“भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी”

मुंबई – भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिमन्यूसारखे चक्रव्युहात अडकवल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते तथा माजी मंत्री सुरेश नवले यांनी केला आहे. भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. सुरेश नवले एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, भाजपने खासदार भावना गवळी, हेमंत पाटील व कृपाल तुमाने यांचा बळी दिला आहे. भाजपच्या भट्टीत … Read more

पाकचे माजी मंत्री शेख रशिद यांना अटक ! ९ मे रोजीच्या दंगलीतील सहभागाचा ठपका

नवी दिल्ली – पाकिस्तानचे माजी गृहमंत्री आणि आवामी मुस्लिम लीग पक्षाचे प्रमुख शेख रशिद यांना आज गेल्यावर्षी ९ मे रोजी झालेल्या दंगली प्रकरणी अटक करण्यात आली. रशिद यांच्यावर ९ मे रोजीच्या दंगली संदर्भात एकूण १४ कायदेशीर प्रकरणे दाखल आहेत. त्यासंदर्भातील जामिनासाठी ते आज दहशतवाद विरोधी न्यायालयामध्ये हजर झाले होते. त्यांना १४ पैकी १३ प्रकरणांमध्ये जामीन … Read more

ईडीची मोठी कारवाई ! जम्मू-काश्‍मीरच्या माजी मंत्र्याला अटक ‘जाणून घ्या’ नेमकं प्रकरण काय ?

नवी दिल्ली – जम्मू-काश्‍मीरचे (Jammu and Kashmir) माजी मंत्री चौधरी लाल सिंह (Chaudhari lal singh) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली. मनी लॉण्डरिंग प्रकरणी ती कारवाई करण्यात आली. डोग्रा स्वाभिमान संघटन पक्षाचे अध्यक्ष असणारे सिंह एका शैक्षणिक ट्रस्ट विरोधातील प्रकरणावरून ईडीच्या रडारवर आले होते. त्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर त्यांना अटक … Read more

“राऊत, नार्वेकरांनी बाजारू राजकारण आणले”; माजी राज्यमंत्री शिवतारे यांचा घणाघात

सासवड – राज्यसभा खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनी हवेलीत पैसे घेतले आणि नगरपापालिका निवडणुकीत चुकीच्या माणसाला तिकीट दिले. बाजारू राजकरण कुणी आणले असेल तर त्यांनी आणले, अशी टीका माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने सात्विक राजकरण आले आहे, अशी सुस्तीसुमनेही त्यांनी उधळली. सासवड … Read more

पंजाब कॉंग्रेसमधील चार नेते भाजपमध्ये दाखल; माजी मंत्र्याचाही समावेश

चंदिगड  – पंजाब कॉंग्रेसमधील चार मोठ्या नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. राजकुमार वेरका, बलबीर सिंग सिद्धू, सुंदर शाम अरोरा आणि गुरप्रीत सिंग कांगार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बामला येथील कॉंग्रेसचे माजी आमदार केवल धिल्लन आणि शिरोमणी अकाली दलाचे माजी आमदार सरुप चंद सिंगला आणि मोहिंदर कौर जोश यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग … Read more

पंजाबमधील माजी मंत्र्याचा भाजपला रामराम; एसएडीमध्ये प्रवेश

चंडिगढ – पंजाबमधील माजी मंत्री मदनमोहन मित्तल यांनी शनिवारी शिरोमणी अकाली दलात (एसएडी) प्रवेश केला. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपला हादरा बसला. आनंदपूर साहिब मतदारसंघातून मुलाला भाजपची उमेदवारी मिळवून देण्यास मित्तल प्रयत्नशील होते. मात्र, मुलाला उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या मित्तल यांनी भाजपला रामराम ठोकला. त्यांनी एसएडीचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्या उपस्थितीत त्या पक्षाचे … Read more

माजी मंत्री खोतकरांनी बाजार समितीतही घोटाळा केला; सोमय्या यांचा आरोप

जालना- शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या घोटाळ्याची कॉपी केली आहे. बाजार समितीतही घोटाळा केला. तसेच अजून दोन भूखंडांचे घोटाळे माझ्यासमोर आले आहेत, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. अर्जुन खोतकर प्रकरणात युती, आघाडी वा सत्तेचा प्रश्न येत नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ही चौकशी सुरु झाली आहे. उद्धव … Read more

माजी मंत्री संजय राठोड यांना ‘क्‍लीन चीट’

मुंबई – संजय राठोड यांना शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपाप्रकरणी क्‍लीनचीट देण्यात आली आहे. यवतमाळ पोलिसांनी ही क्‍लीनचीट दिलेली आहे. नोकरी लावण्याचे अमिष दाखवून एका महिलेला शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप राठोड यांच्यावर करण्यात आला होता. पोलिसांना पाठवण्यात आलेल्या अर्जामध्ये महिलेच्या पतीचे नाव चुकलेले आहे. तसेच त्या अर्जावरील सही अर्जात नमूद केलेल्या महिलेची नाही. महिलेची राठोड यांच्याविषयी … Read more

वाघोली : कचरा समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांना माजी राज्यमंत्र्यांचा फोन

वाघोली (प्रतिनिधी) : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीलगत असणाऱ्या केसनंद  ग्रामपंचायत हद्दीतील कचरा समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व  भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केल्यानंतर लागलीच महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे माजी सह पालकमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी पीएमआरडी ए आयुक्त यांना फोन करून  केसनंद मधील कचरा समस्या सोडण्याबाबत सूचना केल्या. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने कचरा समस्या सोडवण्यासाठी कचरा … Read more

पंजाबमध्ये भाजप कार्यकर्त्यांना घरांबाहेर पडणेही मुश्‍किल; माजी मंत्र्याची व्यथा

चंडीगढ  – केंद्रीय कृषी कायद्यांना शेतकऱ्यांकडून होणाऱ्या विरोधामुळे पंजाबमधील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे त्या राज्यातील भाजप नेत्यांची मोठीच कोंडी होत असल्याचे समोर आले आहे. भाजप कार्यकर्त्यांना घरांबाहेर पडणेही मुश्‍किल बनल्याची व्यथा त्या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री अनिल जोशी यांनी मांडली आहे. भाजपच्या पंजाब शाखेने जोशी यांना काही दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावली. तुम्ही … Read more