nagar | संगमनेरातून गांजा, हेराॅइनसह आरोपी जेरबंद

नगर, (प्रतिनिधी) – संगमनेर शहरातील शिवाजीनगर येथून अवैध गांजा, व हेराॅइनची विक्रीकरा एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून ५ लाख १७ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास शांताराम शिंदे (वय ४३, रा. जैन सर्कल, शिवाजीनगर, ता. संगमनेर) असे ताब्यात … Read more

नदीतून पोहत जाऊन पाकमधून आणले हेरॉईन; 30 किमी पोहून तब्बल ‘इतक्या’ किलोचा साठा आणला

अमृतसर – अवघ्या 5 लाख रुपयांच्या लालसेने पंजाबमधील दोन तस्करांनी रावी नदीत 30 किलोमीटर पोहून पाकिस्तान गाठले. दोन दिवस सीमेपलीकडे राहिल्यानंतर 50 किलो हेरॉईन घेऊन ते रवीमार्गे भारतात परतले. सीमेवर कडक पाळत ठेवण्याचे सर्व दावे करूनही या प्रकाराची खबर कुणालाही नव्हती. हेरॉईनच्या खेपेसह अटक करण्यात आलेल्या तस्कर जोगा सिंगच्या या खुलाशामुळे सीमेवरील सुरक्षेवर अनेक प्रश्न … Read more

मिझोराममध्ये तब्बल ‘इतक्या’ कोटींचे हेरॉईन जप्त; पाच जणांना अटक

आयझॉल – मिझोराममधून तब्बल 31 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली. मोहम्मद नझिमुल हुसैन बारभुईया, अब्दुल कलाम लस्कर, कुतबुल आलोम लस्कर आणि सुकुर अली मुझुमदा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की,मिझोराम उत्पादन शुल्क आणि अंमली … Read more

Mumbai : मुंबई विमानतळावर 53 कोटींच्या हेरॉईनसह एकाला अटक

मुंबई – येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून तब्बल 53 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. याबाबतची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्याने बुधवारी दिली आहे. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून मुंबईला येणाऱ्या एका प्रवाशाकडून ड्रग्जची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. अधिकाऱ्यांनी प्रवाशाला त्याच्या आगमनावेळी अडवले आणि त्याच्या सामानाची कसून … Read more

गुजरातमध्ये 425 कोटींचे हेराॅईन ड्रग्ज जप्त

अहमदाबाद – गुजरातमध्ये एटीएसने भारतीय तटरक्षक दलाच्या संयुक्त कारवाईत मोठी कारवाई केली आहे. एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाने गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील ओखा जवळ तब्बल 61 किलो ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 425 कोटी रुपये एवढी किंमत आहे. या कारवाईत 5 इराणी क्रू मेंबर्ससह बोट ताब्यात घेण्यात आली आहे. सध्या पुढील … Read more

Jammu And Kashmir: नार्को-दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, 2 कोटी रुपये, ड्रग्ज आणि धोकादायक शस्त्रे जप्त

पूंछ – सुरक्षा दलांनी अमली पदार्थांच्या तस्करीच्या एका मोठ्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि अमली पदार्थ तस्कर रफी धनाच्या अड्ड्यावरून 7 किलो हेरॉईन, सुमारे 2 कोटी 30 लाख 93 हजार रुपये, अमेरिकन डॉलर्स, 15 हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल, मॅगझिन आणि 10 काडतुसे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 35 कोटी रुपये … Read more

गुजरात किनाऱ्यालगत 350 कोटींचे हेरॉईन जप्त; पाकिस्तानातून आलेल्या सहा जणांना अटक

अहमदाबाद – गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर पाकिस्तानातून चोरट्या मार्गाने आणलेले 350 कोटी रूपयांचे हेरॉईन तटरक्षक दल आणि स्थानिक पोलिसांनी पकडले आहे. पाकिस्तानातून आलेल्या या बोटीवरील सहा जणांनाहीं अटक करण्यात आली आहे. जवानांनी अरबी समुद्रात 50 किलो हेरॉईन असलेली अल सक्कर ही बोटही जप्त केली आहे. शुक्रवार आणि शनिवारीच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. त्या रात्री एक … Read more

गुजरातमध्ये एटीएसची पुन्हा धडक कारवाई; पाकिस्तानी बोटीतून २५० कोटींचे हेरॉइन जप्त

नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये एटीएसकडून अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करण्यात येत आहे.   एटीएसने पुन्हा एकदा गुजरातमधील कच्छमधून एका पाकिस्तानी बोटीतून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केल्याची महत्वाची माहिती समोर येत आहे. बीएसएफच्या मदतीने एटीएसने ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंब्रा बंदरातून ५०० किलोंचे कोकेन जप्त करण्यात आले होते. त्यानंतर … Read more

लक्षद्वीप किनाऱ्यालगत तब्बल 1500 कोटी रूपयांचे हेरॉईन जप्त; आंतरराष्ट्रीय टोळीही जाळ्यात

कोची-भारतीय यंत्रणांनी समुद्रात महत्वपूर्ण कारवाई करताना लक्षद्वीप किनाऱ्यालगत आंतरराष्ट्रीय तस्करांच्या टोळीला पकडले. त्या टोळीकडून हेरॉईन या अंमली पदार्थाचा 218 किलो साठा जप्त करण्यात आला. त्या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजरातील किंमत तब्बल 1 हजार 500 कोटी रूपये इतकी आहे. संबंधित कारवाई महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने केली. तामीळनाडू किनाऱ्यावरून निघालेल्या दोन भारतीय नौकांमध्ये अरबी … Read more

गुजरात किनाऱ्यालगत पाकिस्तानी नौका जाळ्यात; 280 कोटी रूपयांचे हेरॉईन जप्त

अहमदाबाद – गुजरात किनाऱ्यालगत सोमवारी सकाळी नऊ नाविकांसह एक पाकिस्तानी नौका ताब्यात घेण्यात आली. त्या नौकेतून 280 कोटी रूपयांचा हेरॉईन या अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ती संयुक्त कारवाई केली. एटीएसने दिलेल्या माहितीच्या आधारे तटरक्षक दलाने विशेष मोहीम हाती घेऊन एक जहाज समुद्रात पाठवले. जहाजावरील … Read more