देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले जवान आत्महत्येचा मार्ग का स्वीकारत आहेत? ; वाचा नेमकं कारण काय ?

CISF Soldiers Suicide ।

CISF Soldiers Suicide । संपूर्ण देश सीमेवर तैनात आणि देशातील इतर महत्वाच्या संस्थांमध्ये तैनात असणाऱ्या जवानांमुळे आपल्या देशात बिनधास्तपणे राहू शकतो. मात्र याच जवानांवर सध्या आत्महत्या करण्याची वेळ येतीय. ही धक्कादायक गोष्ट आहे. मात्र जवानांनी आत्महत्येचा मार्ग का निवडला हा मागील काही दिवसांपासूनच निर्माण झालेला मोठा प्रश्न आहे. याचेच उत्तर आता समोर आलंय. केंद्रीय औद्योगिक … Read more

अहमदनगर – राहात्यात बिंगो जुगारावर पोलिसांचा छापा

राहाता- बिंगो नावाचा जुगार खेळताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने राहाता शहरात विविध ठिकाणी धाडी टाकून सुमारे २३ आरोपींवर गुन्हा दाखल केला असून सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केली नसल्यामुळे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राहाता शहरात बिंगो नावाचा जुगार चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला … Read more

रूपगंध : जुगार

जुगार केवळ नशिबावर आधारित आहे. कुठल्याही प्रकारचं कौशल्य (स्किल) जुगारासाठी आवश्‍यक नसतं. गंमत म्हणून एखादे वेळेस पैसे लावून पत्त्यांचा खेळ किंवा इतर जुगारी खेळ हे आपण समजू शकतो, परंतु मोठं घबाड हाती लागेल या आशेनं जुगार खेळणं हे नुसतंच क्‍लेशकारक नाही तर ती जीवन उद्‌ध्वस्त करणारी कृती आहे. जुगार हा प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. महाभारतात … Read more

राजवाड्यावरचं शॉपिंग सेंटर अवैध धंद्यांना आंदण

प्रशांत जाधव सातारा – जिल्ह्यात व शहरात सुरू असलेली अवैध व्यवसायांविरुद्धची मोहीम काही दिवसांपासून पूर्णत: थंडावल्याने पुन्हा एकदा सातारा शहराच्या सर्वच भागात अवैध दारू विक्री, जुगार, मटक्‍यासह अन्य अवैध धंदेवाले सक्रिय झाले असून प्रभावी पोलीस कारवाईची गरज आहे. सातारा शहरातील महत्वाचा भाग असलेल्या राजवाडा परिसरातील स्व. अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुलाच्या बेसमेंटमध्ये तर अवैध धंद्यांचे आगार … Read more

पुणे जिल्हा: जुगारातील वाद जीवावर बेतला; रांजणगावात एकाच खून

रांजणगाव गणपती – येथे जुगार खेळताना झालेल्या पैशाच्या वादातून सहकाऱ्याने एकाचा खून केला. ही घटना (दि.13) रात्री दीड ते दोनच्या सुमारास घडली. गजानन शंकर सोनाग्रे (वय 35. रा. रांजणगाव, लांडेवस्ती, मूळ रा. नांदूर), असे खून झालेल्याचे नाव आहे. प्रमोद मुद्रीका पांडे (वय 42, सध्या रा. शिक्रापूर, मूळ रा. किर्तीसिंगपूर, उत्तर प्रदेश), असे आरोपीचे नाव आहे. … Read more

Pune Crime: शाळेच्या कंपाउंडलगत जुगाराचा डाव; मटका अड्डा चालकासह 14 जण गजाआड

पुणे –शाळेच्या कंपाऊंडलगत दोन टपऱ्यांमध्ये चाललेल्या जुगार अड्डयांवर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे. यामध्ये दहा मोबाइल आणि रोकड असा 1 लाख 17 हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला. तसेच आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सोमवार पेठेत एका शाळेच्या कपांऊंडलगत दोन टपऱ्यांमध्ये पत्र्याचे शेडमध्ये बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात … Read more

Pune Crime: ससून हॉस्पिटलच्या आवारातील “जुगार अड्डया’वर छापा, 15हून अधिक जुगारी अटक

पुणे – ससून हॉस्पिटल सर्व्हंट क्वार्टरर्स कंपाऊंडलगत आतील बाजूस सुरु असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. जुगार खेळणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, ससुन हॉस्पीटल सर्व्हट क्वार्टर्स, कंपाउंड भिंतीलगत आतील बाजुस पत्र्याचे बंद खोलीत बेकायदेशीरपणे पैशांवर पत्त्यांचा जुगार सुरु असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार छापा टाकण्यात आला. यावेळी शाबीद … Read more

Crime | थेउरमध्ये जुगार अड्डयावर छापा, 14 जणांविरूद्ध गुन्हा

पुणे – शहरातील लोणी-काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दात थेऊरमध्ये बेकायदेशिर जुगार अड्डयावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. त्यानुसार जुगार अड्डा मालक  सागर प्रमोद राजगुरु (वय-२८   रा. थेऊर)  याच्यासह  १४ जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार  लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कारवाईत ३५ हजारांचे जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे. थेउर परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशिररित्या … Read more

Pune Crime : धनकवडीत आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या बुकीला अटक

पुणे -ऑनलाईन आयपीएलमधील क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या बुकीला भारती विद्यापीठ आणि सहकारनगर पोलिसांनी अटक केली. राहुल सुभाष पांडे (वय ४८, रा. खडकमाळ आळी, घोरपडे पेठ) असे अटक केलेल्या बुकीचे नाव आहे.  त्याच्याकडून  लॅपटॅप, टॅब, ६ मोबाईल, रोख १० हजार ६५० रुपये असा ५१ हजार ८१० रुपयांचा ऐवज जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी  सुशांत फरांदे … Read more

PUNE : परिमंडळ दोन मधील अवैध्य धंद्यांबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार; मटका, सोरट, जुगाराचे क्‍लब सुरु

पुणे – परिमंडळ दोनमध्ये मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अवैध्य धंदे सुरु झाले आहेत. यामध्ये पत्त्त्यांचा क्‍लब आणि मटक्‍याचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देऊनही ते दखल घेत नसल्याची तक्रार पोलीस आयुक्त कार्यालयात भारिप बहुजन महासंघाच्यावतीने उपाध्यक्ष भरत शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भातील एक निवेदन त्यांनी दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात … Read more