पुणे | विदेशी फळांनी घातली पुणेकरांना भुरळ

पुणे, {विजयकुमार कुलकर्णी} – नागरिकांना नेहमीच विदेशी वस्तूंचे आकर्षण राहिले आहे. अगदी आहारातही विदेशी पदार्थ दिसू लागले आहेत. त्याचबरोबर भारतीयांना विदेशी फळांचीही गोडी लागली असून, या फळांसाठी मागणी वाढू लागली आहे. मार्केट यार्डातील घाऊक फळ बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात विदेशी फळे दाखल होत आहेत. रंग, दर्जा, चव आणि टिकाऊपणामुळे ही फळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याचे … Read more

पिंपरी | उष्णता वाढल्याने रसाळ फळांना मागणी वाढली

चिखली,  (वार्ताहर) – उद्योगनगरीमध्ये मागील काही दिवसांपासून दुपारी ऊन, रात्री, पहाटे थंडी वाढली आहे. वातावरणात सतत बदल होत आहे. परंतु दुपारचे ऊन असहाय्य होत असल्याने नागरिक पोटात गारवा निर्माण करणार्‍या रसाळ फळांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढू लागला आहे. दुपारी घराबाहेर पडणे अशक्य होऊ लागले आहे. शरीरातील पाण्याची क्षमता टिकून ठेवण्यासाठी … Read more

PUNE: तासगावच्या द्राक्षांचीच बाजारात चलती

पुणे – आंबट गोड चवीच्या द्राक्षांची मार्केट यार्डात आवक वाढली आहे. पुण्यासह नगर, सातारा जिल्ह्यांतून ही आवक होत आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील तासगाव भागातील द्राक्षांचीच चलती आहे, अशी माहिती द्राक्षांचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली. किरकोळ बाजारात दर्जानुसार ५० ते १०० रुपये किलो भावाने द्राक्षांची विक्री होत आहे. सध्या मार्केट यार्डातील फळ विभागात दररोज १२ ते … Read more

पुणे जिल्हा: माणिक चमन वाणाच्या द्राक्ष बागांवर कुर्‍हाड

रांजणी  – माणिक चमन वाणाच्या द्राक्ष बागांवर शेतकर्‍यांकडून कुर्‍हाड चालवली जात आहे. नवीन वाणाच्या द्राक्षांमुळे बाजारातील कमी झालेल्या मागणीमुळे गेल्या काही वर्षांपासून शेतकर्‍यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे द्राक्ष बागा तोडण्याची वेळ आल्याचे शेतकरी सांगत आहेत. पुणे जिल्ह्यात आंबेगाव, जुन्नर त्याचबरोबर बारामती, इंदापूर तालुक्यात माणिक चमन द्राक्षांच्या बागा आहेत या तालुक्यातील शेतकरी माणिक … Read more

पुणे : मार्केट यार्डमध्ये हंगामपूर्व द्राक्षांची आवक

पुणे – गोड-आंबट चवीचे द्राक्ष म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा द्राक्षांची हंगामापूर्वीच पुणेकरांना चव चाखता येणार आहे. मार्केट यार्डातील फळविभागात रविवारी (दि.29) पहिली हंगामपूर्व द्राक्षाची आवक झाली. जिल्ह्यातील बारामती आणि सातारा जिल्ह्यातील फलटण भागातून ही आवक होत असल्याची माहिती मार्केट यार्डातील द्राक्षांचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली. येथील बाजारात दीड ते दोन टन द्राक्षांची आवक … Read more

बेदाणा चाळीसाठी अनुदानाची गरज – शरद पवार

पुणे – राज्यात कांदा साठवणुकीसाठी उभारण्यात आलेल्या कांदा चाळींच्या धरतीवर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बेदाणा साठवणुकीसाठी बेदाणा चाळी उभारण्यासाठी शासनाने अनुदान देण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वार्षिक अधिवेशनानिमित्त आयोजित द्राक्ष परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, राज्याचे फलोत्पादन संचालक … Read more

कर्जत तालुक्‍यात अवकाळीमुळे द्राक्षबागा उद्‌ध्वस्त; हातातोंडाशी आलेला घास हिरावला

कर्जत – शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने तालुक्‍यातील खांडवी परिसरात कहर केला. येथील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वादळाने व गारपिटीने हिरावून घेतला आहे. अवकाळीने शेतकऱ्यांना जबर फटका बसला असून येथील द्राक्ष बाग भुसापट झाली आहे. त्यामुळे आर्थिक कणा मोडलेल्या शेतकऱ्यांनी शासनाने आर्थिक मदत न केल्यास आत्महत्या करण्याची वेळ येणार असल्याची आर्त … Read more

रस्त्यावर विकतोय शेतकरी द्राक्ष; अवकाळीमुळे मातीमोल भावाने विक्री

सोनई – गारपिटसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः फळबागा नष्ट झाल्याचे चित्र दिसत आहे. कांदा, गहू, हरभराबरोबरच द्राक्ष, डाळिंब बागा उद्धवस्त झाल्या. हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने उत्पन्नात प्रचंड घट झाली. द्राक्षांची मोठी हानी झाली. उरलेले द्राक्ष विकण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने अक्षरशः शेतकऱ्यांना कमी व मातीमोल भावामध्ये द्राक्ष विकावे लागत … Read more

गणपती बाप्पा मोरया..! संकष्टी चतुर्थीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपतीला 2000 किलो द्राक्षांची आरास

पुणे – “श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’तर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजला होता. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम आणि रसायनविरहित दोन हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह … Read more

कर्करोग रक्षक मानल्या जाणाऱ्या ‘या’ तीन फळांचा आजपासूनच करा आहारात समावेश !

गेल्या दशकात जगभरात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कर्करोग हा त्या प्राणघातक रोगांपैकी एक आहे जो दरवर्षी लाखो लोकांचा बळी घेतो. आधुनिक युगात, कर्करोगाच्या उपचारांवर सतत संशोधन चालू आहे, तरीही तो सर्वात प्राणघातक रोगांच्या यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहे. आरोग्य तज्ञांच्या मते, आपल्या आहारात समाविष्ट असलेल्या अनेक गोष्टींमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे कर्करोगाचा … Read more