Leaking BSF Information : हेरगिरी प्रकरणी गुजरात ‘ATS’कडून एकाला अटक

अहमदाबाद :- संरक्षण क्षेत्राशी संबंधित गोपनीय माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना “आयएसआय’चे नेटवर्क गुजरात “एटीएस’ने उद्‌ध्वस्त केले असून “बीएसएफ’ची गोपनीय माहिती “आयएसआय’ला पुरवल्याबद्दल कच्छमधून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. निलेश बलिया असे या संशयिताचे नाव आहे. निलेश बलिया याने “हनी ट्रॅप’मध्ये अडकून ही महत्वाची माहिती पुरवली असल्याचा आरोप आहे. त्याने पाकिस्तानमधील आदिती नावाच्या इंटरनेट … Read more

गुजरात ‘एटीएस’ची मोठी कारवाई; पोरबंदर शहरातून चार दहशतवाद्यांना केली अटक

पोरबंदर (गुजरात)  – गुजरात पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पोरबंदर शहरातून आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंधित एका विदेशी नागरिकासह चार जणांना अटक केली आहे. एटीएसचे विशेष पथक गेल्या काही दिवसांपासून पोरबंदर आणि परिसरात विशेष कारवाईसाठी सक्रिय होते. एटीएसने पाळत ठेऊन दहशतवादी संघटनेशी संबंधित एका परदेशी नागरिकासह या चार जणांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचे आंतरराष्ट्रीय … Read more

Gujarat : बडोदा शहरातून 500 कोटींचे प्रतिबंधित ड्रग जप्त

अहमदाबाद  – गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने बडोदा शहराच्या बाह्य भागातील एका उत्पादन युनिटवर छापा टाकून सुमारे 500 कोटी रुपयांच्या प्रतिबंधित एमडी ड्रगचा मोठा साठा जप्त केला आहे. (Gujarat ATS raids factory near Vadodara, recovers drugs worth ₹500 crore) या ड्रगमध्ये अंमलीपदार्थाचा वापर करण्यात आला होता. औषधी गोळ्यांच्या नावाखाली थेट अंमलीपदार्थच विकण्याचा उद्योग तेथे सुरू होता. घटनास्थळी … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींना ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी ! गुजरात ATS ने तरुणाला घेतले ताब्यात

नवी दिल्ली -गुजरातमधील अहमदाबादच्या एटीएसने शनिवारी रात्री बदायूं जिल्ह्यात छापा टाकून आदर्श नगर मोहल्ला येथे राहणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. तरुणाने पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) मेल करून पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे.ताब्यात घेतलेल्या तरुणाची चौकशी एटीएसकडून करण्यात येणार आहे. सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनमध्ये मीडिया कर्मचाऱ्यांची गर्दी पाहून एटीएसने तरुणाला एसएसपीच्या निवासस्थानी नेले. तेथे त्याची … Read more

गुजरातमध्ये पुन्हा आढळला कोट्यवधींचा अंमली पदार्थ साठा, मुंद्रा बंदरावर तब्बल…

अहमदाबाद  – गुजरातमध्ये पुन्हा कोट्यवधी किमतीचा अंमली पदार्थ साठा आढळला. त्या राज्यातील मुंद्रा बंदरावरून 376 कोटी रूपयांचे 75 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. ती कारवाई गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केली. मुंद्रा बंदरालगत असणाऱ्या कंटेनरमध्ये हेरॉईनचा साठा आढळला. कपड्यांच्या गुंडाळ्यांमध्ये तो दडवण्यात आला होता. तो साठा संयुक्त अरब अमिरातीमधून (यूएई) पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. मुंद्रा … Read more

मोठी बातमी : मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी चौघांना अटक; गुजरात एटीएसची कारवाई

नवी दिल्ली : गुजरात एटीएसने अत्यंत मोठी कारवाई केली असल्याची माहिती समोर येत आहे.  मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी चौघांना अटक करण्यात आल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांची एटीएसकडून कसून चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी आज चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती … Read more

2006 बॉम्बस्फोट प्रकरण : मोहसीन पूनावाला याला पुण्यातून उचलले

गुजरात एटीएसची कारवाई  पुणे -अहमदाबादमधील कालुपुरा रेल्वेस्थानक परिसरात 2006 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी मोहसीन पूनावाला याला गुजरात राज्य दहशतदवादी विरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातून अटक केली. त्याला गुजरातला नेण्यात आले आहे. “या कारवाईसाठी गुजरात एटीएसने पुणे पोलिसांकडे मदत मागितली होती. मंगळवारी त्याला अटक करण्यात आली आहे,’ अशी माहिती परिमंडळ-5 च्या पोलीस उपायुक्‍त नम्रता पाटील … Read more