कांद्यापाठोपाठ द्राक्षानेही रडविले!

onion

नारायणगाव, (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने कांद्यावर अघोषित निर्यातबंदी लादल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. तर आता द्राक्ष निर्यातीच्या खर्चात वाढ झाली असल्यामुळे द्राक्षाची गोडी निर्माण होण्यापूर्वीच द्राक्षाचे भाव कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. बांग्लादेशाने द्राक्षावरील आयात शुल्कात मोठी वाढ केल्याने जुन्नर-आंबेगाव … Read more

द्राक्ष बागायतदारांना निर्यातक्षम आणि भरघोस उत्पादन मिळवून देण्यासाठी ‘कॅन बायोसिस’चे यशस्वी पाऊल !

नाशिक – येथील हॉटेल SSK Solitaire येथे कॅन बायोसिस प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीच्या ब्रीग बॉस या CIB प्रमाणित उत्पादनाचा अनावरण सोहळा आणि प्रगतशील शेतकरी (Farmer) वितरक यांच्यासाठी परिसंवाद १३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाशिक जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक प्रगतशील शेतकरी आणि अधिकृत विक्रेत्यांनी उपस्थिती नोंदवली. द्राक्ष बागेत (grape farmer) भेडसावणाऱ्या … Read more

जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांची गोडी छाटणी झाली कडू 

जुन्नर – गेल्या तीन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडला आहे. द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणीनंतर मालकाडी तयार होत असताना अचानकपणे २९ एप्रिल रोजी झालेली गारपीट द्राक्षबागायतदारासाठी घातक ठरली असून, त्याचे दुष्परिणाम आत्ताच्या ऑक्टोबर छाटणी मध्ये दिसून आले आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला द्राक्ष उत्पादक खरड छाटणी करत असतात. त्यानंतर एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या … Read more

द्राक्ष उत्पादकांच्या मदतीसाठी राज्य शासन सकारात्मक

मुंबई : मागील तीन वर्षांपासून द्राक्षाचा हंगाम वाया गेला आहे. तसेच यंदाही राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासन सकारात्मक असून कृषी विभागाने यासंबंधीचा अहवाल तातडीने राज्य शासनाकडे पाठवावे, असे निर्देश कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी दिले. द्राक्ष बागायतदार संघटनेच्या प्रतिनिधींची डॉ. कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात … Read more

द्राक्ष बागायतदारांना फटका

निवृत्तीनगर (संजय थोरवे) – सांगली, नाशिकनंतर जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. यंदा ऐन हंगामत करोनाचे संकट ओढावल्याने द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील द्राक्षे निर्यातक्षम असल्याने चांगला दर मिळत असतो. यासाठी शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागते. ही काळजी घेताना खर्चही मोठ्या प्रमाणात येतो. काही दिवसांपूर्वी युरोपीय देशांनी बंदी घातली असताना अनेकांनी बागा काढून टाकणे पसंत केले होते. यानंतर सर्व काही सुरळीत चालेल असे चित्र असताना आता करोमुळे द्राक्षउत्पादकांचे कंबरडेच मोडले आहे. द्राक्षबागेसाठी एका एकरावर पाच ते सहा लाख रुपये खर्च होतो. हा खर्चही यंदा वसूल होणे अवघड बनले आहे. खर्चाची तोंडमिळवणी तरी व्हावी, या आशेने काहींनी बेदाणे उत्पादन करायचे ठरवले आहे.

सांगलीचे द्राक्ष बागायतदार धास्तावले 

सांगली/तासगाव  – करोनामुळे संपूर्ण देशामध्ये दि.14 एप्रिल अखेर लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे अनेक व्यावसायिकांबरोबरच शेतकऱ्यांवरही मोठे संकट आले आहे. सांगली जिल्हा आणि सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग हा परिसर द्राक्ष बागायतीसाठी प्रसिद्ध आहे. या भागातील जवळपास 60 ते 70 टक्के द्राक्षांची निर्यात झाली असली तरी अद्याप 30 ते 40 टक्के द्राक्ष निर्यात होणे बाकी आहे. त्यामुळे द्राक्ष … Read more