पुणे | खोटी कागदपत्रे देऊन महापालिकेची फसवणूक? नगरसेवक अविनाश बागवे यांचा आरोप

पुणे : महापालिकेस खोटी कागदपत्रे सादर करून सत्यम कन्सल्टंट या कंपनीने महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडील त्रयस्थ गुणवत्ता तपासणी ( थर्ड पार्टी कन्सल्टंट) म्हणून कोटयावधीची कामे मिळवून फसवणूक केल्याचा आरोप कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच या संस्थेस मदत करण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा दबाव असून महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचाही त्यास सहभाग असल्याने या प्रकरणी … Read more

पुणे: सर्वोत्कृष्ट खेळाडू देण्याची परंपरा महाराष्ट्राचीच – वागसकर

दिव्यांग खेळाडूला मनसेची मदत पुणे : गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक मदती अभावी देशविदेशतील स्पर्धांपासून वंचित राहिलेल्या दिव्यांग पॅरा बॅडमिंटन पटू आरती पाटील यांची मनसेच्या महिला शहराध्यक्ष वनीता वागस्करयांनी नुकतीच भेट घेतली. तसेच तील भविष्यातील स्पर्धांच्या तयारीसाठी मनसेच्या वतीने 2 लाख रूपयांची मदत यावेळी वागसकर यांच्या वतीने देण्यात आली. पॅरा बॅडमिंटन पटू पाटील या 2024 च्या … Read more

पुणे : यूएईचे चलन देण्याच्या बहाण्याने तरुणाची दोन लाखाची फसवणूक

पुणे – एका तरुणाची यूएईचे दिरहम देण्याचे आमिष दाखवून दोन लाखाची फसवणूक करण्यात आली. त्याच्या हातात साबणाला वर्तमानपत्राचा गठ्ठा गुंडाळून जबरदस्तीने देण्यात आला. यानंतर त्याच्याकडील दोन लाखाची रक्कम असलेली पिशवी हिसकावून पळ काढण्यात आला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जगताप डेअरी समोरुन थोडे पुढे गेल्यावर अप्पर … Read more

पंतप्रधानांकडून शरद पवारांच्या तब्बेतीची विचारपूस; लवकर बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पोटदुखी आणि पित्ताशयाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात येत आहे. यामध्ये भाजपच्या नेत्यांचाही समावेश आहे.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. Thank you Honourable Prime Minister Shri @narendramodi ji for your … Read more

बोगस शिधापत्रिका देणारे अधिकारी जात्यात

पुणे – कोणतेही कागदपत्रे नसताना तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे शिधापत्रिका दिल्या जात असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी आता बोगस शिधापत्रिका देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.   शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा मानला जाऊ नये, असे आदेश असले तरी अनेक सरकारी कार्यालयांमध्ये शिधापत्रिकेची मागणी केली जाते. तसेच शासनाच्या … Read more

रशियाचे अध्यक्ष ‘ब्लादिमीर पुतीन’ यांची मैत्रीण झाली गायब

मॉस्को – रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची कथित मैत्रीण आणि त्या देशाची ऑलिम्पिक स्पर्धेतील गोल्ड मेडलीस्ट अलीना कॅबेइव्हा अचानक गायब झाल्याची बातमी आहे. गेल्या वर्षी तिने जुळ्यांना जन्म दिला होता. त्यानंतर ती प्रकाशझोतात आलीच नसल्याचे वृत्त आहे. तिची ही जुळी मुले पुतीन यांचीच अपत्ये असल्याचा दावा माध्यमांनी केला आहे. मात्र पुतीन यांनी त्याचा इन्कार केला … Read more

अदानी समूहाला विमानतळ देण्यास विरोध

केरळ सरकारचा ठराव एकमताने मंजूर : भाजपनेही दिला पाठिंबा तिरुअनंतपुरम – जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांचे खासगीकरण करत ते अदानी समूहाला देण्याचा निर्णय केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच जाहीर केला. या निर्णयास केरळ सरकारने विरोध दर्शविला असून यासंदर्भात एकमताने ठराव देखील मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, या ठरावाला भाजपनेही पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे केंद्र सरकारविरोधात केरळ … Read more

नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत नागपूर पॅटर्न राबविणार – पालकमंत्री

विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न नागपूर : सध्या कोविड 19 या वैश्विक महामारीशी संपूर्ण जग लढा देत आहे. नागरिकांचे आरोग्य हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, कोरोना मुक्तीबाबत नागपूर पॅटर्न विकसित करुन तो यशस्वीपणे राबविणार असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शनिवारी (दि.15) केले.  भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या … Read more

गणेशोत्सवात स्वयंशिस्तीला देऊ अधिक प्राधान्य

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे नांदेडकरांना आवाहन नांदेड : आध्यात्मिक उत्साहाला प्रतिबिंबीत करणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे आपण पाहत जरी असलो, तरी यावर्षी कोविड – १९ या संसर्गजन्य प्रादूर्भावामुळे प्रत्येक नागरिकांनी स्वयंशिस्तीला अधिक प्राधान्य देण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. शुक्रवार ७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक गणेश … Read more

13 वर्षीय मुलीला अंमली पदार्थ देत सहा महिने बलात्कार

भोपाळमधील अनेक रिक्षा चालकांचे नीच कृत्य भोपाळ : जुने शहर भागात एका 13 वर्षीय मुलीवर अंमली पदार्थ देत अनेक रिक्षाचालकांनी बलात्कार केला. हा प्रकार जवळपास सहा महिने सुरू होता. आपल्या आजी सोबत ही मुलगी निशातपुरा भागात रहात होती. आजीशी वाद झाल्याने तीने घर सोडले. ती हनुमानगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका बस स्थानकावर गेली. तेथे अभय … Read more