नगर | सीना नदीतील अतिक्रमणांवर ‘मनपा’चा हातोडा

नगर |  महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील काटवन खंडोबा परिसरातील गाझीनगरजवळील गट क्रमांक ३८ मधील एकाडे सॉमीलसमोर सीना नदीपात्रालगत अतिक्रमण करून बांधलेले सिमेंटचे वॉल कम्पाऊंड व दोन पत्र्याचे शेड जेसीबीच्या सहाय्याने हटविले. दरम्यान, सीनाच्या हरित पठ्यातील इतरही अतिक्रमणे मनपाच्यावतीने हटविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सीना नदीलगत असलेल्या गाझीनगर परिसरात नदीच्या हरित पठ्यात बेकायदेशीर रेखांकने … Read more

PUNE : ‘बीडीपी’तील अनधिकृत बांधकामावर हातोडा

कात्रज – महादेवनगर येथील सर्वे नंबर 38 आर.के.कॉलनी व सर्वे नंबर 36 स्वामी समर्थ नगर येथील जैवविविधता क्षेत्रांतर्गत (बीडीपी) आरक्षित जागेवर करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग-2च्या वतीने धडक कारवाई करीत सुमारे पाच हजार चौरस फुटाचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. महापालिका अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, प्रभारी कार्यकारी अभियंता हेमंत मोरे यांच्या नियंत्रणाखाली शाखा … Read more

100 अतिक्रमणांवर हातोडा! आम्ही राजगुरूनगरच्या पाठपुराव्याला यश : गर्भश्रीमंतांना कारवाईतून वगळले

राजगुरूनगर – राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावर पथारीधारकांची 100 अतिक्रमणे आम्ही राजगुरूनगरकरच्या आंदोलनामुळे गुरुवारी रात्री नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रांत, तहसीलदार आणि पोलिसांच्या संयुक्‍त कारवाईतून हटवली. यामध्ये गरिबांवर कारवाई आणि श्रीमंतांना अभय दाखविण्यात आले. ज्यांनी रस्त्यावर पक्‍की बांधकामे केली. त्याबाबत आम्ही राजगुरूनगरकर काय भूमिका घेणार की श्रीमंतांना अभय देणार, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. वाडा … Read more

Pune Crime : दत्तवाडी पोलिसांचा लोहारावरच ‘हातोडा’

पुणे – शहरात गुन्हेगारीसाठी कोयत्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. सध्या तर साऊथ इंडियन चित्रपटातील स्टाईलचे कोयते गुन्हेगार वापरु लागले आहे. दहशत, खून, खूनाचा प्रयत्न आणी अगदी खंडणी मागण्यासाठीही कोयत्यांचा सर्रास वापर होत आहे. गुन्हेगारांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेले कोयते हस्तगत केले जातात. मात्र तरही गुन्हेगारांकडे तसेच अल्पवयीन गुन्हेगारांकडेही नव नव्या पध्दतीचे कोयते दिसत … Read more

हाथरस प्रकरण : पत्रकारावर हातोडा !

लखनौ/ तिरुवनंतपुरम – हाथरस प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी एका पत्रकाराला अणि अन्य तिघाजणांना मथुरा येथून अटक केली. हे सर्वजण हाथरसच्या दिशेने जात असताना त्यांना अटक करण्यात आली. हाथरसमधील दलित युवतीवरील सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित चौघांना आणि त्यांच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. असे उत्तर प्रदेश पोलिसांनी सोमवारीच सांगितले होते. नागरिकत्व … Read more

पिंपरीमध्ये हातोडा चाललाच नाही

अनधिकृत बांधकामांमध्ये भर ः “लॉकडाऊन’मुळे कारवाई रखडली पिंपरी (प्रतिनिधी) – अनधिकृत बांधकामांचे शहर अशी ओळख होऊ पाहत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊनच्या सहा महिन्यांत केवळ एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळातील निर्बंध लक्षात घेता, उपलब्ध होणारे पोलीस बळ, साधनसामग्री आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे कारवाई रखडली आहे. अनलॉकनंतरही या कारवाईत फारशी गती येईल, अशी परिस्थिती … Read more

अरेरे! जेट एअरवेजची काय ही अवस्था; टॉवेल-ट्रॉली आणि कपबशांचा लिलाव

एक काळ असा होती की, जेट एअरवेज कंपनी विमानातील पहिल्या वर्गातील प्रवाशांना रोझेनथाल क्रोकरी आणि विल्यम एडवर्ड सिरॅमिक वेअर या सुप्रसिद्ध ब्रँडच्या प्लेट आणि कपबशांमधून चहा-कॉफी आणि खाद्यपदार्थ देत असे. आता दिवाळखोरीत निघालेल्या या कंपनीच्या विमानतील क्रोकरी आणि कटलरी तसेच टॉवेल-ट्रॉली आणि अशाच अनेक गोष्टींचा लिलाव केला जात आहे.  नेदरलँडमधील एच. एस्सेर फायनान्स कंपनी आणि … Read more

अवैध लचकेतोडीवर हातोडा!

राज्य महसूल, वन खात्याचे जिल्हाधिकारी राम यांना लेखी आदेश दावडी : कनेरसर (ता. खेड) येथील खेड सिटी इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीकडून झालेले अवैध डोंगर उत्खनन, वृक्षतोड, गौणखनिज गैरवापर याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन खात्याने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना तातडीने कार्यवाहीचे लेखी आदेश दिले आहेत. वनखात्याच्या या आदेशाने जिल्ह्यातील वनविभागाच्या उोंगरांवर लचकेतोड थांबणार आहे, हे अधोरेखित … Read more

साताऱ्यातील अतिक्रमणांवर आज पडणार हातोडा

मुख्याधिकाऱ्यांकडून 15 जणांच्या टास्क फोर्सची स्थापना सातारा (प्रतिनिधी) – सातारा शहराच्या पाच विकास आराखड्यांना ग्रहण लावणारी अतिक्रमणे पालिकेच्या रडारवर आहेत. अनधिकृत टपऱ्या व अन्य अतिक्रमणांच्या आडून दलाली करणाऱ्यांकडून येणारा दबाव झुगारून पालिकेकडून कारवाईची अपेक्षा आहे. शहरात उद्या, दि. 17 पासून सुरू होणाऱ्या अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी मुख्याधिकारी शंकर गोरे 15 अधिकाऱ्यांची दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात … Read more

प्लॉटिंग कार्यालयावर हातोडा

पीएमआरडीएकडून केसनंद येथे अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई वाघोली (प्रतिनिधी)- केसनंद (ता. हवेली) येथे पुणे महानगर प्रादेशिक प्राधिकरण यांच्याकडून बेकायदेशीरपणे उभे राहिलेल्या मंगलमूर्ती वास्तू प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयावर हातोडा टाकत बांधकाम पाडण्यात आले. बेकायदेशीरपणे प्लॉटिंगमधील अनधिकृत बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याबाबत येणाऱ्या तक्रारींचा आलेख देखील तालुक्‍यात वाढला आहे. केसनंदमध्ये असणाऱ्या मंगलमूर्ती वास्तू प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालयावर पोलीस … Read more