आई-वडिलांच्या कर्जमाफीसाठी मुलीकडे ‘ती’ मागणी ; नकार दिल्याने आरोपीकडून मुलीवर चाकूहल्ला

डोर्लेवाडी : बारामतीतील एका दाम्पत्याने घेतलेल्या कर्जाच्या मोबदल्यात त्यांच्या मुलीकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, तरुणीने या मागणीला विरोध केल्याने तिच्यावर आरोपी तरुणाने चाकू हल्ला करून त्या तरुणीला जखमी केल्याचा प्रकार समोर आलाय. गुरुवारी सकाळी बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात एका … Read more

Pune News : …त्या मुलीचा शोध घेण्यास पोलीस आयुक्तांचा पुढाकार; वाघोलीला पोलीस छावणीचे स्वरूप

वाघोली (प्रतिनिधी) – नांदेड सिटी येथून आईवडील रागवल्याने बेपत्ता झालेली 12 वर्षाची मुलगी अखेर रांजणगाव येथे सुखरूप सापडली. नांदेड सिटी येथून ती दुपारी दोन वाजता आईवडील रागवल्याने ती घरातून निघुन गेली होती. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे स्वतः तिच्या शोधासाठी वाघोलीत रात्री सव्वा दहा वाजता दाखल झाले. यामुळे वाघोलीला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. … Read more

Pune News : मुलीच्या आजारपणामुळे दोघे आले एकत्र; सहा वर्षे पती-पत्नी राहत होते विभक्त

पुणे : आजारपण ही तशी वाईट गोष्ट. मात्र, मुलीचे आजारपणामुळे दोघांच्या संसारासाठी वरदान ठरले आहे. सहा वर्षे वेगळे राहणारे दोघे मुलीला डेंगू झाल्याने महिनाभर एकत्र राहिले. तिच्या भवितव्याचा विचार करत दोघांनी कायमस्वरूपी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. वकिलांनी केलेले समुपदेशन महत्त्वाचे ठरले. त्यांचा नात्यातील सहा वर्षाच्या दुरावा संपला. माधव आणि माधवी (दोघांची नावे बदलली आहेत) अशी … Read more

नगर | मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ

नगर, (प्रतिनिधी) – मुलगी झाली म्हणून व आई-वडिलांकडून पाच लाख रूपये घेऊन येण्यासाठी विवाहितेचा सासरच्यांनी छळ केला. याप्रकरणी नगर तालुक्यातील वाळकी येथे माहेरी राहणार्‍या पीडित विवाहितेने बुधवारी (दि. २८) नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती अविनाश रामलाल चव्हाण, सासरे रामलाल यादव चव्हाण, भाया अशोक रामलाल चव्हाण, जाऊ … Read more

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दीड वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; तीन कुत्र्यांनी एकाच वेळी केला हल्ला

Dog attack – दिल्लीच्या तुघलक रोडवरील धोबी घाट परिसरात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. ही मुलगी घराबाहेर खेळत असताना तिच्यावर हल्ला झाला. तीन कुत्र्यांनी एकाच वेळी या चिमुरडीवर हल्ला केला. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार पाहिल्यावर आरडाओरड केली. त्यानंतर मुलीला सफदरजंग रूग्णालयात दाखल … Read more

कोटा येथे १७ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार

कोटा – कोटा शहरात नीट प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. कोटा येथील अतिरिक्त पोलीस अधिक्षक उमा शर्मा यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली. या माहितीनुसार सदर घटना शनिवारी (१० फेब्रुवारी) घडली. पीडित मुलगी ही … Read more

मुलाच्या प्रेमाची शिक्षा आई-वडिलांना; मुलीच्या नातेवाईकांकडून वीजेच्या खांबाला बांधून मारहाण

सांगली – मुलाच्या प्रेमाची शिक्षा आई-वडिलांना भोगावी लागल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीतील शिराळा तालुक्यातील ही घटना आहे. प्रेम प्रकरणातून मुलाच्या आई-वडिलांना वीजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाम करण्यात आली. मारहाणीत मुलाचे वडिल गंभीर जखमी झाले असून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलीचे पालक आणि नातेवाईकांनी ही मारहाण केली असून या प्रकरणी १२ जणांविरोधात … Read more

अ‍ॅनिमल फेम अभिनेता ‘Manjot Singh’ने वाचवला मुलीचा जीव! घटनेचा थरारक व्हिडिओ एकदा पाहाच…

manjot singh : रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटातील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. चित्रपटातील रणबीरच्या भावांनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. संदीप रेड्डी वंगा यांच्या अॅनिमल या चित्रपटात दिसलेला अभिनेता ‘मनजोत सिंग’ सध्या चर्चेत आला आहे. अॅनिमलमधून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. पण तो खऱ्या आयुष्यातील हिरोच्या रुपात सर्वांसमोर आला आहे. अभिनेत्याने एका मुलीचे … Read more

नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचा शाळेत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, बीडमध्ये हळहळ

बीड – शहरातील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या नववीच्या मुलीचा वर्गात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. रेश्मा शेख (वय 15) असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेश्मा ही नेहमीप्रमाणे शाळेत आली होती. सकाळची प्रार्थना संपल्यानंतर ती आपल्या वर्गात जाऊन बसली. त्यावेळी अचानक तीला भोवळ येऊन बेशुद्ध … Read more

टिकली लावल्याने शिक्षकाची बेदम मारहाण; मुलीने घरी पोहोचताच केली आत्महत्या

रांची – झारखंडमधील एका शाळेत कपाळावर टिकली लावून शाळेत आल्यामुळे एका मुलीला शिक्षकांनी बेदम मारहाण केली. यामुळे दुखावलेल्या मुलीने घरी पोहोचताच गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. झारखंड पोलिसांनी सांगितले की, तेतुलमारी भागात नुकतीच ही घटना घडली. मयत विद्यार्थीनीचे पालक आणि स्थानिक नागरिकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात निदर्शने केली. यानंतर पोलिसांनी … Read more