पुणे | एएफएमसी चे कमांडंट लेफ्टनंट जनरल नरेंद्र कोतवाल सेवानिवृत्त

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – एएफएमसी चे कमांडंट आणि संचालक लेफ्टनंट जनरल नरेंद्र कोतवाल यांचा सैन्यदलातील कार्यकाळ संपल्याने ते ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. लेफ्टनंट जनरल कोतवाल यांनी सशस्त्र दलात ३७ वर्षांहून अधिक काळ त्यांनी सशस्त्र दलात उल्लेखनीय कार्य केले आहे. जम्मू येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे ते माजी विद्यार्थी असून, १९९२ मध्ये त्यांनी एएफएमसी मधून पदव्युत्तर … Read more

satara | मेडिकल कॉलेजचे बांधकाम बंद पाडणार्‍यांवर कारवाई करा

सातारा, (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम बंद पाडणार्‍यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हा जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असून, तो लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे. कारण या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमुळे सातार्‍यातील शाळांच्या प्रगतीवर सकारात्मक परिणाम होणार असून, अर्थकारणाला गती मिळणार … Read more

“सरकारने कंत्राटी भरतीचा GR रद्द करावा”; रोहित पवार यांची मागणी

मुंबई – राज्य सरकारने सध्या कंत्राटी पद्धतीने पद भरण्याचा घाट घातला आहे. काही दिवसांपूर्वीच तहसीलदारासारखे महत्त्वाचे पद कंत्राटी पद्धतीने भरले जाणार असल्याची जाहिरात समोर आली होती. ही जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांनी प्रकाशित केली आहे. त्यानुसार तहसीलदार, कारकून किंवा मंडळ अधिकारी या पदांवर कंत्राटी भरती केली जाणार आहे. ही जाहिरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर यावर … Read more

सातारच्या वैद्यकीय महाविद्यालयाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

सातारा  – सातारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वराज्याचे दुसरे छत्रपती “श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा’ असे नाव देण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. या निर्णयाचे मी स्वागत करतो. ऐतिहासिक सातारानगरीतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वास्तूस समर्पक नाव दिल्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा योग्य सन्मान झाला आहे, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त … Read more

दिलासादायक! देशातील पहिल्या “मंकीपॉक्स’ रुग्णाचा अहवाल आला निगेटिव्ह, रुग्णालयातून “डिस्चार्ज’

नवी दिल्ली – मंकीपॉक्सबाबत दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण संसर्गमुक्त झाला असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. याबाबत माहिती देताना केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, केरळमध्ये उपचार घेत असलेली भारतातील पहिली मंकीपॉक्स रुग्ण या आजारातून बरी झाली आहे. देशातील मंकीपॉक्सची ही पहिलीच केस असल्याने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ … Read more

प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – अमित देशमुख

मुंबई – देशासह राज्यात दीड वर्षापासून कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण आल्याचे दिसून आले आहे. मात्र येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येईल. त्या दृष्टीकोनातून काम करणे आवश्‍यक असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा येत्या 5 वर्षातील दृष्टीकोन (प्रॉस्पेटिव्ह प्लॅन) कसा असेल यासंदर्भातील आढावा बैठक … Read more