पिंपरी | देऊळगावराजे आरोग्य केंद्रात कुटुंबनियोजनाच्या 36 शस्त्रक्रिया

देऊळगावराजे, (वार्ताहर)- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब कल्याण योजनेचे एकूण 36 शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी अविनाश अलमवार यांनी दिली. या शस्त्रक्रियेसाठी फलटण येथीलसर्जन कदम याना बोलावण्यात आले होते. तसेच त्याच्या सोबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकरी डॉ. अविनाश आल्लमवार आणि स्नेहा शिंदगणे, कोमल गावडे, अजयकुमार पोतन, मयूर वाहुळे, तनुजा कुर्‍हाडे, सुप्रिया तलवारे, … Read more

पुणे जिल्हा | डॉक्टर दाखवा बक्षीस मिळवा

सविंदणे (वार्ताहर) – कवठे येमाई (ता. शिरूर) येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नियमितपणे उपलब्ध राहत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. या होणार्‍या प्रकारामुळे नागरिक पुरते वैतागले आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात डॉक्टर दाखवा बक्षीस मिळवा असे म्हणत नागरिकांनी थेट आरोग्य केंद्रालाच टाळे ठोकले आहे. प्रसुती झालेल्या महिलेला मंगळवारी (दि.30 एप्रिल) सायंकाळच्या सुमारास उपचार न … Read more

पुणे जिल्हा : प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रांताधिकाऱ्यांची भेट

कापूरहोळ : नसरापूर (ता. भोर) येथील पंतसचिवकालीन वाड्यात शासकीय विविध कार्यालये असून, वाडा मोडकळीस आल्याने तेथील कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. गेल्या आठवड्यात आरोग्य विभागातील छत कोसळले होते. याबाबत दै. “प्रभात’ने बातमी प्रसिद्ध केली होती, त्याची दखल घेत सोमवारी (दि. 3) भोरचे प्रांत अधिकारी राजेंद्रकुमार कचरे यांनी नसरापूर येथील पंतसचिव कालीन जीर्ण वाड्याची आणि आरोग्य केंद्रातील … Read more

पुणे जिल्हा : राजगुरूनगरकरांना मिळणार आरोग्य केंद्र

दहा बारा वर्षांपासून डॉक्‍टरांचा संघर्ष राजगुरूनगर – राजगुरूनगर शहरात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी बॉश चॅसीज सिस्टिम इंडिया प्रा. लिमिटेड कडून सुमारे 3 कोटी रुपयांचा सीएसआर निधी मिळाला आहे. राजगुरुनगर शहरातील नागरिकांसाठी सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र मिळणार आहे. गेली अनेक वर्षांपासून आरोग्य सेवेपासून वंचित असलेल्या राजगुरुनगरवासियांना अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व त्यामध्ये अत्याधुनिक सेवा … Read more

वाघोली: स्थलांतरित होणाऱ्या आरोग्य केंद्रासाठी जागेची मागणी

वाघोली – वाघोली या ठिकाणाहून स्थलांतरित होणारे आरोग्य केंद्र केसनंद मध्ये उभारण्यात यावे या करीता किमान एक हेक्टर वनविभागाची जागा गावाकरीता उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केसनंद ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती सरपंच नितीन गावडे यांनी दिली आहे. याबाबत सरपंच नितीन गावडे यांनी सांगितले की,  घनकचरा प्रकल्प एसटीपी (सांडपाणी) प्लॅन्ट, व  … Read more

Ayushman Bharat : देशभरात 70 हजार आयुष्यमान भारत आरोग्य केंद्रे स्थापन

नवी दिल्ली, दि. 21 – देशात येत्या 31 मार्च पर्यंत 70 हजार आयुष्यमान भारत केंद्रे स्थापन करण्याचे उद्दीष्ट केंद्र सरकारने ठेवले होते. ते उद्दीष्ट वेळेच्या आधीच पुर्ण झाले आहे असे केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्यावतीने आज सांगण्यात आले. आज देशातील 41 कोटी 35 लाख नागरीक आयुष्यमान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्राशी जोडले गेले आहेत अशी माहितीही या मंत्रालयाच्यावतीने … Read more

शाळांसाठी फिरते आरोग्य केंद्र!

शालेय शिक्षण विभागाचे पालिका, जिल्हा परिषद प्रशासनाला आदेश पुणे – राज्यात शाळा सुरू करताना महापालिका, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आवश्‍यकतेप्रमाणे शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग करून घेण्यासाठीचे नियोजन करावे लागणार आहे. 5 ते 10 शाळांसाठी फिरते आरोग्य तपासणी केंद्रही कार्यरत ठेवण्याचे बंधन शासनाने घातले आहे. शालेय शिक्षण विभागाने शाळांबाबत संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार … Read more

शिवेंद्रराजे भोसले उपचारासाठी मुंबईला रवाना

सातारा –  सातारा मतदारसंघातील भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार करुन पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल होण्यासाठी येथून ते मुंबईला रवाना झाले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. श्री. भोसले यांना काल रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हार्ट बीटस् वाढल्याने रात्रभर त्यांना रुग्णालयात अंडर आँब्झर्व्हेशन ठेवण्यात … Read more

सवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधा पालिकेच्या 31 आरोग्य केंद्राद्वारे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णांना सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे 31 आरोग्य केंद्राच्या माधमातून वैद्यकीय उपचार आणि विविध चाचण्या सवलतीच्या दरात दिल्या जाणार आहेत. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले आहे. माता आणि बालकांच्या विविध उपचार, तसेच रक्त, लघवी आणि इतर चाचण्या सवलतीच्या … Read more

माळेगावात उभारण्यात येणार प्राथमिक आरोग्य उपकेंद्र

टाकवे बुद्रुक – आंदर मावळातील दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. माळेगावात लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न सुटणार आहे. या संदर्भात जिल्हा परिषद सदस्या शोभा कदम यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि माळेगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास 1 कोटी 7 लाख रुपयांचा निधी … Read more