ग्रीन टीपेक्षाही जास्त अँटिऑक्सिडंट्स आढळणारी ‘ही’ फळे रोज खायलाच हवीत !

गेल्या काही वर्षांत जगभरात ग्रीन टीचा वापर झपाट्याने वाढला आहे. वजन कमी करणे असो, रक्तातील साखर किंवा कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणे असो किंवा कर्करोगासारख्या आजारांपासून संरक्षण असो, ग्रीन टी हा नेहमीच पहिला पर्याय मानला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे त्यात असलेले उच्च अँटिऑक्सिडंट घटक. अँटिऑक्सिडंट्स हे घटक आहेत जे जळजळ कमी करतात आणि शरीराला मुक्त रॅडिकल्सशी … Read more

पुणे : अन्यथा रविवारपासून फळ, भाजीपाला विभागात बंद

पुणे –  मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला विभागात खरेदीसाठी येणाऱ्या टेम्पोसाठी पार्किंग शुल्क आकारण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. मात्र, या निर्णयाला टेम्पो संघटना, कामगार संघटना आणि आडते आणि खरेदीदारांनी विरोध केला आहे. प्रशासनाने हा निर्णय शुक्रवारपर्यंत रद्द न केल्यास येत्या रविवारपासून (दि.21) मार्केट यार्डातील बाजार बंद ठेवण्याचा निर्णय बाजार घटकांनी घेतला आहे. टेम्पो संघटना, … Read more

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाघोलीत रुग्णांना फळ वाटप

वाघोली (प्रतिनिधी) :  वाघोली तालुका हवेली येथे भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व पंडित स्व. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सेवा समर्थन सप्ताह कार्यक्रम निमित्ताने भारतीय जनता पार्टी वाघोली शहर व हवेली तालुका युवा मोर्चाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली  येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, … Read more

फळभाज्यांना पावसाचा तडाखा; असे आहेत आजचे ‘दर’

पुणे- जिल्ह्यासह विभागात सुरू असलेल्या पाऊसामुळे मार्केट यार्डातील फळभाज्यांची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने आले, टोमॅटो, फ्लॉवर, कोबीच्या भावात दहा ते वीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तर, आवकेच्या तुलनेत मागणी कमी असल्याने कारली, दोडका, काकडी, सिमला मिरची आणि घेवड्याची भावात घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव … Read more

मुलांची प्रतिकारशक्ती वाढवा, इन्फेक्शन्स पळवून लावा!!

– डॉ. मानसी पाटील-गुप्ता “खळखळून हसणे, पुरेशी झोप आणि आरोग्यदायी आहार हा जंतुसंसर्ग (इन्फेक्शन्स) टाळण्याचा कानमंत्र आहे!” जंतू आपल्या सभोवताली सगळीकडे असतात… अगदी आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्या स्वच्छ ठिकाणी सुद्धा!! आपल्या लहानग्यांना जंतुसंसर्गापासून वाचवण्यासाठी सर्व जंतू मारून टाकता येतील असा एकही उपाय अस्तित्वात नाही. संरक्षण हवेच असेल तर ते आपल्या ’आतून’ यायला हवे. … Read more

Pune : धुलिवंदनानिमित्त सोमवारी मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, फुले, केळी आणि पान विभाग बंद

पुणे, दि. 26 – सोमवारी (दि.29) धुलिवंदन आहे. या दिवशी दरवर्षीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला, फुल, केळी आणि पान बाजार बंद असतो. त्यानुसार यंदाही बंद राहणार आहे. तरीही शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणू नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसचिव सतिश कोंडे यांनी केले आहे.

पेरू, बोरे, लिंबाचे भाव घसरले; कलिंगडाची आवक वाढली, डाळिंब महागले

पुणे  – थंडीची चाहूल लागल्याने फळांना मागणी घटली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी घटल्याने पेरू, बोरे, लिंबाच्या भावात घसरण झाली आहे. घाऊक बाजारात लिंबाच्या 15 किलोंच्या गोणीमागे 40 ते 50 रुपये तर पेरू आणि बोरांच्या भावात दहा किलोमागे अनुक्रमे दहा ते तीस टक्क्यांनी घट झाली आहे.   बाजारात कलिंगडाची आवक वाढू लागली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत … Read more

नवरात्रीसाठी किसान कनेक्‍टची नवरंग फळे बास्केट

पुणे, दि.19-यावर्षीचा नवरात्रोत्सव करोनाच्या छायेखाली घरबसल्याच होत असताना करोनाशी लढताना भक्‍तीबरोबरच शारीरिक शक्‍तीलाही महत्त्व दिले आहे.यासाठी “किसान कनेक्‍ट’ या ऑनलाइन पद्धतीने ‘शेतातून थेट दारी’ या संकल्पनेतून भाजीपाला व फळे पुरवठा करणाऱ्या मंचातील शेतकरीबंधूंनी उत्सवाच्या नऊ दिवसांसाठी विविध प्रकारच्या नऊ रंगांच्या फळांचे नैवेद्य व प्रसादासाठीचे अनोखे बास्केट्‌स उपलब्ध केले आहेत. यांत नऊ रंगांची वुडन सफरचंद, संत्री, … Read more

रविवारीही मार्केटयार्डातील फळे, भाजीपाला विभाग बंद

शुक्रवारी आडते, कामगार संघटनांनी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद पुणे-पंतप्रधान नरेंद मोदी यांनी रविवारी (22 मार्च) “जनता कर्फ्यु’चे आवाहन केल्याने मार्केटयार्डातील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय आडते आणि कामगार संघटनांनी घेतला आहे, असे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, करोनामुळे मार्केटयार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशन आणि कामगार संघटनांनी फळे, भाजीपाला विभाग बंद ठेवण्याचा … Read more

फळांचा राजा शहरात दाखल

पिंपरी : कोकणातील हापूस आंबा पिंपरी-चिंचवडच्या बाजारात दाखल झाला आहे. गत दोन महिन्यांपासून सुरु असलेली “हापूस’ची प्रतीक्षा अखेर संपली आहे. यावर्षी मुक्‍काम ठोकून बसलेल्या पावसामुळे हापूसचा हंगाम लांबला असल्याने डिसेंबरमध्ये येणारा मुहूर्ताचा आंबा यावेळी फेब्रुवारीत बाजारात दाखल झाला आहे. त्यातही सुरुवातीच्या काळात हापूसच्या उत्पादनात मोठी घट झाली असल्याने सध्या हापूसची आवक अत्यंत कमी होत आहे. … Read more