पुण्यातील विविध गणेश मंडळांच्या देखाव्यांत प्रसिद्ध मंदिरांची मांदियाळी

पुणे – अयोध्या येथील श्रीराम मंदिर, उज्जैन येथील महाकालेश्‍वर मंदिर, नेपाळमधील पशुपतिनाथ मंदिर, शेगाव येथील गजानन महाराज मंदिर, पुरी येथील जगन्नाथाचे मंदिर, स्वामी मंदिर अशा देशातील वैविध्यपूर्ण मंदिरांच्या प्रतिकृतींची मांदियाळी यंदा पुण्यात गणेशोत्सव काळात होणार आहे. शहरातील विविध गणेश मंडळांतर्फे या मंदिरांची सजावट करण्यात येत असून, हे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. मानाचा चौथा श्री … Read more

गणपती यंदा देखाव्याविना

मिरवणुकाही नाही : गणेश मंडळांचा निर्णय पुणे – ‘गणेश मंडळांनी देखावे उभारू नयेत, मिरवणुका काढू नयेत, कमीतकमी जागेत मंडप उभारावेत’ असे निर्णय गुरुवारी महापालिकेत झालेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत घेण्यात आले. गणेशोत्सवाची पूर्वतयारी बैठक गुरुवारी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. दि.22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर कालावधीत असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मंडळांनी … Read more

‘गणेशाच्या मूर्तीला मास्क लावू नये’

प्रमुख गणेश मंडळांचे आवाहन पुणे – गणेश मूर्तीकारांनी आपल्या “क्रिएटीव्हिटी’ला यंदा लगाम घालावा लागणार आहे. करोनाबाबत जनजागृती करताना गणेश मूर्तींचे पावित्र्य राखले जाईल, याचे भान त्यांनी ठेवावे, असे आवाहन गणेश मंडळांनी केले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मूर्तीकार आपली कलाकुसर वापरून मातीचा वेगवेगळा आकार देतात. दरवर्षी विविध “ट्रेन्ड’नुसार लाडक्‍या बाप्पाला आकार देण्यात येतो. याशिवाय विविध ठिकाणी जनजागृती … Read more

मंडई गणेशोत्सवात भक्‍ती संगीताचा कार्यक्रम

श्री सागर सेवा मंडळ यांच्यातर्फे भक्ती भावनाचा कार्यक्रम सहकारनगर  – आखिल मंडई गणेशोत्सव मंडळ दरवर्षी भव्य देखावा सादर करत असते. या उत्सवात धार्मिक आध्यात्मिकपणे सहभाग घेत मंदिरात परिसरातील श्री सागर सेवा मंडळ यांच्यातर्फे भक्ती भावनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. धार्मिक गीतांमधून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भगवान महावीर स्वामी यांची महिती सांगून त्यांच्या विचारांचे महत्त्व सांगितले. यावेळी … Read more

#व्हिडीओ : विश्‍व शांतीसाठी “नवकार मंत्रा’चा जप

अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननसमोर केला जैनबंधावांनी मंत्रांचा जयघोष पुणे – “अहिंसा परमो धर्म’ आणि “सर्वधर्म समभावा’चा संदेश “नवकार मंत्रा’च्या जयघोषातून गणेशोत्सवाच्यानिमित्ताने जैनबंधवांनी श्री अखिल मंडई मंडळाच्या श्रींच्या उत्सव मंडपात शनिवारी दिला. चातुर्मास, पर्युषण आणि गणेशोत्सव एकाच कालावधीत असल्याने जैनबांधवांनी एकत्र येत “विश्‍व शांतीसाठी नवकार मंत्रा’चा जप केला. अखिल मंडई मंडळाच्या 126 व्या स्थापना वर्षानिमित्त … Read more

गणेशमूर्ती विसर्जनासाठीही ठिकठिकाणी “रांगा’!

धरणातून विसर्गामुळे नदीपात्रालगतचे काही हौद पाण्यात : होडीचीही सुविधा पुणे – गणेशमूर्ती विसर्जनासाठी या वर्षी पुणेकरांना रांगेत थांबण्याची वेळ आल्याचे शनिवारी दिसले. खडकवासला साखळीतील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने मुठा नदीत सुमारे 18 हजार क्‍युसेक विसर्ग गुरूवारी रात्रीपासून सुरू करण्यात आला. त्यामुळे डेक्कन, म्हात्रेपूल, विठ्ठलवाडी, नारायणपेठ परिसरातील विसर्जन हौद तसेच घाटांवर मोठ्या प्रमाणात पाणी … Read more

सहा दिवस रात्री 12 वाजेपर्यंत चंगळ; देखावे सुरू ठेवण्यास परवानगी

पुणे – गणेशोत्सवात दि. 7 ते दि. 12 सप्टेंबरदरम्यान रात्री 12 वाजेपर्यंत देखावे सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विधानभवन येथे पाटील बोलत होते. मागील आठवड्यात शहरात झालेल्या दोन कार्यक्रमांमध्ये गणेश मंडळांकडून तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यामध्ये शहरातील देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक पुण्यात येतात. देखावे 10 वाजताच बंद होत असल्याने … Read more

गणेश मंडळांना शुल्कमाफीचा “प्रसाद’

पुणे -शहरात विविध ठिकाणी गणेशोत्सव मंडळांकडून लावण्यात येणाऱ्या स्वागत कमानी आणि रनिंग मंडपाचे महापालिकेकडून आकारले जाणारे शुल्क माफ करण्यात आले आहे. स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. त्यासंबंधी नगरसेवक हेमंत रासने यांनी दिलेला ठराव मंजूर करण्यात आला. ठरावाला सूचक नगरसेवक हेमंत रासने आणि अनुमोदन नगरसेवक दीपक पोटे यांनी दिले होते. यासंबंधी रासने … Read more

गणेशभक्‍तांसाठी 50 कोटींचे विमा कवच

पुणे – पुणे मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा यासह कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीअंतर्गत गणेशभक्तांसाठी तब्बल 50 कोटी रुपयांचा विमा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे काढण्यात आला आहे. यामध्ये चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला किंवा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास प्रति व्यक्तीला 5 लाख रुपये, अपघातात अंशत: अपंगत्त्व आल्यास 2 लाख रुपये आणि अपघातात … Read more

गणेश मंडळांना निवडणूक भेट!

पुणे – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरातील गणेश मंडळांना खुश करण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी सुरू केले आहेत. मंडळांना मांडव परवानगी देताना, महापालिकेकडून रनिंग मांडव तसेच स्वागत कमानींना आकारले जाणारे शुल्क महापालिकेच्या स्थायी समितीकडून माफ केले जाण्याची शक्‍यता आहे. मुख्यसभा मान्यता देईल या भरवशावर ही मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव स्थायी समितीचे सदस्य हेमंत रासने आणि दीपक पोटे … Read more