संघाकडून भाजपला सावधानतेचा इशारा

हरियाणातील निवडणुकीनंतर संघाने व्यक्‍त केली चिंता नवी दिल्ली : हरियाणातील जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजपला दिलेला कौल हा भ्रमनिरास करणारा ठरला. हरियाणात खट्टर सरकारला 45 जागा मॅजिक फिगरचा आकडा गाठण्यात अपयश आले. परिणामी भाजपला जननायक जनता पार्टी (जेजेपी) या नवख्या पक्षासोबत समझोता करुन सरकार स्थापन करण्याची वेळ आली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने भाजपला सावधानतेचा इशारा … Read more

मनोहरलाल खट्टर यांचा उद्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी?

राज्यात एकच उपमुख्यमंत्री असणार – रविशंकर प्रसाद  चंदीगड – हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेवरून राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच भाजपने मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यानुसार मनोहर लाल खट्टर रविवारी दोन वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, भाजप आज हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार … Read more

गोपाळ कांडा यांचा सरकारमध्ये प्रवेश नाहीच -भाजप

नवी दिल्ली : नुकत्याच हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला म्हणावे तसे बहुमत मिळाले नाही त्यामुळे आता इथे जेजेपीच्या मदतीने भाजप सरकार स्थापण करणार आहे. यासर्व घडामोडीत हरियाणातील एअर हॉस्टेस गीतिका शर्मा हिच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ कांडा यांचा सरकारमधील समावेशावरून गोंधळ सुरू आहे. कारण कांडा यांच्या सरकारमधील समावेशावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळ … Read more

महाराष्ट्र, हरियाणा राज्यातील नुकसान भाजपमुळेच -अमित शहा

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला म्हणावे तेवढे यश मिळाले नाही. त्यामुळे आता या पराभवाचा विचार करण्यासाठी आणि पराभवाचा आढावा भाजपकडून घेण्यात येत आहे. त्यातच आता दोन्ही राज्यातील नुकसानाची मिमांसा करताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यांमधील नुकसानाला विरोधक जबाबदार नसून भाजपचेच सर्व प्रभारी अधिकारी जबाबदार असल्याचे म्हटले … Read more

महाराष्ट्र, हरियाणाच्या निकालानंतर भाजपला ‘असा’ बसणार धक्‍का

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये अपेक्षापेक्षा खूप कमी जागा मिळाल्यामुळे भाजपला चांगलाच धक्‍का बसला आहे. दरम्यान, यानंतर भाजपच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. या निकालांचा परिणाम राज्यसभेतील भाजपच्या पक्षीय बलावर होणार आहे. जर या दोन ठिकाणी भाजपला चांगले यश मिळाले असते, तर त्याचा पक्षाला राज्यसभेत आपल्या जागा वाढविण्यासाठी … Read more

#Live# हरियाणा : बबिता फोगट दादरी मतदार संघातून आघाडीवर

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि हरियाणा विधानसभा निवडणूक यांचे निकाल आज लागणार आहेत. हरियाणामध्ये पुन्हा एकदा भाजपाचे सरकार येणार का? नेमकं काय घडणार याचं चित्र आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. हरियाणामध्ये 90 जागांसाठी मतदान 21 ऑक्‍टोबर रोजी पार पडलं आहे. 90 पैकी 46 जागा जिंकण्याचं आव्हान भाजपासमोर आहे. … Read more

#video#राहुल गांधी जेंव्हा लहान मुलांसोबत क्रिकेट खेळतात…

नवी दिल्ली : देशात सध्या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये प्रचारासाठी सर्वच नेते गुंतले आहेत. या सर्व गोंधळात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ समोर येत आहे. यात राहुल गांधी चक्‍क लहान मुलांसमवेत क्रिकेट खेळताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी हरयाणातील रेवाडी या ठिकाणी तिथल्या मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा … Read more

हरियाणामध्ये 3 लाख शेतकऱ्यांना भाजप बिनव्याजी कर्ज देणार

नवी दिल्ली : महाराष्ट्राप्रमाणे हरियाणामध्येदेखील 21 ऑक्‍टोबर रोजी विधानसभा निवडणुका होत आहेत. त्याच पार्श्‍वभूमिवर रविवारी भाजपकडून जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात भाजपने राज्यात पुन्हा सत्तेत आल्यानंतर अनुसुचित जातीच्या 3 लाख नागरिकांना तारणाशिवाय तर राज्यातील 3 लाख शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचे आश्‍वासन भाजपकडून देण्यात आले आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी या जाहीरनाम्याविषयी माहिती दिली. … Read more