पुणे | लसणाचा नवीन हंगाम सुरू  

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – किरकोळ बाजारात उच्चांकी भाववाढ झालेल्या लसणाचे भाव आता हळूहळू उतरणीला लागले आहेत. सध्या लसणाचा नवीन हंगाम सुरू झाला आहे. पंधरा दिवसांच्या तुलनेत मार्केट यार्डात लसणाची आवक दुपटीहून अधिक वाढली आहे. परिणामी, घाऊक आणि किरकोळ बाजारात लसणाच्या भावातील तेजी कमी झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात शंभर रुपये पावशेर म्हणजेच ४०० रुपये किलो … Read more

कांद्याने रडवल.. लसनाने होतेय आग-आग ! किलोमागे मोजावे लागताहेत 400 पेक्षाही जास्त रुपये.. का वाढताहेत भाव ?

Garlic prices Increasing : सध्या नव्या लसणाचे पीक बाजारात आले आहे. साधारणपणे नवीन पीक बाजारात आल्यानंतर भाव कमी होतात. मात्र यावेळी लसणाच्या दरात घट होण्याची चिन्हे दिसत नाहीत. रंगाने किंचित स्पष्ट आणि आकाराने मोठा असल्यास तो बाजारातच 480 रुपये किलो दराने विकला जात आहे. सरासरी आकाराचा लसूणही सध्या 100 रुपये प्रति पाव दराने विकला जात … Read more

PUNE: किरकोळ बाजारात लसणाचे भाव गगनाला!

पुणे – मराठमोठ्या भाजी, आमटी अथवा वरणाला चव आणण्यासाठी लसणाचा वापर केला जातो. पण, याच लसणाचा तडका सध्या चांगलाच कडला आहे. सध्या किरकोळ बाजारात लसून ७० ते ८० रुपये पाव या प्रमाणे विकला जात आहे. त्यातही दर्जाप्रमाणे किलोमागे ३५० रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या कही महिन्यांत डाळी, तांदूळ आणि गव्हाचे भाव सरासरी २० ते ३० … Read more

उन्हाळ्यातही रोज खावी लसणाची एक पाकळी

लसूण खाणे प्रत्येक ऋतूमध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असते. उन्हाळ्यातही रोज सकाळी लसणाची एक पाकळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. लसणामधील न्यूट्रिएंट्स अनेक आजारांपासून दूर ठेवण्यात मदत करतात. सर्वसाधारणपणे लसणीचा उपयोग भाजीला फोडणी देण्यासाठी, एखाद्या भाजीची ग्रेव्ही तयार करण्यासाठी किंवा चटण्या बनविण्यासाठी केला जातो. एखादी बेचव भाजी केवळ लसूण त्यामध्ये घातल्याने किती चविष्ट बनते! पण केवळ खाद्यपदार्थाची चव … Read more

हवामान बदलाशी संबंधित आजारांवर लसूण गुणकारी

लसूण आजकालच्या आहारातील एक अविभाज्य घटक बनला आहे. लसूण केवळ भोजनाची चव वाढवत नाही, तर याच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. लसणाचे अनेक औषधी उपयोग आहेत. उग्र वासामुळे अनेक जण लसूण खाणे टाळतात. परंतु, त्याच्या औषधी गुणांची फारच कमी लोकांना माहिती आहे. हजारो वर्षापूर्वीपासून लसूण औषधी स्वरूपात वापरण्यात येत आहे. जवळपास ५ हजार वर्षापूर्वी लसूण औषधी … Read more

ढगाळ हवामानाची धास्ती, पुण्यात फळभाज्यांची आवक वाढली पण…

पुणे  – उत्पादन वाढले पण, त्यातच ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांनी पीक बाजारात आणले आहे. त्यामुळे मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक वाढली आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने लसूण, सिमला मिरची, हिरवी मिरची, फ्लॉवर आणि कोबीच्या भावात घट झाली आहे. तर, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास … Read more

फळभाज्यांना “डिमांड’

  पुणे – पावसाने मागील आठवड्यात काहीकाळ उघडीप दिल्याने फळभाज्यांची आवक मार्केट यार्डात वाढली आहे. त्यातच हॉटेल, खानावळी सुरू होणार असल्याने फळभाज्यांना मागणी वाढली आहे. हिरवी मिरची, सिमला मिरची, कारली, दोडका, फ्लॉवर, कोबी, वांगी, लसुण आणि भुईमुगाच्या भावात वाढ झाली आहे. तर, मागणीच्या तुलनेत आवक वाढल्यामुळे टोमॅटो, शेवगा, भेंडी आणि दुधी भोपळाच्या भावात घट झाली … Read more

मसाल्यांचे दर वाढल्यामुळे तिखट झोंबतयं..!

कोपर्डे हवेली – बऱ्याचशा तिखटाच्या शौकीन लोकांना रोजच्या जेवणात झणझणीत रस्सा असल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. हे जरी खरे असले तरी सध्या बाजारपेठेत मिरची, कांदे, लसूण व इतर मसाले पदार्थांचे दर गगनाला भिडले असल्याने रोजच्या जेवणातील तिखटपणा कमी झालेला दिसून येत आहे. सर्वत्र निर्माण झालेल्या महापूरजन्य परिस्थितीमुळे कांदे, लसूण पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने … Read more

कांदा, लसूण चोरीने व्यापारी भयभीत

तळेगाव दाभाडे  – तळेगाव-चाकण मार्गालगत (सिद्धार्थ नगर) येथील छत्रपती भाजी मार्केटमध्ये गुरुवारी (दि. 31) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सुमारे आठ ते दहा दुकानांमधील 200 किलो कांद्यासह, एक हजार रुपयांची नाणी, लसूण व आले असा एकूण 27,500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून पसार झाले. ही घटना गुरुवारी सकाळी साडेसात वाजता उघडकीस आली. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात चोरीचा … Read more