10 भाषांवर प्रभुत्व.. राजीव गांधींसोबत काम.. सलग 8 निवडणुका जिंकण्यात यश ! भारतरत्न जाहीर झालेल्या माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचा असा होता प्रवास

नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशाचे माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. नरसिंह राव यांनी सलग आठ निवडणुका जिंकल्या आणि काँग्रेस पक्षात 50 वर्षांहून अधिक काळ घालवल्यानंतर ते भारताचे पंतप्रधान झाले. राव यांना भारतीय राजकारणाचे चाणक्य देखील म्हटले जाते. त्यांना भारतातील आर्थिक उदारीकरणाचे जनक मानले जाते. ते … Read more

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अभिवादन

मुंबई : “माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी देशाची एकता, अखंडता, सार्वभौमतेसाठी प्राणांचं बलिदान दिलं. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत त्यांनी अमूल्य योगदान दिलं. पाकिस्तानची फाळणी करुन बांग्लादेशची निर्मिती, आशियाई खेळांचं यशस्वी आयोजन, अलिप्त राष्ट्र शिखर परिषदेचं नेतृत्वं, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्वं करताना इंदिराजींनी दूरदृष्टी, राजकीय कौशल्याचं दर्शन घडवलं. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात पायाभूत प्रकल्प उभे राहिले. विकासाचा … Read more

मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर, श्वास घेण्यास त्रास; ‘एम्स’मध्ये दाखल

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची तब्येत मंगळवारी अचानक बिघडल्यामुळं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं आणि छातीत दुखत असल्यामुळे त्यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान अर्थात AIIMS मध्ये भरती करण्यात आलं आहे. मनमोहन सिंग हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. सध्या ते राजस्थानमधून राज्यसभा सदस्य … Read more

माजी पंतप्रधान नरसिंहरावांचे ओएसडी राम खांडेकर यांचे निधन

नागपूर  – माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे ओएसडी राम खांडेकर यांचे काल रात्री नागपुरात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे प्रिसिंपल सेक्रेटरी म्हणूनही काम केले आहे. नरसिंहराव हे महाराष्ट्रातल्या रामटेक लोकसभा मतदार संघातील खासदार होते त्यावेळी त्यांनी खांडेकर यांना आपल्या मतदार संघातील व्यवस्था पाहण्यासाठी नियुक्‍त केले होते. … Read more

मुख्यमंत्र्यांकडून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिवंगत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. तसेच उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात, स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या रूपाने भारताला एक कणखर आणि धुरंधर नेतृत्व लाभले होते. त्या … Read more

वांद्रयाची घटना पूर्वनियोजित – किरीट सोमय्या

मुंबई : करोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लॉकडाउनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास वांद्रे स्थानकाबाहेर परप्रांतीयांचा जमाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं परप्रांतीय जमले होते. तसेच त्यांनी आपापल्या घरी जाऊन देण्याची मागणी केली होती. दरम्यान, ही घटना पूर्वनियोजित होती, असा आरोप भाजपाचे नेते किरीट … Read more

चीनहून येणाऱ्यांचा ई-व्हीसा तात्पुरता रद्द

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताचा निर्णय बिजींग : चीन मध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने दक्षतेचा उपाय म्हणून भारत सरकारने चीन मधून येणाऱ्या नागरीकांची ई-व्हीसा पद्धत तात्पुरती बंद केली आहे. हा बंदीचा निर्णय तातडीने अंमलात येत आहे. चीन मधून येणाऱ्या विदेशी नागरीकांनाही ही बंदी लागू असणार आहे. चीन मधील ज्या नागरीकांना या आधीच ई-व्हीसा जारी करण्यात … Read more