West Bengal : बंगालमध्ये लवकरच धनखड यांच्यासारखे राज्यपाल; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा

कोलकता – पश्‍चिम बंगालला लवकरच नवे राज्यपाल मिळतील. ते माजी राज्यपाल जगदीप धनखड यांच्यासारखेच असतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी बुधवारी केला. उपराष्ट्रपती बनण्याआधी धनखड यांच्याकडे बंगालच्या राज्यपाल पदाची सुत्रे होती. राज्यपाल असताना त्यांचा अनेकदा तृणमूल कॉंग्रेस सरकारशी संघर्ष झाला. धनखड यांच्या नंतर मणिपूरचे राज्यपाल ला गणेशन यांच्याकडे जुलैमध्ये बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त … Read more

राज्यपालांना पद, अधिकाराचे तारतम्य नाही; शरद पवारांचा कोश्‍यारींना टोला

उस्मानाबाद  – राज्यपाल यांनी काही भाषण केले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलही वक्तव्य केले. त्यांच्याबद्दल बोलण्यात काहीही अर्थ नाही. मुळात पद आणि अधिकार याचे तारतम्य राहत नसल्यामुळे त्यांनी अशी वक्तव्य केली, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना खोचक टोला लगाविला. उस्मानाबाद तालुक्‍यातील पाडोळी गावातील विविध विकास कामाचे त्यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात … Read more

राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावा – नाना पटोले

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नियमाला धरून घेण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा होता. नियम बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकारच आहे, त्यात घटनाबाह्य असे काहीच नाही. राज्यपालांनी संविधानिक पदाचा मान राखावा, राजकारण करु नये, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. गांधी भवन येथे (दि. 28  डिसेंबर)पत्रकार परिषदेत बोलताना पटोले पुढे … Read more

भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना राज्यपालांचे अभिवादन

मुंबई : दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या 90  व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ‍यांनी राजभवन येथे आज डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. राजभवन येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीदेखील यावेळी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश … Read more

विधान परिषदेची एक जागा स्वाभिमानीला द्यायची म्हणजे काही दया किंवा मेहरबानी नाही : राजू शेट्टी

कोल्हापूर(प्रतिनिधी) – मुळामध्ये विधान परिषदेची एक जागा स्वाभिमानीला द्यायची म्हणजे काही दया नाही किंवा मेहरबानी नाही… स्वाभिमानी पक्ष अन् राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात समझोता झाला होता. आणि समझोता 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी झालेला होता. दिल्लीमध्ये पवार साहेबांनी त्या बैठकीमध्ये होतो आणि आम्ही दोघांनी ठरवलं होत. मात्र गेल्या सव्वा वर्षात मी या राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागांसाठी … Read more

राज्यपालांना आपण राज्यपाल आहोत याचा विसर पडला आहे का? – नवाब मलिक

मुंबई – राज्याचे माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ५ ते ७ ऑगस्ट दरम्यानच्या नियोजित दौऱ्याबाबत तीव्र प्रतिक्रिया अल्पसंख्याक मंत्री  नवाब मलिक यांनी दिली आहे. राज्यपाल आपल्या दौऱ्यादरम्यान नांदेड येथील विद्यापीठात राज्याच्या अल्पसंख्याक विभागाने बांधलेल्या दोन वसतिगृहांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच नांदेड, परभणी व हिंगोली इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयांना भेट देऊन तिथे आढावा बैठका ते घेणार आहेत. … Read more

‘रमजान ईद’ निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास, प्रार्थना व परोपकाराला महत्त्व दिले आहे. कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे यावर्षी देखील रमजान ईदचा सण घरी राहून तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून साजरा करावा, असे आवाहन करतो. ही ईद जीवनात आनंद, आरोग्य व … Read more

मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

नवी दिल्ली : 71 व्या प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा दिल्लीतल्या राजपथावर पार पडला. या वेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या खास सोहळ्याला ब्राझीलचे राष्ट्रपती जायर मेसियास बोल्सिनारो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी पथसंचलनातून लष्करी सामर्थ्याचे जगाला दर्शन घडवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्‌विटरवरुन देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या … Read more