Video | हातचालाखीने सराफांकडून 11 अंगठ्या चोरणारी महिला अखेर जाळ्यात

पुणे – पुण्यातील नामवंत सराफांना गंडा घालणाऱ्या महिलेला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. पुनम देवकर असं या महिलेचं नाव आहे. तिच्याकडून चोरीच्या एकूण अकरा अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही महिला आधी एका सराफाच्या दुकानात कामाला होती. त्यामुळे दागिन्यांवर लेबलिंग कसं केलं जातं हे तिला माहिती होतं. याचाच गैरफायदा घेत तीनं हातचलाखी केली. ती सराफाच्या … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा

मुंबई :- ईद-ए-मिलाद अर्थात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ईद-ए-मिलादाचा उत्सव साजरा करताना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, हजरत पैगंबर यांनी मानव कल्याणाचा मार्ग दाखविला. त्यांनी दिलेल्या शिकवणीला अनुसरून परस्परांचा आदर करूया, स्नेह वृद्धिंगत करूया. उत्सव साजरा करताना एकमेकांच्या आरोग्याचीही … Read more

सोलापूर | एसटी विभागाने मालवाहतुकीतून कमावले 1 कोटी रूपये

सोलापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल ते मे 2021 दरम्यान कडक टाळेबंदी असल्याने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. या काळात एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागाने एक कोटी नऊ लाख, 49 हजार 996 रूपयांचे उत्पन्न मिळविले असल्याची माहिती विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी पत्रकाद्वारे दिली.हे उत्पन्न इतर जिल्ह्यांपेक्षा तीनपट अधिक असल्याने राज्य परिवहन महामंडळाने सोलापूर विभागाचे कौतुक … Read more

एक जुलैपासून दंडकारण्य अभियानास प्रारंभ – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

शिर्डी – पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी पुढील पिढ्यांसाठी दूरदृष्टीतून सुरू केलेले दंडकारण्य अभियान मोठी लोकचळवळ ठरली आहे. सध्या असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मागील महिन्यात झालेली ऑक्सिजनची कमतरता या सर्व बाबींमुळे निरोगी जीवन व प्राणवायूसाठी वृक्षारोपण, संवर्धन व पर्यावरण संवर्धन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात … Read more

अजित पवार म्हणाले, होळीच्या शुभेच्छा देत असलो तरी….

बारातमी (प्रतिनिधी)  : जरी मी होळीच्या शुभेच्छा देत असलो तरी होळी सण साधे पणाने साजरी करावी व सार्वजनिक होळी कुणीही साजरा करू नये असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या जनतेला केले आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, कोरोनाचे मोठं संकट देशावर राज्यावर आहे, यामुळे कोरोनाचे नियम सर्वांनी पाळावेत. मास्क वापरावेत, … Read more

मैदानावरील कामगिरीवरच मिळते खेळाडूला ओळख

मुंबई – खेळ कोणताही असो, प्रत्यक्ष मैदानावरील कामगिरीमुळेच खेळाडूला खरी ओळख मिळते, असा सल्ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने नवोदित खेळाडूंना दिला आहे. अनअकादमी या ई-लर्निंग संस्थेचा ब्रॅंड ऍम्बेसिडर झाला त्या कार्यक्रमात सचिन आभासी मुलाखतीत बोलत होता. आम्ही जेव्हा ड्रेसिंगरुमध्ये येतो किंवा एकत्र असतो, तेव्हा आम्ही कुठून आलो किंवा आपला काय संबंध या गोष्टी आमच्यासाठी … Read more

मिक्‍स विंटर कप क्रिकेट स्पर्धा आजपासून

पुणे  – रोटरी डिस्ट्रिक 3131 तर्फे मिक्‍स विंटर कप क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा आजपासून रविवारपर्यंत आरएस खांदवे येथील क्रिकेट मैदानावर होणार आहे. यंदा प्रथमच लिलावपद्धतीने संघातील खेळाडूंची निवड करण्यात आली. या स्पर्धेत 6 संघ सहभागी झाले असून घेण्यात आलेल्या लिलावात फय्याज लांडगे याला 25 हजार रुपयांचे अल्टीमेट ऍडव्हेंचर्सने आपल्याकडे घेतले. तोच … Read more

सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद लवकरच मिळो…

मुंबई  : “मावळते वर्ष कोरोना संकटाशी लढण्यात गेले, येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य, समाधान घेऊन येवो, नववर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण जग कोरोनामुक्त होवो, सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद घेण्याची संधी लवकर मिळो” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला 2021 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार नववर्षानिमित्त दिलेल्या … Read more

शिवसेनेला मोठा दिलासा, राष्ट्रवादीकडून ‘त्या’ बंडखोर नेत्याची हकालपट्टी

अमरावती : विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अमरावतीतील अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केलेले चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे, याबाबतचे  प्रसिध्दिपत्रक राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर प्रसिध्द केले आहे. या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीकांत  गोविंद देशपांडे यांना महाविकास आघाडीने … Read more