PUNE : ऑनलाइन डिलिव्हरी कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप

पुणे – इंडियन गिग वर्कर्स फ्रंटच्या वतीने ओला-उबेर-स्विगी-झोमॅटो कंपन्यांच्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी बुधवारी लाक्षणिक बंद पुकारला. यामध्ये काही वगळता अन्य संघटनांनी सहभाग घेतल्यामुळे डिलिव्हरी सेवा बंद ठेवण्याची वेळ आली. दरम्यान, विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. “मोबाइल ऍपद्वारे सेवा देणाऱ्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ओला-उबेर यासह … Read more

ओला, उबरवर काम करणाऱ्यांचा बंद

पुणे – मोबाईल ऍपवरून सेवा देणाऱ्या कंपन्या ज्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर मोठ्या होत आहे, त्याच कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या 25 ऑक्‍टोबरला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ओला-उबेर यासह स्वीगी आणि झोमॅटोवर सेवा देणारे सर्व कर्मचारी सामूहिक बंद पाळणार आहे, अशी माहिती डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली. … Read more