सातारा | किल्ले संवर्धन मोहिमेत जिल्ह्यात किल्ल्यांवर स्वच्छता

वाई, (प्रतिनिधी) – सरदार हिरोजी इंदुलकर सारथी किल्ले संवर्धन योजनेत वाई आणि सातारा तालुक्यांमधील ‘सारथी’ आणि एमएससीआयटी प्रशिक्षण केंद्रांच्यावतीने जिल्ह्यातील किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम नुकतीच राबवण्यात आली. यामध्ये वाई तालुक्यातील कवठे येथील विन्सटेक कॉम्प्युटर्स, भुईंज येथील मायक्रोबिट कॉम्प्युटर्स, पाचवड येथील फ्रेंडस् कॉम्प्युटर्स आणि सातारा तालुक्यातील लिंब येथील शिवांश इन्फोटेक व किडगाव येथील प्रेरणा कॉम्प्युटर्स या केंद्रांमधील … Read more

अजिंक्‍यताऱ्याची प्रतिकृती नागपुरात साकारणार

सातारा  – किल्ले अजिंक्‍यतारा हा कायम अजिंक्‍य, अभेद्य राहिला आहे. या किल्याची आजही इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमीना भुरळ पडते. शनिवारी नागपूर येथील शिवगौरव प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी किल्ले अजिंक्‍यताऱ्याला भेट दिली. नागपूर येथे दिवाळीनिमित्त किल्ल्यांची प्रतिकृती बनवण्याची स्पर्धा दरवर्षी घेतली जाते. या निमित्ताने शिवगौरव प्रतिष्ठानतर्फे यावर्षी अजिंक्‍यताऱ्याची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर किल्ला पाहण्यासाठी प्रत्यक्ष आलेल्या प्रतिष्ठानच्या … Read more

ट्रेकिंगला गेलेल्या बेपत्ता डाॅक्टरचा किल्ल्याच्या पायथ्याशी सापडला मृतदेह

पनवेल – कुटुंबीयांसोबत ट्रेकिंगला गेलेल्या डॉक्‍टराचा पेब किल्ल्यावरून खाली कोसळून मृत्यू झाला. मृत डॉक्‍टर रविवारी त्यांच्या कुटूंब आणि मित्रांसोबत पनवेलमधील पेब किल्ल्यावर ट्रेकींगसाठी गेले होते. परंतु, ट्रेकिंगदरम्यान युवा डॉक्‍टर बेपत्ता झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयानी ते बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलीस आणि शोध पथकांनी सह्याद्री ट्रेकर्स आणि निसर्ग मित्र यांच्या मदतीने डॉक्‍टरचा शोध घेतल्यानंतर संबंधित डॉक्‍टराचा … Read more

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपला पराभावाचा धक्का; पवारांच्या शिलेदारांनी गड राखला

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपला पराभावाचा धक्का बसला आहे. 18 पैकी 17 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपला  मविआ आणि अपक्षांनी धूळ चारली  आहे. सांगलीतील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्टेची मानली जात होती. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा … Read more

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी महामंडळ स्थापणार; मुख्यमंत्री शिंदेंचे शिवप्रेमींना आश्वासन

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले हा आपला इतिहास आणि आपली परंपरा आहे. तो इतिहास टिकवणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. या गडकिल्ल्यांच्या संदर्भात प्राधिकरण महामंडळ स्थापन करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शिवप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यभरातील शिवप्रेमींनी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या … Read more

पुणे जिल्हा : गडकिल्ले, पर्यटनस्थळ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू; ‘असे’ असतील प्रतिबंध

पुणे  : हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेता फौजदारी दंड संहितेच्या कलम 144 नुसार जिल्ह्यातील गडकिल्ले, धरण, तलाव , धबधबे आदी पर्यटनस्थळ परिसरात जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी 17 जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. हवेली तालुक्यातील सिंहगड किल्ला, आतकरवाडी ते सिंहगड ट्रेक, मावळ … Read more

जामखेड : खर्डा येथील निंबाळकरांच्या गढीला संरक्षित स्मारकाचा दर्जा

जामखेड / खर्डा (प्रतिनिधी) – तालुक्‍यातील खर्डा येथील निंबाळकर गढी म्हणजे मराठे व निजाम यांच्यात झालेल्या खर्ड्याच्या लढाईत महत्त्वाची भूमिका निभावणारे सरदार निंबाळकर यांच्या निष्ठा व शौर्य याची साक्ष देणारे स्मारक आहे. या स्मारकाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन आमदार रोहित पवार यांनी पुरातत्त्व विभागाकडे निंबाळकर गढी, निंबाळकर छत्री व त्यांचे आराध्य दैवत असलेल्या … Read more

खर्डा किल्ल्याच्या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरुस्तीकामासाठी निधी मंजूर

जामखेड- जामखेड तालुक्यातील खर्डा किल्ला येथे असलेल्या राज्य संरक्षित स्मारकांचे जतन व दुरुस्ती कामासाठी राज्य सरकारकडून 4 कोटी 84 लाख रुपये एवढ्या रकमेच्या अंदाजपत्रकास यापूर्वीच प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. या स्मारकाचे काम सध्या प्रगतीपथावर असून जवळपास 3 कोटी रुपयांचे काम खर्डा किल्ला येथे पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान, या स्मारकाच्या जतन व दुरुस्तीसाठी 54.58 लाख … Read more

महाराष्ट्रांतील किल्ल्यांवर अनाधिकृत बांधकामे; भाजप शिष्टमंडळाची केंद्राकडे तक्रार

नवी दिल्ली – महाराष्ट्रांतील काही किल्ल्यांवर पुन्हा बेकायदेशीर बांधकामे केली जात असून तेथील जुन्या ढाच्यांचे नुतनीकरणही केले जात आहे, हा गंभीर प्रकार आहे त्यावर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे आणि आनंद देवधर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्र सरकारकडे केली आहे. या शिष्टमंडळाने केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही … Read more

“गडकिल्ल्यांची बार-वाईन शॉपला दिलेली नावे बदला”

कोल्हापूर – शिवछत्रपतींच्या गडकिल्यांची नावे असलेल्या बार वाईन शॉपची नावे बदलावी अशी मागणी शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाच्यावतीने उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे केली. या संदर्भात संघटनेच्यावतीने त्यांना कोल्हापूरात निवेदन दिले. मंत्री देसाई आज कोल्हापूरात अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेची पाहणी करण्यास आले होते. देवीचे दर्शन आणि बंदोबस्ताची पाहणी केल्यानंतर मंत्री देसाई शासकीय विश्रामगृहावर आल्यावर त्यांना संघटनेच्यावतीने निवेदन … Read more