राज्यातील जनतेला नवीन वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून हार्दिक शुभेच्छा

मुंबई : कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्याचा आणि त्यासाठी आपल्या वैयक्तिक आरोग्याबरोबर इतरांच्या आरोग्याची देखील काळजी घेण्याचा संकल्प आपण नव्या वर्षासाठी करूया असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणाले, गेले वर्षभर संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्राने देखील लोकांच्या सहभागाने आणि अतिशय जबाबदारीने … Read more

कडेकोट संचारबंदीत… हॅप्पी न्यू ईअर

पुणे – सरत्या वर्षाला निरोप देत, नवीन वर्षाचे जल्लोषाने स्वागत करण्यासाठी दरवर्षी पुणेकरांमध्ये मोठा उत्साह असतो. शहरातील फर्गसन रस्ता, कॅम्प परिसरातील एमजी रस्ता तसेच अन्य काही भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत विशेषत: तरुणाईची तुफान गर्दी असते. यावेळी मात्र हा उत्साह पहायला मिळाला नाही. संचारबंदीच्या नियमांमुळे यंदा घरच्या घरीच सेलिब्रेशन करण्यात आले. करोना संसर्गाचा धोका व नवीन करोनाचे … Read more

नववर्षात विमानप्रवासही महागला

पुणे – विमानप्रवास भाड्यात दि.1 जानेवारीपासून वाढ करण्यात आली आहे. हवाई इंधनदरात वाढ झाल्याने महत्त्वाच्या मार्गांवरील विमान तिकीटदरांत सुमारे 300 ते 500 रुपये वाढ झाली आहे. केंद्र सरकारने 1 जानेवारीपासून हवाई इंधनदरात 2.5 टक्के वाढ केली. यानंतर मुंबईत इंधनाचा दर 62.68 रुपये प्रति लिटरवर गेला. मुंबईहून सर्वाधिक उड्डाणे दिल्लीसाठी आहेत. इंधनातील दरवाढ 1.57 रुपयांची असून … Read more

हॅपी न्यू ईयर…

सकाळची वेळ. दादा आरामखुर्चीत बसला होता. त्याची नेहमीची सवय. समोर टीपॉयवर चहाचा कप होता आणि हाती होता मोबाइल. आज नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे मेसेज तो पाहत होता. किती मेसेज! मेसेज बॉक्‍स नुसता भरभरून गेला होता. ते पाहत असतानाच रेडिओवरच्या गाण्याचे सूर त्याच्या कानात शिरले. समुद्री चुहूकडे पाणी पिण्याला थेंबही नाही कळा ज्या लागल्या जिवा मला … Read more

शहरात 68 बालकांचा नवीन वर्षाच्या मुहूर्तावर जन्म

पिंपरी – नवीन वर्षाच्या मूहर्तावर शहरामध्ये 68 बालकांचा जन्म झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1 जानेवारी 2020 या दिवशी 68 बालकांचा जन्म झाल्याची नोंद आहे. वर्षाच्या पहिल्या दिवशी बाळाचा जन्म शुभ मानला जातो. 2020 या वर्षीच्या पहिल्या दिवशी 38 मुलींचा जन्म झाला आहे. तर 30 मुलांचा जन्म झाला आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये या दिवशी 15 … Read more

नववर्षाला नवजन्मातही मेरा भारत महान

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जगभरात जवळपास चार लाख चिमुकल्यांनी या जगात पाऊल ठेवले. या दिवशी जन्मलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या भारतातील बाळांची आहे, संयुक्त राष्ट्रे आंतरराष्ट्रीय बाल निधी (युनिसेफ) या संस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली. जगभरात तीन लाख 92 हजार 78 अर्भकांचा जन्म झाला. त्यापैकी भारतात 67 हजार 385 बाळे जन्माला आली. त्यापाठोपाठ चीनमध्ये … Read more

पिंपरीत 202 तळीरामांवर कारवाई

पिंपरी – नववर्षाच्या पूर्वसंध्येला मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्या 202 तळीरामांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. सर्वाधिक कारवाई भोसरी पोलिसांनी केली. तर सर्वात कमी कारवाई चाकण पोलिसांच्या हद्दीत झाली. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांमुळे कोणताही अपघात होऊ नये म्हणून 31 डिसेंबर रोजी पोलीस शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करतात. दारू पिऊन वाहने चालवणाऱ्या संशयित चालकांची पोलिसांनी ब्रीद ऍनालायजरच्या साहाय्याने … Read more

पुणे पोलिसांच्या ‘त्या’ ट्विटवर नेटकऱ्यांनी दिली कौतुकाची थाप

पुणे – ‘अगर मैने आप लोगो को अड्डा बताया तो १० पुडीया मेरी. चलेगा ना सर ?’ असं ट्विट करत एका ट्विटर युजरने पुणे पोलिसांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला. परंतु पुणे पोलिसांनीही अगदी मजेशीर पद्धतीने त्यावर रिप्लाय केला. यानंतर पुणे पोलिसांच्या हजरजबाबी उत्तरावर नेटकरी चांगलेच खुश झाले असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. अप्रतिम … Read more

रडतोस काय वेड्या?… लढण्यात शान आहे

नवी दिल्ली – जगभरात मित्र-मैत्रिणी, कुटुंबीयांसमवेत सरत्या वर्षाला नागरिकांनी निरोप दिला. तसेच नवीन वर्षाचे भारतीय जवानांनीही मोठ्या जल्लोषात स्वागत केले. नेहमी कर्तव्यावर असताना देशाच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या जवानांनी नृत्याचा आनंद लुटला. नववर्षाचं स्वागत करताना उत्तराखंडमध्ये आयटीबीपीच्या जवानांनी गाण्यावर ठेका धरला. छत्तीसगढमधील रायपुर येथे सीआरपीएफच्या जवानांनी काही अशा प्रकारे नववर्षाचं स्वागत केलं. याप्रसंगीचे व्हिडीओ आता … Read more

‘हॅपी न्यू इयरचा’ पुण्यात जल्लोष…

पुणे – शहारात विविध ठिकाणी गर्दीने फुललेले रस्ते, गुलाबी थंडीत मित्र-मैत्रिणी, कुटुंबीयांसमवेत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जमलेले नागरिक, मनपसंत खाद्यपदार्थ, संगीत आणि खरेदीचा आनंद घेत आणि रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेले “काऊंटडाउन’ आणि घड्याळात बाराचा ठोका पडताच झालेला “हॅपी न्यू इयरचा’ जल्लोष… अशा उत्साही वातावरणात पुणेकरांनी बुधवारी मध्यरात्री नववर्षाचे स्वागत केले. नागरिकांनी मित्र-मैत्रिणी आणि … Read more