पुणे जिल्हा : वाघोलीत सिस्का कंपनीच्या गोडाऊनमधून 54 लाखांची चोरी

वाघोली : वाघोली तालुका हवेली येथील सिस्का एल इ डी लाईट इयर्स अ हेड, या कंपनीच्या गोडाऊन मधून जवळपास 54 लाख रुपये रकमेच्या विद्युत उपकरणांच्या साहित्याची चोरी झाल्याचा गुन्हा लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून यासंदर्भात कंपनीचे जनरल मॅनेजर नितीन शिवाजीराव नेवसे यांनी फिर्याद दिली आहे. लोणीकंद पोलीस दिलेल्या माहितीनुसार सिस्का एल इ डी … Read more

समाविष्ट गावांतील मिळकतींची तपासणी सुरू; महापालिका चार महिने मोहीम राबविणार

पुणे – आंबेगाव (खुर्द आणि बुद्रूक), धायरी, वडगाव बुद्रूक, वडगाव खुर्द या परिसरात प्रत्यक्ष जागेवर जाऊन व्यावसायिक मिळकतींची तपासणी मोहिमेची सुरूवात महापालिकेने सुरू केली आहे. पुढील चार महिने ही मोहीम राबविण्यात येणार असून पहिल्याच दिवशी अनधिकृत जागेचा वापर तसेच कर थकविलेल्या आणि कर आकारणी झालीच नसलेल्या सहा मिळकती महापालिकेने शोधल्या आहेत त्यांचा कर एक कोटींपेक्षा … Read more

ना कागद, ना नियम..फक्‍त फतवे! आगीच्या प्रत्येक घटनेवेळी महापालिकेचे हात वर

पुणे – शहरात गेल्या दोन महिन्यांमध्ये सातत्याने आगीच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, या सर्वच घटना दाट लोकवस्ती किंवा व्यापारी प्रतिष्ठाने असलेल्या भागांतील आहेत. पण, अशा घटना टाळण्यासाठी कोणतीही ठोस अशी नियमावली पालिकेकडे नसल्याचे पुन्हा समोर आले आहे. घटनेनंतर फक्‍त धावपळ करायची…कागद फिरवायचे आणि फतवे काढायचे, इतकेच काय ते “कर्तव्य’ पालिका बजावत आहे. शहरात आगीच्या … Read more

लढवय्या शब्बीर शेख! गंगाधाम येथील आग शमविताना असामान्य कर्तृत्व

संजय कडू पुणे – वीस-बावीस दिवसांपूर्वीच अँजिओप्लास्टी झालीये…पुढच्या आठवड्यात पुन्हा हृदय शस्त्रक्रिया आहे. मधुमेह असल्यामुळे दोन्ही पाय सुजलेत.. अशा अवस्थेत अग्निशमन दलाचा एक जवान सकाळी पावणेनऊ वाजल्यापांसून आग नियंत्रणासाठी झटत होते. दोन्ही पाय सुजल्याने त्यांना हालचाल करताना अडचणी जाणवत होत्या. मात्र, त्याही अवस्थेत ते झगडत होते. त्यांना पाहून व्यापाऱ्यांनी आमच्यासाठी हाच “देव’ आहे अशी प्रतिक्रिया … Read more

साताऱ्यात फर्निचरचे गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी

सातारा – शहरातील बुधवार नाका परिसरातील जयेश एंटरप्राइजेस या फर्निचरच्या गोडाऊनला शनिवारी वीजपुरवठा करणाऱ्या मीटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन मोठी आग लागली. या आगीमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, इलक्‍ट्रिक मशीन आणि इतर फर्निचर जळून सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन अवघ्या पाऊण तासामध्ये आगीवर नियंत्रण मिळवले. गोडाऊनमधून आगीचे मोठे लोळ बाहेर … Read more

पुणे: बावधनमधील ‘बिग बास्केट’च्या गोदामाला भीषण आग; क्षणात सर्वकाही जळून खाक

पुणे : सोमवारी रात्री बावधान बुद्रुकमधील ‘बिग बास्केट’ या ऑनलाइन किराणामाल आणि भाज्या विक्री करणाऱ्या गोडाऊनला आग लागली. रात्री साडेअकरा वाजता बावधान येथील गोडाऊनला ही आग लागली. रात्रीच्यावेळी आग लागल्याने गोडाऊनमध्ये फार लोक नव्हती. या आगीमधे धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे महापालिका अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए आणि … Read more

Pune Crime : गोडाऊनमधील मालाची चोरी करून स्क्रॅपमध्ये विक्री करणाऱ्या चोरट्यास आठ वर्षांनी अटक

पुणे – कोंढवा परिसरातील पत्रा, वायर, तेलाच्या गोडाऊनमधील मालाची चोरी करून विक्री करणाऱ्या एका चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकातील पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीविरुद्ध आठ गुन्हे दाखल असून मागील आठ वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. दयानंद झा (वय 42, रा. चिखली, मुळ रा. बिहार) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा … Read more

शारदा गजानन मंदिराचे गोडाऊन सील

गणेश भक्‍तांमध्ये नाराजी : घंटानाद, महाआरतीद्वारे निषेधाचा इशारा पुणे – मार्केटयार्डातील श्री शारदा गजानन मंदिराचे गोडाऊन सील केल्यामुळे बाजारातील गणेश भक्‍तांमध्ये नाराजी पसरली आहे. बाजार समिती प्रशासनाने गुरुवारी (दि. 14) गोडाऊनचे सील न काढल्यास पुणे शहरातील सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्षांसह गणेशभक्‍तांतर्फे मार्केटयार्ड गणपती मंदिरात घंटानाद आणि महाआरती करून निषेध करण्याचा इशारा बाजारातील गणेशभक्‍तांनी दिला. पथारी … Read more

जोगेश्वरीमध्ये गोदामाला लागलेली आग आटोक्‍यात

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागामध्ये गोदामाला लागलेली आग आता आटोक्‍यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सध्या इथे कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. गुरुवारी पहाटे अचानक गोदामाला भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. #UPDATE Fire which had broken out in a godown in Mumbai’s Jogeshwari area is … Read more

येवलेवाडी येथे गोडाऊनला भीषण आग

पुणे – येवलेवाडी येथे एका गोडाऊनमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. याची माहिती समजताच अग्निशामक दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून जवान आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. येवलेवाडी येथे तेल व खाद्यपदार्थ गोडाऊनमधील एका ट्रकने पेट घेतला व आग लागल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. सकाळी 7.15 च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने … Read more