pune gramin : गोरगरिबांची मदत करून आशीर्वाद घ्या – भरणे

भवानीनगर: इंदापूर तालुक्‍यामध्ये रस्ते होतील, बांधकामे होतील, गटार लाइन होईल, सर्व स्तरावर प्रगती होईल.. ही प्रगती होण्याची थांबणार नाही; परंतु खऱ्या अर्थाने गोरगरीब बांधकाम मजूर यांना मदतीची गरज आहे व यासाठी इंदापूर तालुक्‍यातील बांधकाम मजूर नावनोंदणी प्रत्येक कार्यकर्त्यांनी बांधकाम मजुराच्या घरी जाऊन त्यांचे फॉर्म भरून घ्यावेत. कोणत्याही देवाला लांबच्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यापेक्षा … Read more

भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती; बचाव पथकामार्फत मदतकार्य सुरु

मुंबई  : नागपूर विभागामध्ये गेल्या 24 तासात पडलेल्या पावसामुळे भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून पूरग्रस्त भागात स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत मदत कार्य सुरु आहे. १५३१ नागरिकांना गेल्या २४ तासात सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. राज्यात इतरत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण … Read more

बंडखोरांना मदत करून प्रभाव टाकण्याचा प्रयत्न

मणिपूरमध्ये कॉंग्रेसचा आरोप नवी दिल्ली – मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या बंडखोरांच्या गटाला 17 कोटी रुपयांची मदत करून भाजपकडून आदर्श आचार संहितेचा भंग केला जात आहे, असा आरोप कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. मणिपूरच्या विधानसभेच्या निवडणूकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान 28 मार्च रोजी झाले आहे आणि दुसऱ्या टप्प्यात 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. मणिपूरमधील कुकी बंडखोरांच्या संघटनेला … Read more

Russia-Ukraine War: हीच खरी माणुसकी! युक्रेनमध्ये गरजू लोकांच्या मदतीसाठी ‘इस्कॉन’ने उघडले मंदिरांचे दरवाजे

नवी दिल्ली : जगात सध्या तिसऱ्या महायुद्धाचे वारे वाहत आहेत. तर दुसरीकडून जगभरातून या युद्धाला विरोध होताना दिसत आहे. दरम्यान, युक्रेनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘इस्कॉन’ने पूर्व युरोपीय देशातील गरजू लोकांसाठी मंदिरांचे दरवाजे उघडले आहेत. त्यांच्या या मदतीचे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास यांनी शनिवारी सांगितले की, “युक्रेनमधील इस्कॉन … Read more

नागपंचमी निमित्ताने एक हजार महिलांना मदत

पुणे – नागपंचमी सणाच्या निमित्ताने सहकारनगर भागातील शाहू वसाहत, अण्णा भाऊ साठे वसाहत आणि डॉ. आंबेडकर वसाहत येथे एक हजारांहून अधिक महिलांना नागपंचमीच्या सणानिमित्ताने आधार सेवा केंद्राच्या वतीने विशेष भेट देण्यात आली. करोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या या महिलांना सण साजरा करण्यासाठी साडी, बांगड्यांचा सेट, हळदी-कुंकू, टिकली व मेंदीचा कोन भेट देण्यात आला. सेवा केंद्राचे संस्थापक … Read more

कॉंग्रेस गाजावाजा करत नाही प्रत्यक्ष मदत करते – नाना पटोले

पुणे : कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर परिस्थितीत नागरिकांच्या नुकसानाची पाहणी करण्यावर भर देण्यापेक्षा थेट मदत प्रत्यक्ष पोहचवण्यावरती कॉंग्रेस पक्षाचा भर आहे. पुण्यातील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या पुढाकारातून शहर कॉंग्रेसतर्फे सांगली कोल्हापूर या भागातील पुरामुळे बाधित नागरिकांना मदत पाठविण्याचा कार्यक्रम अतिशय प्रेरणादायी असून साऱ्या महाराष्ट्रातूनच या पूरग्रस्त भागांमध्ये मदत पाठवली जात … Read more

करोनामुळं अडचणीत आलेल्या लोकांना गायिका मिता शहा यांचा मदतीचा हात

पुणे –  भजन गायिका आणि क्रिप्स फांऊडेशनच्या महिला विंगच्या प्रमुख मिता शहा यांनी गोरगरिबांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. शहा यांनी डॉन बॉस्को येथे गरिब, स्थलांतरित लोकांना रेशन किट वाटप केले. एक वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या लोकांना मिता शहांनी मदत केली आहे. मिता शहा म्हणाल्या की, आपण आमच्याकडून जे धान्य स्वीकारले त्याबद्दल धन्यवाद. लॉकडाऊनमध्ये लोकांचे … Read more

द्राक्ष उत्पादकांच्या मदतीसाठी राज्य शासन सकारात्मक

मुंबई : मागील तीन वर्षांपासून द्राक्षाचा हंगाम वाया गेला आहे. तसेच यंदाही राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासन सकारात्मक असून कृषी विभागाने यासंबंधीचा अहवाल तातडीने राज्य शासनाकडे पाठवावे, असे निर्देश कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी दिले. द्राक्ष बागायतदार संघटनेच्या प्रतिनिधींची डॉ. कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात … Read more

जनधनमुळे गरिबांना मदत – सीतारामन

नवी दिल्ली – जनधन योजना सर्वसमावेशक विकासासाठी तयार करण्यात आली होती. ही योजना प्रचंड यशस्वी झाली असून 6 वर्षांत 40 कोटी 35 लाख गरिबांचे बॅंकांत खाते उघडले गेले आहे.  योजनेच्या अंमलबजावणीबाबत समाधान व्यक्‍त करून अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, लोकाभिमुख आर्थिक धोरण निर्माण करण्याच्या उद्देशातून ही योजना सुरू करण्यात आली होती. जनधन खात्यामुळे गरिबांना सरकारी … Read more

दांडेकर पूल येथील दोनशे गरिबांना अन्नदानाचा उपक्रम

पुणे – करोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात सर्वच प्रकारचे रोजगार उद्योग व्यवसाय बंद आहेत. यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोर गरीब लोकांच्या जेवणाचे हाल होत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी दांडेकर पूल येथील परिसरातील दोनशे गरीब लोकांना अन्नदान करण्यात येणार आहे. कौटुंबिक न्यायालयातील वकिलांची संघटना असलेली दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, अध्यक्ष अॅड. वैशाली चांदणे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या … Read more