पीएम मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास का सांगितले? लोकांचे 30 लाख कोटी बुडाले… राहुल गांधींनी JPC चौकशीची केली मागणी

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीएम मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या शेअर बाजाराबाबत केलेल्या वक्तव्यावरून निशाणा साधला. त्यांनी विचारले की, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी लोकांना गुंतवणूक करण्याचा सल्ला का दिला? या संपूर्ण प्रकरणाला घोटाळा असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी जेपीसी चौकशीची मागणीही केली आहे. गुरुवारी … Read more

‘दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना किंवा दगडफेक करणाऱ्यांना सरकारी नोकरी नाही’ – गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्‍मीरातील फुटीरतावाद्यांना कठोर संदेश देताना जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही दहशतवाद्याच्या कुटुंबातील सदस्याला किंवा दगडफेक करणाऱ्यांच्या जवळच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी मिळणार नाही, असे म्हटले आहे. नरेंद्र मोदी सरकारने केवळ दहशतवाद्यांनाच लक्ष्य केले नाही तर दहशतवादी परिसंस्थेचाही नायनाट केला आहे, परिणामी देशातील दहशतवादी घटनांमध्ये मोठी घट झाली आहे.आम्ही निर्णय घेतला आहे … Read more

‘सीमा सुरक्षेत कसलीही तडजोड नाही’ – गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली – सरकारला सर्व देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. परंतु त्यासाठी सरकार भारताच्या सीमा आणि तेथील लोकांच्या सुरक्षेशी तडजोड करणार नाही. आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत मोदी सरकारने अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जम्मू आणि काश्मीर, ईशान्य आणि वामपंथी अतिरेकी प्रभावित क्षेत्र या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांवर यशस्वीपणे नियंत्रण मिळवले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी … Read more

पूर्व लडाखमधील भागात चिनी सैनिकांचे अतिक्रमण? गृहमंत्र्यांनी खुलासा करण्याची कॉंग्रेसची मागणी

नवी दिल्ली  – पूर्व लडाखमधील एका भागात चिनी सैनिकांनी केलेल्या अतिक्रमणाच्या संबंधात गृहमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. त्या भागातील भारतीय मेंढपाळांना त्यांची जनावरे चरण्यापासून चिनी सैनिकांनी रोखले असून त्यावेळी त्यांच्यात जोरदार संघर्ष उडाल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. चिनचे सैनिक भारतीय गुराख्यांचा छळ करीत असून त्या संबंधात गृहमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे अशी … Read more

Tehreek-e-Hurriyat: मोदी सरकारची मोठी कारवाई! ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ला दहशतवादी संघटना घोषित

Tehreek-e-Hurriyat : केंद्रातील  मोदी सरकारची मोठी कारवाई करत काश्मिरी फुटीरतावादी पक्ष ‘तेहरिक-ए-हुर्रियत’ला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली आहे. याविषयीची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. ” फुटीरतावादी पक्ष तहरीक-ए-हुर्रियत (TeH) ला बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यानुसार (UAPA) ‘बेकायदेशीर संघटना’ घोषित करण्यात आले आहे. केंद्र सरकार काश्मिरी फुटीरतावादी … Read more

‘बिमारू राज्य’ ही मध्यप्रदेशची प्रतिमा भाजप सरकारने बदलली – गृहमंत्री अमित शहा

भोपाळ :- आजारी किंवा बिमारू राज्य अशी मध्यप्रदेशची ओळख होती पण ही ओळख भारतीय जनता पक्षाच्या सरकारने बदलली आहे असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. त्यांनी आज मध्य प्रदेश सरकारचे 2003-2023 कालावधीचे ‘रिपोर्ट कार्ड’ जारी केले. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, भाजप प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा आणि राज्याचे गृहमंत्री … Read more

अमित शाहांचा मदतीचा दावा कलावतींनी ठरवला खोटा; म्हणाल्या,”राहुल गांधींमुळे माझं आयुष्य बदललं…”

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना संसदेत यवतमाळ जिल्ह्यातील कलावती बांदूरकर यांनी मदत केल्याचा दावा केला होता. मात्र हा दावा आता कलावती यांनी फेटाळून लावला आहे. अमित शहा यांनी कलावती यांच्याबाबत जे वक्तव्य केलं, त्याला प्रत्युत्तर देताना कलावती यांनी ,’मला मोदी किंवा भाजप सरकारमुळे काहीच मिळाले नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामुळेच माझं … Read more

“थिएटरसह ओटीटीवर देखील ‘आदिपुरुष’ बॅन करा..” ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे गृहमंत्री अमित शहांना पत्र

मुंबई – प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. चित्रपटाचे निर्माते आणि लेखकांच्या अडचणी आता आणखी वाढणार आहेत. ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश … Read more

Article 370 : “कलम 370 रद्द केल्यापासून काश्‍मीरात शांतता’; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा दावा

श्रीनगर  – केंद्र सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर, जम्मू आणि काश्‍मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली आहे आणि यात केलेल्या सुधारणा कोणत्याही विरोधाशिवाय स्वीकारल्या गेल्या आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. विकासाचे नवे आयाम निर्माण केले जात आहेत, उच्च शिक्षणाच्या संस्था उभारल्या जात आहेत, उद्योगधंदे उभारले जात आहेत. पंचायती राजाची स्थापना झाली … Read more

मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहसह मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या बाह्य जिल्हा पोलिसांना आज दोन पीसीआर कॉल आले. या कॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. Delhi Police’s outer district police received two PCR calls today from a man who threatened to kill the Prime Minister, Union … Read more