पुणे जिल्हा : पावसाच्या आगमनाने शेतकरी राजा सुखावला

वीसगाव खोरे – गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वीसगाव खोऱ्यातील भात पिकाची तरव्याची रोपे तरारून आली आहेत. वेळेवर व रोज पाऊस पडत असल्याने शेतकरीराजा सुखावला आहे. गेले तीन दिवस पाऊस पडत असल्याने शेतकरी जमिनीला वाफसा येण्याची वाट पाहत आहे. यंदा अवकाळी पाऊस मे महिन्यात झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी करायला वेळ मिळाला. मशागतपूर्व शेतीची … Read more

इमरान खानचे 9 वर्षानंतर कमबॅक; नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

Imran Khan Comeback|

Imran Khan Comeback|  अभिनेता इमरान खानने ‘जाने तू या जाने’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र त्यानंतर त्याला सिनेसृष्टीत फार चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र इंडस्ट्रीतून ब्रेक घेतल्यानंतर आता 9 वर्षानंतर इमरान  खान अभिनयाच्या दुनियेत परतणार आहे. ‘हॅप्पी पटेल’ असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. … Read more

पुणे जिल्हा : भीमा नदीकाठावरील शेतकरी सुखावले

भामा आसखेडमधून पाणी सोडले मांडवगण फराटा – भीमानदीला शेतीसाठी पाणी सोडावे यासाठी भीमानदी तीरावरील सर्व गावाच्या सरपंच यांनी पाटबंधारे विभाग, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. दोन्ही तालुक्यांतील आजी- माजी आमदार यांनी प्रयत्न केला. त्यामुळे भीमा नदीमध्ये भामा आसखेड धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील … Read more

राज्यात कोणताही शेतकरी, युवक सुखी नाही – महादेव जानकर

रासपच्या जनस्वराज्य यात्रेला इंदापूर तालुक्‍यात प्रतिसाद इंदापूर – जनता आता पाहत आहे. वेगवेगळ्या पक्षात कशा घडामोडी चालल्या आहेत. महाराष्ट्रातील कोणताही शेतकरी व युवक सुखी नाही. ज्यांना आम्ही स्वतःचे नेते म्हणत आहोत. ते आज वेगळा विचाराने वागत असल्याचे दिसते. जनस्वराज्य यात्रा इंदापूर तालुक्‍यात आल्यानंतर निमगाव केतकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांची बैलगाडीतून … Read more

पुरस्कारामुळे मी अधिक समृद्ध – राहुल देशपांडे

  प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 -“मी वसंतराव’ चित्रपटातील माझ्या भूमिकेबद्दल अनेकांच्या मनात साशंकता होती. दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला. त्यांनी चित्रपटाचे जे चित्र मनात निर्माण केले, ते साकारण्याचा प्रयत्न आम्ही केला. या चित्रपटातील माझ्या अभिनयाला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारामुळे व्यक्ती आणि गायक म्हणून मी अधिक समृद्ध झालो, अशी भावना प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे … Read more

#IPL2022 | आयपीएलशी जोडले गेल्याचा आनंद – गौतम गंभीर

नवी दिल्ली –  खेळाडू म्हणून कारकीर्द संपली असली तरीही पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेशी जोडले गेल्याचा आनंद आहे, असे मत भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू व कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे. पुढील वर्षीपासून या स्पर्धेत लखनौ व अहमदाबाद हे दोन नवे संघ दाखल होत असून त्यातील लखनौ संघाने गंभीरला मेंटॉर म्हणून … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा

मुंबई :- ईद-ए-मिलाद अर्थात प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ईद-ए-मिलादाचा उत्सव साजरा करताना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, हजरत पैगंबर यांनी मानव कल्याणाचा मार्ग दाखविला. त्यांनी दिलेल्या शिकवणीला अनुसरून परस्परांचा आदर करूया, स्नेह वृद्धिंगत करूया. उत्सव साजरा करताना एकमेकांच्या आरोग्याचीही … Read more

#KrishnaJanmashtami2021 : ‘उत्सवात संयम राखूया, कोरोनाला हद्दपार करूया’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : भगवान श्रीकृष्ण यांनी वाईट प्रवृत्ती, अनिष्टांचे निर्दालन केले. त्यांच्या या जन्माष्टमी उत्सवातून प्रेरणा घेऊन आपण अस्वच्छता, अनारोग्य आणि कोरोना विषाणूला हद्दपार करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जन्माष्टमी नंतरच्या दहीहंडी उत्सवातही संयम राखूया. कृष्णाला सखा सर्वोत्तम मानले जाते. ते सर्व प्राणिमात्रांची आणि जीवलगांची काळजी वाहतात. त्यांना … Read more

पाबळ : लॉकडाऊन रद्द होण्याचे संकेत,व्यापाऱ्यांच्या मागणीला प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद

पाबळ (प्रतिनिधी) – येथील छोट्यामोठ्या व्यापाऱ्यांनी एकत्र येत व्यापारी वर्गाला विश्‍वासात न घेता लादण्यात येत असलेल्या तसेच चुकीच्या निकषांवर आधारित होत असलेल्या लॉकडाऊनच्या विरोधात शंभरावर अधिक उपस्थित व्यापाऱ्यांच्या बैठकीत व्यथा मांडली. यावेळी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याशी थेट संपर्क साधण्यात आल्यावर लॉकडाऊन रद्द करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने नुकतेच जाहीर करण्यात आलेले सात दिवसाचे लॉकडाऊन रद्द … Read more

पुणे जिल्हा :आंबेगाव तालुक्यात बटाटा उत्पादक खूश!

रांजणी (वार्ताहर) – आंबेगाव तालुक्यात नागापूर, थोरांदळे परिसरात बटाटा काढणीची कामे सुरु झाली आहेत. सध्या बटाट्याला 10 किलोला 350 ते 370 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे. नागापूर, रांजणी, थोरांदळे आदी परिसरात बटाटा पिक घेणाऱ्या शेतकरी वर्गाचे प्रमाण जास्त आहे. यंदा बटाट्याला चांगला बाजारभाव मिळण्याची आशा शेतकऱ्यांना होती. त्यानुसार आता चांगला बाजारभाव मिळत … Read more