उन्हाळ्यात कोणती फळं आरोग्याच्या दृष्टीने हितावह?

उन्हाळ्यात शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे आपल्याला सतत तहान लागते. परिणामी जास्त जेवणही जात नाही. अशा वेळी शरीरात आवश्यक असणा-या प्रोटिन्सची, कॅल्शिअमची, आणि पाण्याची कमतरता जाणवते. मग डोळ्यासमोर अंधारी येणं, लवकर थकून जाणं या गोष्टी होतात. उष्म्यानं लाही लाही होते. अशा वेळी आपल्याला साथ मिळू शकते ती रसरशीत फळांची. काही फळं जास्त रसरशीत नसली … Read more

‘एआरआय-516’ संकरित द्राक्ष वाण पुण्यात विकसित

पुणे – शहरातील डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी इन्स्टिट्यूटने (डीएसटी) अधिक रसदार द्राक्षांचे उत्पादनाचे वाण विकसित केले आहे. “डीएसटी’च्या स्वायत्त आघारकर संशोधन संस्थेतील (एआरआय) शास्त्रज्ञांनी ही द्राक्षाची संकरित जात विकसित केली आहे. बुरशीजन्य संसर्गाला प्रतिबंध करणारी, झुपकेदार आणि उत्तम रसाचा दर्जा असणारी आहे. याचा उपयोग पेय, मनुका, जॅम, रेड वाइन करण्यासाठी करता येणार असून, शेतकऱ्यांना … Read more

उन्हाळ्याच्या तोंडावर द्राक्षांचा हंगाम बहरला

येत्या काही दिवसांत आवक वाढणार; रविवारी पुण्यात 35 टन आवक पुणे – गोड, आंबट चवीच्या द्राक्षांचा हंगाम बहरला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात द्राक्षांची आवक वाढली आहे. रविवारी येथील घाऊक बाजारात तब्बल 35 टन इतकी आवक झाली. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने भावात 15 ते 20 टक्‍क्‍यांनी घसरण झाली असल्याचे श्री छत्रपती शिवाजी आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष … Read more

द्राक्षांचा हंगाम बहरला

पुणे – द्राक्षांचा हंगाम बहरला आहे. मार्केटयार्डातील ब्लॅक जम्बो, सोनाका, तासगणेश या द्राक्षांची आवक वाढली आहे. बाजारात दररोज सुमारे 20 ते 25 टन द्राक्षांची आवक होत आहे. द्राक्षाची चव गोड असून, ब्लॅक जम्बो द्राक्षांना जास्त मागणी असल्याचे आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची यांनी सांगितले. जिल्ह्यातील बारामती, इंदापूर तालुक्‍यांतून सर्वात जास्त ब्लॅक जंबो द्राक्षांची आवक होते. … Read more

द्राक्ष निर्यातीचा हंगाम सुरु; दुबई, युरोपियन देशांमध्ये मागणी वाढली

पुणे – यंदाच्या मोसमातील द्राक्ष निर्यातीला सुरवात झाली असून आत्तापर्यत 13 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी आगामी काळात ही निर्यात वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात साधारणत: डिसेंबर ते मार्च हा कालावधी द्राक्ष हंगामाचा असतो. जानेवारीपासून निर्यात सुरु होत असते. ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी … Read more

द्राक्षबागांवर ढगाळ हवामानाचा घाला

भवानीनगर – सध्या वातावरणात बदल होत असल्याने द्राक्ष बागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतकरी द्राक्षबागा टिकवण्यासाठी आर्थिक झळ सोसून औषध फवारणी करत आहे. त्यामुळे अवकाळीतून सावल्यानंतर आता ढगाळ हवामानाचा घाला बागांवर बसत आहे. थंडीचे दिवस सुरू असताना देखील वातावरणामध्ये बदल होत आहे. त्यामुळे द्राक्ष बागांवर अळी, डावणीचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांना द्राक्ष बागाटिकवण्यासाठी रोजच द्राक्षबागेवर … Read more

पावसाच्या शक्‍यतेने द्राक्षबागायतदार हवालदिल

पुणे – ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने फळबागा व शेतीला मोठा फटका बसला असताना आता ढगाळ हवामानाचे संकटही राज्यातील द्राक्षबागांसह अन्य पिकांवर घोंघावू लागले आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीतून आता कुठे शेतकरी सावरत असताना 4 डिसेंबरपर्यंत ढगाळ हवामान राहणार आहे. राज्याच्या विविध भागांत हलक्‍या सरी होण्याची शक्‍यता वर्तविली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरासह राज्याच्या बहुतांश भागावर … Read more

द्राक्षांसाठी संरक्षण कालावधी वाढवा

अनिल मेहेर : आंबिया बहार फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक नारायणगाव – जुन्नर तालुक्‍यात 5 हजार एकराहून अधिक क्षेत्र हे द्राक्ष पिकाखाली असून, द्राक्ष बागांचे शंभर टक्के नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाले आहेत. 2017-2018 आणि 2018-19 या आर्थिक वर्षात आंबिया बहार फळ पीक विमा योजनेंतर्गत द्राक्ष पिकाचा हवामान धोक्‍यासाठीचा संरक्षण कालावधी 16 ऑक्‍टोबर ते 31 … Read more

द्राक्षबागांवर पावसाचा कहर

इंदापूर, बारामती तालुक्‍यात तीन हजार एकर बागा संकटात : बागायतदार अडचणीत भवानीनगर – परतीच्या पावसाने इंदापूर व बारामती तालुक्‍यातील द्राक्ष बागा पूर्णपणे वाया गेल्या आहेत. पावसामुळे डाऊनी, करपा आणि मूळ कुज आदी रोगांनी द्राक्ष बागेचे अतोनात नुकसान झाले आहे. दोन्ही तालुक्‍यात साधारण 70 ते 80 टक्‍के बागा वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्‍त केली आहे. इंदापूर … Read more

दुष्काळामुळे सांगली द्राक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात

सोलापुरी द्राक्षांची हंगाम आणखी 15 दिवस पुणे – मार्केट यार्डात गोड, आंबट चवीच्या द्राक्षांची होणारी आवक घटली आहे. पुणे आणि सांगली जिल्ह्यातील द्राक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. तर, सोलापूर जिल्ह्यातील द्राक्षांचा हंगाम आणखी पंधरा ते वीस दिवस सुरू राहणार आहे. दरवर्षी द्राक्षांचा हंगाम नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू झाला होता. त्यावेळी द्राक्षांची आवक ही किरकोळ होती. … Read more