फिफाकडून ‘तो’ निर्णय मागे, अंडर-17 विश्‍वचषकाचे यजमानपद भूषवण्याचा भारताचा मार्ग मोकळा

झुरिच/नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ अर्थात फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (एआयएफएफ) घातलेली बंदी नुकतीच तातडीने उठविली आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रशासक समिती नेमण्याचा आदेश रद्द केल्यानंतर फिफाने बंदीचा निर्णय मागे घेतला आहे. यामुळे अंडर-17 महिला विश्‍वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत इंडियन फुटबॉलने त्यांच्या अधिकृत ट्‌विटरवरून माहिती दिली. यावेळी फिफाकडून बंदी … Read more

आर्थिक स्थितीचा श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डलाही फटका, ‘या’ स्पर्धेचे यजमानपद धोक्यात?

दुबई – श्रीलंकेतील राजकीय परिस्थिती व देशात झालेल्या आर्थिक संकटामुळे आगामी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपदही जाणार असल्याचे संकेत आशियाई क्रिकेट समितीने दिले आहेत. टी-20 सामन्यांची ही स्पर्धा येत्या 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत श्रीलंकेत होणार होती. मात्र, आता ती अन्यत्र हलवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. श्रीलंका सध्या आर्थिक मंदीचा सामना करत … Read more

#BCCI | तीन जागतिक स्पर्धांच्या आयोजनाची तयारी

नवी दिल्ली – बीसीसीआयने आयसीसी आयोजित विश्‍वकरंडक व जागतिक स्पर्धा अशा आगामी तीन स्पर्धांच्या आयोजनाची तयारी दर्शवली असून, त्याचा प्रस्तावही पाठवला आहे. आयसीसीच्या 2024 ते 2031 या कालावधीत आठ वर्षांच्या आराखड्यातील दोन विश्‍वकरंडकांसह तीन जागतिक स्पर्धांसाठी बीसीसीआयने दावेदारी केली आहे. बीसीसीआयच्या ऑनलाइन कार्यकारी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयने 2025 सालची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा, … Read more

Cricket | ॲशेसपेक्षाही जुन्या मालिकेचे पुनरुज्जीवन

नवी दिल्ली : ॲशेस मालिकेच्या आधीपासून खेळवली जाणारी ऑटी करंडक स्पर्धेचे पुनरुज्जीवन होणार आहे. जगातील सर्वात जुनी क्रिकेट मालिका म्हणून ॲशेसकडे पाहिले जाते. ही मालिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवली जाते. पण ॲशेस मालिकेच्या आधीपासून खेळवली जाणारी ही ऑटी करंडक स्पर्धा पुन्हा सुरू होणार आहे. ही स्पर्धा यंदापासून कॅनडा व अमेरिका क्रिकेट मंडळ आयोजित करणार … Read more

राष्ट्रीय कबड्डीचे यजमानपद महाराष्ट्राला

मुंबई –महिलांच्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्‍यपद स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राला मिळाले आहे. पुरुष गटाच्या स्पर्धेचे यजमानपद मात्र, यावेळी उत्तर प्रदेशने मिळवले आहे. भारतीय कबड्डी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण बैठक ऑनलाइन स्वरूपात झाली असून या बैठकीत महाराष्ट्र राज्य कबड्डी महासंघाचे सरकार्यवाह ऍड. आस्वाद पाटील यांनी महाराष्ट्राच्या यजमानपदासाठी सादरीकरण केले. मात्र, गेल्यावर्षी रोहा येथे पुरुषांची वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा … Read more

जपानमध्ये करोना काळातही ऑलिम्पिकचे आयोजन शक्‍य

टोकियो  – जपानमध्ये करोनाचा संसर्ग वाढत असला तरी पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकचे आयोजन सुरक्षितपणे घेण्यास सक्षम आहे, असा ठाम विश्‍वास टोकियोचे गर्व्हनर युरिको कोइके यांनी व्यक्‍त केला आहे. यजमान शहर म्हणून जे-जे काही खेळ होतील, ते साध्य करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टोकियो येथील आयोजीत एका पत्रकार परिषदेत कोइके बोलत होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक … Read more

युएई क्रिकेट बोर्ड मालामाल

नवी दिल्ली – करोना महामारीत आयपीएल स्पर्धा पार पडणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, बीसीसीआयने हे आव्हान स्वीकारत युएईत स्पर्धेचे आयोजन करून ते यशस्वीपणे पार पडले. यावेळी बीसीसीआयच्या मदतीला आलेल्या युएई बोर्डाला मोठा आर्थिक लाभ मिळाला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने आयपीएल-2020चे आयोजन करणाऱ्या ईसीबीला सुमारे 100 कोटी रुपये (14 लाख अमेरिकन डॉलर) … Read more

आयसीसी करणार सुपर लीगचे आयोजन

दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वर्ल्ड कप सुपर लीग सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या लीग अंतर्गत खेळवण्यात येणारे सामने हे 2023 मध्ये भारतात होणाऱ्या क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील पात्रता सामने असतील. यजमान भारत आणि सुपर लीगमधील अव्वल सात संघ यांना विश्‍वचषक स्पर्धेत स्थान मिळणार आहे. आयर्लंड आणि विश्‍वविजेते इंग्लंड यांच्यातील सामन्याने या लीगला … Read more