महाराष्ट्रात पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस

मुंबई – मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात हवेमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य प्रदेशसह तेलंगणा आणि महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेट या खासगी वेधशाळाने हा अंदाज वर्तवला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्रसपाटीपासून सुमारे तीन किलोमीटरपर्यंत चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. … Read more

गडचिरोली जिल्ह्यातही पुराची परिस्थिती: भामरागडला आले बेटाचे स्वरुप

गडचिरोली : राज्यात सर्वच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यातच आता गडचिरोली जिल्ह्यातही मागच्या 48 तासांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे पर्लकोटा नदीला पुर आला आहे. याचा फटका नदीकाठच्या गावांना बसला आहे. पुराच्या पाण्यामुळे जवळपास 100 घरे आणि 40 दुकानं पाण्याखाली गेले आहेत. मागच्या 15 दिवसांत पर्लकोटा नदीला तिसऱ्यांदा पुर आला असून इथले जनजीवन … Read more

पश्‍चिम बंगालमध्ये पावसाची दमदार हजेरी

पश्चिम बंगाल  – गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पश्चिम बंगालमध्ये पूरस्थिती गंभीर बनली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे सिलीगुरी येथे पाणी साठले आहे. दरम्यान, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य भारतात संपूर्ण आठवडाभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. West Bengal: Water logging in Siliguri after heavy rains in the region. pic.twitter.com/c8vZOaNUJw … Read more

पिंपरी-चिंचवड शहरात पावसाची जोरदार हजेरी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर आणि उपनगरांत शनिवारी दिवसभर पावसाच्या जोरदार पाऊस झाला. काल पहाटेपासून भोसरी, आकुर्डी, निगडी, सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी आदी भागात जोरदार पाऊस झाला. दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे चाकरमान्यांची, विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. संततधार पावसामुळे बाजारपेठा ओस पडल्या होत्या. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खड्‌डे चुकविताना कसरत करावी लागत होती. याशिवाय शहरातील सखल … Read more

पावसामुळे मुंबई, उपनगर व ठाणे जिल्ह्यात सुटी जाहीर

मुंबई : सोमवार सकाळपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईमध्ये सगळीकडे पाणीच पाणी साचून राहिले आहे. यामुळे महानगरीतील वाहतुक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आणि उपनगरी लोकल उशीरा धावू लागल्या आहेत. मुंबई, ठाणे, पालघर या आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये 2, 4 आणि 5 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईतील काही ठिकाणी आज आणि मंगळवारी अतिशय … Read more