जिल्ह्यातील 30 लाख नागरिकांना मिळणार धान्य

नगर -केंद्र सरकारने देशातील 80 कोटींपेक्षा जास्त लोकांना वर्षभर मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. करोना संकटाच्या काळात घेतलेल्या या निर्णयाला सरकारने वेळोवेळी मुदतवाढही दिली आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी लोकांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचा लाभ नगर जिल्ह्यातील 30 लाख नागरिकांना होणार असून साधारण 47 हजार मेट्रिक टन धान्याचे वाटप केले जाणार आहे. गोरगरीब … Read more

सरकारसाठी खासगी कंपन्याही खरेदी करणार धान्य

नवी दिल्ली – सध्या राखीव साठा करण्यासाठी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया केंद्र सरकारच्या वतीने अन्नधान्याची खरेदी करते. लवकच खासगी कंपन्या आणि राज्य सरकारच्या संस्था हे काम सुरू करतील असे केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले. यासंदर्भात राज्य सरकार बरोबर अगोदरच पत्र व्यवहार सुरू झाला असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारच्या संस्थांकडून धान्य खरेदी झाल्यानंतर अधिक … Read more

शासकीय गोदामातून धान्य गायब..!

अमोल मतकर संगमनेर – शासकीय धान्य गोदामातून स्वस्त धान्य दुकानदारांना दिल्या जाणाऱ्या 50 किलोंच्या कट्ट्यामागे काही प्रमाणात धान्य कमी दिले जात आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घोटाळा सुरू असून यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांसह हमालांचाही वाटा असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. शहराजवळ घुलेवाडी परिसरातील शासकीय गोदामातून तालुक्‍यातील 164 स्वस्त धान्य दुकानदारांना धान्यवाटप करण्यात येते. या धान्याचे प्रमाण … Read more

तरूणांनी केली पक्ष्यांना `दाणा-पाणी`ची सोय; टाकाऊ डब्यांपासून बनवले “बर्ड फीडर”

वाल्हे – पुरंदर तालुक्यातील वाल्हे नजिक कामठवाडी येथील तरुणांनी टाकाऊ पासून टिकाऊ सूत्राचा वापर करत ‘पक्ष्यांसाठीचा फीडर’ बनवला आहे.  आता उन्हाळ्याला सुरूवात झाली असून, दिवसाचे कमाल तापमान वाढू लागले आहे. येत्या काळात प्राण्यांसाठीचे नैसर्गिक पाणवठे, ओढे- नाले, बंधारे जवळपास आटलेच आहेत. त्यामुळे पक्ष्यांना अनेक ठिकाणाहून वणवण करावी लागते. नेमक्या अशाच वेळी वाल्हे (कामाठवडी) येथील ‘वृक्ष … Read more

स्वस्त धान्य वितरणामध्ये अडचणीच अडचणी

नागरिक, दुकानदार वैतागले : तांत्रिक समस्यांसोबत धान्य वाटपासही उशीर पिंपरी – स्वस्त भाव धान्य दुकांनामध्ये सध्या मशीनचे सर्व्हर डाऊन होणे, नेटवर्क स्लो होणे, अचानक मशीन बंद पडणे अशा अडचणी येत आहेत. त्याशिवाय, धान्य दुकानांमध्ये दरमहा येणारे धान्य बऱ्याचदा महिना अखेरीस येत आहे. पर्यायाने त्याचे वाटप त्याच महिन्यात पूर्ण होत नसल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे … Read more

रेशन धान्य दुकानात गरिबांसाठी आलेला माल खुल्या बाजारात विक्रीला

पावणे तीन लाखांचा माल ताब्यात… सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) : सरकारी स्वस्त धान्य दुकानात गरिबांसाठी आलेला माल खुल्या बाजारात विक्रीला घेवून जाणारा टेम्पो बारामती-निरा मार्गावर होळ(ता. बारामती) येथे पकडण्यात आला. या टेम्पोसह २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या संकट काळात गरिबांच्या तोंडचा घास पळवुन नेत असल्याचा प्रकार जिल्ह्यातील बारामती तालुक्यात … Read more

चढ्या दराने किराणा माल विकणाऱ्यां विरोधात तक्रार करा!

बेल्हे- चढ्या दराने किराणा माल विकत असणाऱ्या नफेखोर दुकानदाराकडून ग्राहकांनी रीतसर पावती घेऊन जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये दुकानदाराच्या विरुद्ध तक्रार करावी.मध्य महाराष्ट्राचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संघटनमंत्री बाळासाहेब औटी यांनी सांगितले. तसेच केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या आपल्या हक्कच्या रेशन चा नागरिकांनी रेशन दुकानदारांकडून सोशल डिस्टन्स पाळत गर्दी न करता लाभ घ्यावा असंही ते म्हणाले. … Read more

धान्य, कडधान्याच्या दरामध्ये 40 टक्के वाढ

आवक वाढल्यानंतर दर घसरण्याची शक्‍यता पिंपरी – परतीच्या पावसाने मागील पंधरा दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यासमोर सडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी बाजारात होणारी आवकही मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे धान्य, कडधान्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. दिवाळीपूर्वी आणि आताच्या धान्यांच्या दरात सरासरी 30 ते 40 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. … Read more