‘एक तारीख एक तास’ : उपक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे श्रमदान; स्वच्छता ही लोकचळवळ झाल्याचे प्रतिपादन

पुणे :- स्वच्छता हीच सेवा या अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या उपक्रमात पुणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित वॉकेथॉनमध्ये सहभागी होऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हाती झाडू घेत श्रमदान केले. स्वच्छता ही लोकचळवळ झाली असून स्वच्छतेबाबतची आपल्या देशाविषयीची प्रतिमा बदलत आहे, असे प्रतिपादन मंत्री पाटील यांनी केले. यावेळी पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त … Read more

#ganeshotsav 2023: पुण्यातील विसर्जन मिरवणूकीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा मेट्रोने प्रवास

पुणे : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला साडेदहा वाजता सुरुवात होईल. महात्मा फुले मंडईसमोर पालकमंत्र्यांच्या हस्ते नारळ फोडून विसर्जन मिरवणूक सुरु होणार आहे. त्यासाठी मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मेट्रोने प्रवास केला. पहिले पाच मानाचे गणपती बेलबाग चौकात येऊन लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ होणार आहेत. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यंदा साडेचार वाजता मिरवणुकीत सहभागी होणार … Read more

Pune : वाघोली बाह्यवळण रस्त्यासाठी 40 कोटीची तरतूद करावी; पालकमंत्र्यांचे मनपा प्रशासनाला आदेश

वाघोली :- पुणे मनपात समाविष्ट झालेल्या वाघोलीची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी वाघोली बाह्यवळण रस्त्यासाठी 40 कोटी रुपयांची निधीची तरतूद करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे मनपा प्रशासनाला दिले आहेत. वाघोली येथील विकास कामांच्या बाबतीत पुणे महानगरपालिकेच्या कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पुणे महानगरपालिकेचे सर्व प्रशासकीय अधिकारी, … Read more

Pune : पुणेकरांना मोठा दिलासा! सोमवारपासून शहराची पाणी कपात रद्द

पुणे :- खडकवासला प्रकल्प क्षेत्रात पुरेसा पाऊस झाल्याने आणि प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने पुणे शहरासाठी प्रत्येक आठवड्यात करण्यात येणारी पाणी कपात येत्या सोमवारपासून रद्द करण्याचे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. यासंबंधाने शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीस महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जलसंपदा विभागाचे अधीक्षक … Read more

‘युनिव्हर्सिटी-२०’ परिषद उच्च शिक्षणाच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी – पालकमंत्री पाटील

पुणे :- ‘युनिव्हर्सिटी-२०’ परिषद म्हणजे उच्च शिक्षण आणि विद्यापीठांच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी आहे, प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या लवळे कॅम्पस येथे आयोजित ‘युनिव्हर्सिटी-२०’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारताच्या जी-२० अध्यक्षतेचे मुख्य समन्वयक हर्षवर्धन … Read more

Pune : पुणे पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेसाठी 100 कोटी रुपयांचा निधी- पालकमंत्री पाटील

पुणे :- पुणे व पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेकरीता जिल्हा नियोजन समितीमधून ५० कोटी आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून ५० कोटी असे एकूण १०० कोटी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापैकी ४१ कोटी रुपये मंजूर करण्यात येत असून उर्वरित रक्कम लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील … Read more

पुरंदरच्या पायथ्याशी शंभूसृष्टी उभारू ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील : किल्ले पुरंदरवर जयंती साजरी

सासवड/दिवे – छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा शासकीय करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात होणारा पुतळ्याचे काम लवकरच सुरू करणार आहोत. पुरंदर पंचायत समिती, पुरंदर प्रतिष्ठान संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने यापुढे शासकीय जयंती साजरी करण्यात येईल आणि किल्ल्याच्या पायथ्याशी शंभूसृष्टी उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे आश्‍वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण … Read more

‘महापालिका हद्दीत निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी बांधील’ – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मांजरी बुद्रुक च्या पाण्यासाठी मी कटिबद्ध- माजी आमदार योगेश टिळेकर मांजरीतील ४२ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेतील पहिल्या टप्प्यातील कामाचे लोकार्पण मांजरी –  महानगरपालिका हद्दीत निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी बांधिल आहे. त्यामुळे त्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करु, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत मांजरी बुद्रुकसाठी मंजूर ४२ कोटीच्या पाणीपुरवठा … Read more

बाणेर-बालेवाडीतील प्रलंबित कामे तत्काळ मार्गा लावा; पालकमंत्र्यांचे महापालिकेस आदेश

पुणे – बाणेर-बालेवाडी भागात समान पाणी योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी आवश्‍यकस असलेल्या ट्रान्समिशन जलवाहिन्यांची कामे काही भागात अपूर्ण अवस्थेत आहेत ही कामे तातडीनं पूर्ण करण्याचे पत्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेस दिले आहेत. याबाबत भाजप नगरसेवक अमोल बालवडकर यांनी या कामाच्या सदस्थितीची माहिती पालकमंत्री पाटील यांना पत्राद्वारे कळविली होती. त्याची गंभीर दखल घेत महापालिकेस याबाबत … Read more

पिंपरी चिंचवड – पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे शिंदे गटाची पाठ ! आजी-माजी खासदारांची अनुपस्थिती; कार्यकर्त्यांचाही उत्साह मावळल्याचे चित्र

  पिंपरी, दि. 21 (प्रतिनिधी) – ओला आणि सुका कचरा त्याच ठिकाणी प्रक्रिया करण्याच्या केंद्र शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आल्याने भाजपाला उच्चभ्रू वसाहतीतील उच्चशिक्षीत वर्गाचा रोष ओढवून घ्यावा लागला. हा आदेश पाठीमागे घेण्याची घोषणा करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या या बैठकीकडे शिंदे गटाचे … Read more