मोठी बातमी! 4 हजार 554 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर

मुंबई – राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची घोषणा आज करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. निधन, राजीनामा किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, ग्रामपंचायतींच्या या … Read more

माण गावात सरपंच-उपसरपंच पदाचा नवा राजकीय ‘मुळशी पॅटर्न’

हिंजवडी – संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आयटी नगरी माण गावात एक वेगळा राजकीय मुळशी पॅटर्न पाहायला मिळाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत माणच्या सरपंचपदी अर्चना सचिन आढाव तर उपसरपंचपदी “जॉइंट किलर’ ठरलेले प्रदीप श्रीरंग पारखी यांची बहुमताने निवड झाली. माण गावच्या सरपंच पदासाठी प्रबळ दावेदार समजल्या जाणारे नंदकुमार भोईर यांच्या सौभाग्यवतींना धक्कादायक पराभवाचा सामना … Read more

वडिलांचे निवडणूक जिंकण्याचे स्वप्न मुलींनी केले पूर्ण

पिरंगुट – आपणही निवडून यावे अन्‌ जनसेवा करावी, अशी घोटावडे (ता. मुळशी) येथील भाजपचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र देवकर यांची कायमच इच्छा होती. मात्र निवडणुकीत त्यांना यश आले नाही. यावर्षीही ते पराभूत झाले; पण त्यांच्या दोन्ही मुलींनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयश्री खेचत आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.  रामचंद्र देवकर अनेक वर्ष घोटावडे परिसरात सामाजिक कार्य … Read more

सरपंचपदासाठी काही पण…; विजयी पॅनेलप्रमुखाला धमक्‍या

पुणे – गुंडांच्या मदतीने बिनविरोध निवडून येत इच्छुकांना सरपंचपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडण्यासाठी धमकावण्यात आले. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांच्या पोलीस कोठडीतील 1 फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे.  तुषार गोगावले (वय 28 रा. वडगाव बुद्रूक) या सराईताचे नाव आहे. या प्रकरणात विजय पोळेकर (22), विशाल कोतवाल (28), हृषिकेश पाटील (27) आणि चेतन कांबळे (20) अशी … Read more

गडचिरोली : ग्रामपंचायतींसाठी सरासरी 67 टक्के मतदान

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील 150 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 67 टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. आयुक्त  मदान यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे 360 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 16 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका … Read more

कारभारी लय भारी! पती निवडून आल्यानंतर पत्नीने खांद्यावर उचलून काढली मिरवणूक

– रामचंद्र सोनवणे राजगुरूनगर – पतीच्या यशामागे पत्नीचे मोलाचे योगदान असते असे आपण नेहमीच ऐकत असतो. पत्नी कधीच आपल्या भावना जाहिरपणे मांडत नसते. मात्र खेड तालुक्यातील डोंगराळ भागातील पाळु गावात ग्रामपंचायत निवडणुकीत संतोष शंकर गुरव यांनी विरोधी उमेदवारावर दणदणीत विजय मिळवल्यानंतर पत्नी रेणुका गुरव यांचा आनंद गगनाला भिडला. आणि त्यांनी चक्क आपल्या पतीलाच खांद्यावर उचलून … Read more

शाब्बास पठ्ठ्या! २१व्या वर्षीच ग्रामपंचायतीवर ऋतु’राज’; सर्वात तरुण सदस्य होण्याचा मान

सोलापूर – राज्यभरातील ग्रामंपचायतींच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाला. १२,७११ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकालानंतर ही निवडणूक तरुणाईच्या हातात गेल्याचे स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्के देत नवखे चेहरे निवडून आले आहेत. अशाच एका सोलापूरच्या २१ वर्षीय तरुणाच्या नावाची चर्चा आहे. सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील घाटणे येथील ऋतुराज पाटील असे त्याचे नाव असून सर्वात तरुण … Read more

कलगीतुरा रंगला ! लवकरच होणार महाविकास आघाडीचा भांडाफोड

मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुक झाल्या या निवडणुकीच्या  निकाल समोर आल्यानंतर अनेक ठिकाणी सत्तांतर झालं. याच निकालावरून भाजप आणि मविआमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. भाजपाने या निवडणुकीत  सर्वाधिक जागा भाजपला मिळत असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. दरम्यान  भाजपला मिळालेल्या यशाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत … Read more

काँग्रेस, भाजपसह सर्वांनाच आठवले गटाचा दे धक्का! ‘या’ गावात दणदणीत विजय

सोलापूर –  महाविकास आघाडीत आणि भाजपच्या दोन गटात ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक गावात चुरशीच्या लढती होत आहे. पण अशातच अक्कलकोट तालुक्यातील एका गावात मात्र रामदास आठवले यांच्या आरपीआयने सर्वांना दे धक्का दिला आहे.  अक्कलकोट तालुक्यातील बॅगेहळ्ळी ग्रामपंचयातीत रामदास आठवलेंच्या आरपीआयचा दणदणीत विजय झाला आहे. आरपीआयचे विजयकुमार गायकवाड यांच्यासमवेत पूर्ण पॅनल विजयी झाले. ७ पैकी ७ जागांवर गायकवाड … Read more

पुणे महापालिकेत येणाऱ्या गावांतही ग्रामपंचायतीसाठी उत्साहात मतदान

फुरसुंगी – पुणे महापालिकेमध्ये नव्याने 23 गावांचा समावेश करण्याचा अध्यादेश शासनाने जारी केल्यानंतर या गावांपैकी काही गावांतीत ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातून ग्रामपंचायत निवडणूक होणार की नाही? असा संभ्रम या गावांमध्ये झाला होता. अखेर, या गावांत ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण करण्यात आली असून आज अशा गावांत शांततेत मतदान करण्यात आले. पुणे महापालिका हद्दीलगतची म्हाळुंगे, सूस, … Read more