Maharashtra Police : गृह विभागाचा पोलिसांना मोठा दिलासा…

पुणे : पोलीस शिपाई ते पोलीस निरिक्षकपदापर्यंतच्या पोलीस कर्मचार्‍यांना राज्यशासनाकडून वर्षभरासाठी ३० अर्जित रजा दिल्या जातात. मात्र, दैनंदिन कामकाज तसेच बंदोबस्त,कायदा सुव्यवस्था राखणे या मुळे या सुट्टयाही पोलीस कर्मचार्‍यांना घेता येत नाहीत. त्यामुळे शासनाकडून या रजांमधील 15 दिवसांंच्या रजांचे रोखीकरण ( पैसे ) त्यांना दिले जात होते. मात्र गृह विभागाकडून हा निर्णय 21 फेब्रुवारीला 2024 … Read more

Bihar : सीएम नितीश कुमार यांनी खातेवाटप केले; गृहखाते कायम ठेवले तर भाजपकडे….

पाटणा  – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप केले. त्यांनी स्वत:कडे गृह खाते कायम ठेवले आहे. मात्र, अर्थ खात्याची जबाबदारी भाजपकडे सोपवली आहे. नितीश यांनी नुकतीच महाआघाडीची साथ सोडत भाजपशी पुन्हा मैत्री केली. त्यामुळे बिहारमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले. नितीश यांच्या व्यतिरिक्त आठ मंत्र्यांनी शपथ घेतली. आता नव्या मंत्र्यांकडे विविध … Read more

सागरी किनारा होणार अधिक सुरक्षित ! गृह विभाग करणार 28 बोटींची खरेदी

मुंबई – राज्याच्या सागरी किनारा सुरक्षेसाठी (Sea coast safer) राज्य सरकारच्या वतीने 28 नवीन बोटी (purchase 28 boats) तीन टप्प्यात खरेदी केल्या जाणार आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात 10 नवीन बोटी खरेदी केल्या जातील, अशी माहिती गृह विभागाने दिली. याशिवाय पुढील पाच वर्षांसाठी पाच इंटरमीडिएट सपोर्ट व्हेसल्स भाडेत्तवावर घेण्यासाठी राज्य सरकारने 51 कोटी मंजूर केले आहे. … Read more

passport verification : गरज पडल्यास घरी जाऊन पासपोर्ट व्हेरिफिकेशन करा; पोलिसांना गृह विभागाचा आदेश

मुंबई – गरज पडल्यास पासपोर्ट व्हेरिफिकेशन (passport verification) साठी अर्जदाराच्या घरी भेट देऊन माहिती घ्या अशी सूचना राज्याच्या गृह विभागाने (Home Department) पोलिसांना (police) केली आहे. देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना पासपोर्ट जारी करणे रोखण्यासाठी तसेच बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी ही सूचना करण्यात आली आहे. बेकायदेशीर परदेशी स्थलांतरितांना बनावट आधार आणि पॅन कार्ड जारी करण्यात केंद्रीय एजन्सी संघटित … Read more

“तीन महिन्यात राज्यांतून ५ हजारांपेक्षा जास्त मुली बेपत्ता”; रुपाली चाकणकरांची खळबळजनक माहिती, गृहविभागाकडे तपासाची मागणी

मुंबई : राज्यात  कायदा आणि सुव्यवस्था  अत्यंत सुरळीतपणे असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारच्या या दाव्याला फोल ठरवणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातुन रोज सरासरी ७० मुली बेपत्ता  होत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे. जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातून ५ हजार ५१० मुली बेपत्ता झाल्या असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

रुपाली चाकणकर यांनी ही माहिती देताना एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी,  “जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातून १६०० मुली बेपत्ता झाल्या, फेब्रुवारी महिन्यात १८१० तर एप्रिल महिन्यात २२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांची संख्या वाढते आहे हे आपल्यासाठी चिंताजनक आहे. यामध्ये २०२० पासून हरवलेल्या व्यक्तींबाबत दुर्दैवाने पहिल्या क्रमांकावर आहे. यासाठी खरंतर फार मोठी यंत्रणा कार्यरत असणं आणि त्या यंत्रणेचा वापर केला जाणं आवश्यक आहे. पण तसं होताना दिसत नाही. राज्य महिला आयोगाच्या वतीने गेल्या १६ महिन्यांपासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहे. हरवलेल्या व्यक्तींचा विभाग मुंबई यांच्याकडून आम्ही माहिती घेत असतो. त्यांच्याकडून अहवाल मागवत असतो. प्रत्येक राजकारणाऱ्याकडे मिसिंग सेल आहे. तो कार्यकरत आहे की नाही? असा सवाल यातून त्यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना त्यांनी,”मागच्या महिन्यात महिला आयोगाने नागपूरमध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग असा एक प्रोग्रामही आम्ही घेतला. यामध्या राज्याचे गृहमंत्रीही उपस्थित होते. सद्यस्थितीतली आव्हानं आणि उपाय योजना यांचा अहवाल आम्ही गृह विभागाला पाठवलाही आहे. मिसिंगमध्ये ज्या तक्रारी समोर येतात त्या मुलींचा शोध लागला नाही. तर या मुली मानवी तस्करीत ओढल्या जातात. लग्नाचं आमीष, प्रेमाचं आमीष आणि नोकरचं आमीष दाखवून या मुलींची दिशाभूल केली जाते आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. ” असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. तसंच या संदर्भात गृहविभागाने तातडीने पावलं उचलावीत अशीही मागणी चाकणकर यांनी केली आहे.

दरम्यान,   राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही चिंता व्यक्त केली होती. महाराष्ट्रासह देशात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. मुलींची दिशाभूल करुन त्यांचे अपहरण करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या बेपत्ता मुलींचे पुढे काय होते हा प्रश्न शासनाला पडत नाही का? पडत असेल तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय स्तरावर काही होत आहे का? याबाबत महिलांच्या संबंधाने काम करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांची मते जाणून घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. हा विषय अतिशय गंभीर असून गृह तसेच महिला व कुटुंब कल्याण विभागाने एकत्र येऊन याबाबत तातडीने काम करण्याची आवश्यकता आहे.  असे त्यांनी म्हटले होते.

IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून महाविकास आघाडीमधील मतभेद पुन्हा समोर, अवघ्या 12 तासांत पाच जणांच्या पदोन्नतीला स्थगिती

मुंबई  – राज्यात तब्बल 39 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या. मात्र, पत्रक काढून 12 तास उलटत नाही तोच पाच अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. अवघ्या काही तासात पोलीस पदोन्नती आदेशाला स्थगिती दिल्यामुळे गृहखात्याचा अजब कारभार समोर आला आहे. तसेच या बदल्यांवरून महाविकास आघाडीमधील मतभेद पुन्हा समोर आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल … Read more

31 डिसेंबर आणि नववर्ष स्वागतासाठी गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. याचे संक्रमण नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी गृह विभागाने 31 डिसेंबर, 2021 (वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022 चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मार्गदर्शक … Read more

नाताळ सण साध्या पद्धतीने साजरा करावा, गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई  : नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांनी आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी देखील नाताळचा सण पूर्णत: खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये “ओमिक्रॉन” ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन … Read more

Chhath Puja 2021 | छठपूजा उत्सवानिमित्त गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई: कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नागरिकांनी या वर्षीचा छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून त्याबाबतचे परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे. दि. 9 नोव्हेंबरच्या सूर्यास्तापासून ते दि. 10 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या सूर्योदयापर्यंत छठपूजा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोविड रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या दीड वर्षापासून सर्वधर्मीय … Read more

Navratri 2021 | नवरात्रौत्सवाबाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : गृह विभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव 2021 बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवरात्रौत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दि. 7 ते 15 ऑक्टोबर, 2021 दरम्यान नवरात्र / दुर्गापूजा /दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी, अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. … Read more