Dry fruits modak : गणपती बाप्पाच्या आवडत्या पदार्थाला द्या ‘आरोग्य’चा स्पर्श, बनवा खास ड्रायफ्रूट मोदक !

पुणे – यंदा गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2023) 19 सप्टेंबरपासून सुरू झाली असून 28 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात गणपतीची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली जाते. श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी लोक मनोभावे देवाचे पुजा करत असतात. अशा वेळी मोदक बनवणेही खूप महत्त्वाचे ठरते. खरंतर मोदक हा गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य असल्याचं म्हटलं जातं. … Read more

‘दर्शन’मात्रे भाग -2 : गुपचूप यांचा वरद गणपती

गणपतीच्या पूजेमध्ये शमीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यातून गणपतीचे अधिष्ठान त्या शमी वृक्षाच्या खालीच असेल तर त्याचे महत्त्व आणखीच द्विगुणित होते. पुण्यातील शनिवार पेठेतील नेने घाटाजवळ असलेला वरद गणपतीचे स्थानही असेच महत्त्वाचे आहे. हा वरद गणपती शमीवृक्षाखाली विराजमान आहे. यामुळे या गणपतीस सांस्कृतीकदृष्ट्या अधिक महत्त्व आहे. स्वतंत्रोत्तर काळातील इतिहासामुळे अनेक पुणेकरांची मनोभावनाही या गणपतीशी जोडली गेली … Read more

सकाळी 11 वाजेपर्यंत करा गणरायाची प्रतिष्ठापना

पुणे – गणेशोत्सव अवघ्या 24 तासांवर आला आहे. या लाडक्‍या बाप्पांचे मुहूर्तावर आणि यथासांग पद्धतीने स्वागत करण्याची जय्यत तयारी घरोघरी जवळपास झाली आहे. यंदाचे विशेष म्हणजे अंगारक योगावर (मंगळवारी) गणेशाचे आगमन होत आहे. त्यामुळे याला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. सूर्योदयापासून सकाळी 11 वाजेपर्यंतचा काळ मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी अत्यंत शुभ आहे. यातही सकाळी साडेसहा ते नऊ … Read more

‘लालबागचा राजा’ मंडळाला पालिकेने ठोठावला ३ लाखांचा दंड

मुंबई – मुंबईतील लालबागचा राजा हा गणपती महाराष्ट्रातील तमाम गणेश भक्‍तांचे श्रद्धास्थान आहे. आणि गणेशोत्सवाच्या काळात या गणपतीच्या चरणी अनेक प्रकारच्या वस्तू व सोन्या-चांदीचे दागिने दान केले जात असतात. उत्सव संपल्यानंतर या मोैल्यवान वस्तूंचा लिलाव केला जातो. यंदा या लिलावातून एकूण 1 कोटी 25 लाख रुपयांची रक्कम उभी राहिली असून या संपूर्ण उत्सवात या मंडळाला … Read more

गणपती बाप्पा मोरया…! एकाच मंदिरात गणपतीच्या दोन स्वयंभू मूर्ती

आळ्यात प्राचीन मंदिर ः नवसाला पावणारा अशी बाप्पाची ओळख बेल्हे – जुन्नर तालुक्‍यातील आळे येथे स्वयंभू पांदिचा गणपती हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच मंदिरात गणपतीच्या दोन स्वयंभू मूर्ती आहेत. एकाच मंदिरात बाप्पाच्या दोन शेजारीच मूर्ती असलेले हे एकमेव मंदिर असल्याचे येथे येणारे भक्तगण सांगतात. तर याठिकाणी पूर्वी पांदिचा रस्ता होता … Read more

गणेशमूर्ती विसर्जनासाठीही ठिकठिकाणी “रांगा’!

धरणातून विसर्गामुळे नदीपात्रालगतचे काही हौद पाण्यात : होडीचीही सुविधा पुणे – गणेशमूर्ती विसर्जनासाठी या वर्षी पुणेकरांना रांगेत थांबण्याची वेळ आल्याचे शनिवारी दिसले. खडकवासला साखळीतील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने मुठा नदीत सुमारे 18 हजार क्‍युसेक विसर्ग गुरूवारी रात्रीपासून सुरू करण्यात आला. त्यामुळे डेक्कन, म्हात्रेपूल, विठ्ठलवाडी, नारायणपेठ परिसरातील विसर्जन हौद तसेच घाटांवर मोठ्या प्रमाणात पाणी … Read more