पाकिस्तानच्या मतदारांनी दहशतवादाला नाकारले, हाफिज सईदच्या लेकाचा दारुण पराभव

Pakistan :  पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल येत आहे. पीटीआय समर्थित आझाद आणि नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन यांच्यात निकराची लढत आहे. दहशतवादी हाफिज सईदमुळे भारतीयांनाही या निवडणुकीत उत्सुकता आहे. सईदचा पक्ष पाकिस्तानी मरकझी मुस्लिम लीगने अनेक जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यापैकी एका जागेवर हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदही उमेदवार होता. मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत … Read more

दहशतवादी हाफीज सईदला ताब्यात देण्याची भारताची पाकिस्तानकडे मागणी

इस्लामाबाद – पाकिस्तानात वास्तव्याला असलेला दहशतवादी हाफीज सईद याला भारताच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी भारताने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे केल्यानंतर भडकलेल्या पाकिस्तानने आता पुन्हा एकदा काश्‍मीर प्रश्‍नावरून गरळ ओकण्यास सुरूवात केली आहे. हाफीज सईद हा मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड असून भारताला तो हवा आहे. दरम्यान, भारताने सईदला ताब्यात देण्याची मागणी केल्याच्या वृत्ताला पाकिस्तानच्या … Read more

Pakistan Hafiz Saeed Son : दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा पाकिस्तानात निवडणूक लढवणार ; ‘अल्लाह-हू-अकबर’ पक्षाकडून दावा

Pakistan Hafiz Saeed Son :  मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रान्समधील एका वृत्तपत्रानुसार, तलहा सईदने पाकिस्तानमध्ये आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अल्लाह हू अकबर तेहरीक पार्टीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तल्हा सईदने जोरदार तयारी सुरू केली आहे. भारत सरकारने हाफिज सईदचा … Read more

Pakistan : हाफिज सईदच्या घराबाहेरील स्फोट भारताने घडवला; पाकिस्तानचा कांगावा

इस्लामाबाद – मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईदच्या लाहोरमधील घराबाहेर गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या स्फोटामागे भारताचा हात होता, (Pakistan alleges India was involved in blast outside Hafiz Saeed’s residence) असा कांगावा पाकिस्तानने केला आहे. या स्फोटामागे भारताचा हात असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचेही पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी म्हटले आहे. या संदर्भातील पाकिस्तानची भूमिका संपूर्ण जगासमोर … Read more

‘या’ कारणामुळे हाफिज सईदच्या घराबाहेर पाकिस्तानी लष्करानेच घडवला स्फोट ?

लाहोर – मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी हाफिज सईद याच्या घराबाहेर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी पाकिस्तानच्या पोलिसांनी आज पंजाब प्रांतात छापासत्र केले. एकाचवेळी अनेक शहरांमध्ये हे छापे घालण्यात आले आणि अनेकांना ताब्यात घेण्यात आले. हाफिज सईदच्या घराबाहेर पोलिसांनी उभ्या केलेल्या कुंपणाजवळ झालेल्या कार बॉम्बच्या स्फोटात किमान तिघेजण ठार झाले होते आणि 21 जण जखमी झाले होते. … Read more

‘हाफिझ सईद’च्या आणखी दोन साथीदारांना ‘तुरुंगवास’

लाहोर – जमात उद दावाचा म्होरक्‍या आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिझ सईदच्या आणखी दोन साथीदारांना पकिस्तानातील न्यायालयाने टेरर फंडिंग प्रकरणी तुरुंगवास सुनावला आहे. लाहोरमधील दहशतवाद विरोधी न्यायलयाने “जेयुडी’चे नेते असलेल्या मुहम्मद अशर्रफ अणि ल्युकमन शाह यांना अनुक्रमे 6 आणि साडे पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. “एटीसी’चे न्यायाधीश अरशद हुसेन भुट्टा यांनीही या प्रत्येकाला … Read more

मोठी बातमी : २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला दहा वर्षे कारावासाची शिक्षा

कराची – मुंबईवरील वर्ष 2008 मधील 26/11 च्या गाजलेल्या हल्ल्याचा सूत्रधार, कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याला पाकिस्तानच्या पंजाब न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. याप्रकरणाची सुनावणी आजच पूर्ण झाली. त्यानंतर टेरर फंडींग अर्थात दहशतवादी कारवायांना आर्थिक पुरवठा करण्याच्या दोन प्रकरणांत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. पंजाब न्यायालयाने हाफिज सईदला दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली असून त्याला 1 … Read more

ईडीकडून तोयबाचा संस्थापक हाफिज सईदविरोधात आरोपपत्र

नवी दिल्ली – पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईद याच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले. दहशतवादासाठी पैसा पुरवण्याशी (टेरर फायनान्सिंग) संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ते पाऊल उचलण्यात आले. टेरर फायनान्सिंग प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) याआधीच सईद आणि पाकिस्तानस्थित फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशनविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ते फाऊंडेशन सईद याच्याशीच संबंधित आहे. एनआयएच्या … Read more

हाफिज सईदचे बॅंक खाते झाले खुले

इस्लामाबाद – जमात उद दावाचा म्होरक्‍या, मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड, लष्कर ए तोयबाचा संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या हाफिज सईद आणि त्याच्या संस्थांच्या पाच प्रमुख नेत्यांची बॅंक खाती पाकिस्तान सरकारने खुली केली आहेत. संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीने मंजूरी दिल्यानंतर पाकिस्तान सरकारने ही खाती खुली केली आहेत. एका इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाने यासंदर्भातील … Read more

“टेरर फंडिंग’ प्रकरणी दोषी नसल्याचा हाफिझ सईदचा दावा

लाहोर : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माईंड हाफिझ सईद याने “टेरर फंडिंग’च्या दोन प्रकरणांमध्ये दोषी नसल्याचा दावा पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी न्यायालयामध्ये केला आहे. “जमात उद दावा’ या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढायला लागला असताना सईदचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. दहशतवाद विरोधी विभागाने सईद आणि त्याच्या सहकाऱ्यांच्याविरोधात पंजाब प्रांतातील वेगवेगळ्या शहरात … Read more