पितृपक्षात फुलांना मागणी घटली … Read more

‘कारवीची तऱ्हाच न्यारी, यंदा कासवर दर्शन हाय भारी’

पुणे – “कारवीची तऱ्हाच न्यारी, यंदा कासवर दर्शन हाय भारी’ अशा कारवीच्या निळ्या फुलांनी “कास पठार’ यंदा फुलणार आहे. “कास पठार’ ला महाराष्ट्राची “व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ समजले जाते. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात हे खडकाळ असलेले 1750 हेक्‍टर पठार कोट्यवधी फुलांनी बहरून जाते. अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुलांचे जणू गालिचेच या ठिकाणी पसरलेले असतात. यंदा मात्र स्पेशल “कारवी’चा हंगाम … Read more

माणदेशी : फुले, पूजा साहित्याच्या व्यवसायातून तृप्ती भोसले यांना मिळाली स्थिरता

श्रीकांत कात्रे कोणताही व्यवसाय छोटा मोठा नसतो. कापड दुकानाचा व्यवसाय करणाऱ्या तृप्ती भोसले यांनी फुले व पूजा साहित्य विक्रीचा जोडधंदा सुरू केला. नंतर त्यांच्या कल्पकतेने व कष्ट करण्याच्या तयारीमुळे फुले व पूजा साहित्याचा व्यवसाय मुख्य बनून गेला. महिलांना काम देण्याच्या विचारातून जिद्द आणि मेहनतीने त्यांनी हा व्यवसाय वाढवला. स्वतःच्या कुटुंबाला आर्थिक स्थिरता देताना इतर महिलांनाही … Read more

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पुणे मार्केट यार्डात 21 टन फुलांची आवक

पुणे- दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि. 4) मार्केट यार्डात 690 वाहनांमधून तब्बल 21 टन फुलांची आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली. फुल महोत्सव सुरू असल्याने खरेदीदारांसह घरगुती ग्राहक मोठ्या संख्येने मार्केट यार्डात येत होते. आवक इतकी मोठी असल्याने शिवनेरी रस्त्यावर गाड्या लावून काही प्रमाणात विक्री करण्यात आली. सर्वाधिक मागणी झेंडूला आहे. सकाळी … Read more

साई मंदिर प्रवेशद्वारावर राडा!

शिर्डी – शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक आणि फुल विक्रेत्यांमध्ये झटापट झाली. साई मंदिरात हार, फुले आणि प्रसादावर बंदी घालण्यात आली आहे. याविरोधात मंदिर परिसरातील हार, फुल आणि प्रसाद विक्रेते आक्रमक झाले. त्यांनी आंदोलन करून हार, फुले प्रसादावरील बंदी उठवण्याची मागणी विक्रेत्यांनी केली. गेल्या 10 महिन्यांपासून ही बंदी घालण्यात आली आहे. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी … Read more

पुण्यात मटार, फ्लॉवर, घेवडा स्वस्त, फळभाज्यांची आवक वाढली

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 7 -पावसाने उघडीप घेतल्यामुळे मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. त्यामुळे फ्लॉवर,मटार आणि घेवड्याच्या भावात घट झाली आहे. तर मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिले आहेत. येथील बाजारात रविवारी (दि.7) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 100 ट्रक फळभाज्यांची आवक … Read more

Pune : धुलिवंदनानिमित्त सोमवारी मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, फुले, केळी आणि पान विभाग बंद

पुणे, दि. 26 – सोमवारी (दि.29) धुलिवंदन आहे. या दिवशी दरवर्षीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, फुल, केळी आणि पान बाजार बंद असतो. त्यानुसार यंदाही बंद राहणार आहे. तरीही शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणू नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसचिव सतिश कोंडे यांनी केले आहे.