गडचिरोली : ग्रामपंचायतींसाठी सरासरी 67 टक्के मतदान

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील 150 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 67 टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली. आयुक्त  मदान यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे 360 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 16 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका … Read more

कारभारी लय भारी! पती निवडून आल्यानंतर पत्नीने खांद्यावर उचलून काढली मिरवणूक

– रामचंद्र सोनवणे राजगुरूनगर – पतीच्या यशामागे पत्नीचे मोलाचे योगदान असते असे आपण नेहमीच ऐकत असतो. पत्नी कधीच आपल्या भावना जाहिरपणे मांडत नसते. मात्र खेड तालुक्यातील डोंगराळ भागातील पाळु गावात ग्रामपंचायत निवडणुकीत संतोष शंकर गुरव यांनी विरोधी उमेदवारावर दणदणीत विजय मिळवल्यानंतर पत्नी रेणुका गुरव यांचा आनंद गगनाला भिडला. आणि त्यांनी चक्क आपल्या पतीलाच खांद्यावर उचलून … Read more

शाब्बास पठ्ठ्या! २१व्या वर्षीच ग्रामपंचायतीवर ऋतु’राज’; सर्वात तरुण सदस्य होण्याचा मान

सोलापूर – राज्यभरातील ग्रामंपचायतींच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाला. १२,७११ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकालानंतर ही निवडणूक तरुणाईच्या हातात गेल्याचे स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्के देत नवखे चेहरे निवडून आले आहेत. अशाच एका सोलापूरच्या २१ वर्षीय तरुणाच्या नावाची चर्चा आहे. सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील घाटणे येथील ऋतुराज पाटील असे त्याचे नाव असून सर्वात तरुण … Read more

कलगीतुरा रंगला ! लवकरच होणार महाविकास आघाडीचा भांडाफोड

मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुक झाल्या या निवडणुकीच्या  निकाल समोर आल्यानंतर अनेक ठिकाणी सत्तांतर झालं. याच निकालावरून भाजप आणि मविआमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. भाजपाने या निवडणुकीत  सर्वाधिक जागा भाजपला मिळत असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. दरम्यान  भाजपला मिळालेल्या यशाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत … Read more

राष्ट्रवादी पुन्हा! पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत घड्याळाचाच गजर

जुन्नर, खेड, आंबेगाव, पुरंदरमध्ये शिवसेनेचीही सरशी भोर, पुरंदर वगळता कॉंग्रेसचा सन्मान पुणे – गावविकासाचा प्रारंभ जेथून होतो तेथील एकूण 747 ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. यातील बिनविरोध वगळता इतर 649 ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी लागले. यात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंगेसने वर्चस्व राखले आहे. जवळपास पाचशे ग्रामपंचायती ताब्यात आल्याचा दावा पक्षातील वरिष्ठांनी केला आहे. याखालोखाल जिल्ह्याच्या उत्तर पट्ट्यात … Read more

Gram Panchayat Results 2021 : वाई तालुक्‍यात सर्वाधिक ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे

वाई ( Grampanchayat Result 2021 ) – वाई तालुक्‍यातील 76 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी 19 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 57 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. त्यामध्ये वाई तालुक्‍यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने वर्चस्व मिळवलेण तर प्रमुख गावांमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली. ओझर्डे, केंजळ, व्याजवाडी, गुळुंब व धोम या ग्रामपंचायतीमध्ये मतदारांनी … Read more