नववर्षाचे जगभरात जल्लोषात स्वागत

नवी दिल्ली – जगभरात विविध ठिकाणी गर्दीने फुललेले रस्ते, गुलाबी थंडीत मित्र-मैत्रिणी, कुटुंबीयांसमवेत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जमलेले नागरिक, मनपसंत खाद्यपदार्थ, संगीत आणि खरेदीचा आनंद घेत आणि रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेले “काऊंटडाउन’ आणि घड्याळात बाराचा ठोका पडताच झालेला “हॅपी न्यू इयरचा’ जल्लोष… अशा उत्साही वातावरणात बुधवारी मध्यरात्री नववर्षाचे स्वागत केले.

नववर्षाच्या आगमनाला शहरातील हॉटेल्स पहाटे 5 पर्यंत राहणार सुरू

पुणे – नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यपान मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यासाठी मंगळवारी (दि. 31) रात्री हॉटेल पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच, पार्ट्यांमध्ये मद्य पुरविण्यासाठी एक दिवसीय परवाने देण्यात आले आहेत. मद्यालयातून विक्री होणारे तसेच पार्टीत पुरवले जाणाऱ्या मद्यातील भेसळ रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे 14 पथके लक्ष ठेवणार आहे. मद्य पिण्याचा परवाना घ्या, विनापरवाना देशी-विदेशी … Read more

कॅम्प, फरासखाना परिसरात वाहनांना पर्यायी रस्ते

पुणे – सुरू असणाऱ्या वर्षाची सांगता आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील नागरिक विविध रस्त्यांवर आनंदोत्सवात सहभागी होतात. यावेळी वाहनांचीदेखील अधिक रहदारी असते. या काळात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली. अग्निशमन दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्‍यक सेवेतील वाहने वगळता पुणे शहरातील कॅम्प, फरासखाना … Read more

‘लायन्स पॉइंट’वर पर्यटकांना ‘नो एण्ट्री’

“थर्टी फर्स्ट’, नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर लोणावळा पोलिसांच्या सूचना लोणावळा – लायन्स पॉइंट परिसरात सुरू असलेली हुल्लडबाजी, गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी या पार्श्‍वभूमीवर वन विभागाने 30 आणि 31 डिसेंबर रोजी लायन्स पॉइंट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिकांना त्यादृष्टिने सूचना देण्यात आल्या आहेत. मागील दोन दिवस याठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेकायदा हुक्‍का विक्री करणाऱ्या पाच जणांना गुन्हे … Read more

नवीन वर्ष स्वागताचा जल्लोष रात्रभर

हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, क्‍लब पहाटे 5 वाजेपर्यंत राहणार सुरू राज्य सरकारची परवानगी; मद्यविक्री, करमणूक कार्यक्रमांना पहाटेपर्यंत मुभा पुणे – नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष यंदाही रात्रभर करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, क्‍लबमध्ये 31 डिसेंबरला पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यविक्री व करमणूक कार्यक्रमांना मुभा देण्यात आली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्यासह संपूर्ण राज्यात जोरदार … Read more