पुणे | अल्पसंख्याक मुलींसाठीच्या वसतिगृहांना व्यवस्थापन निधी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये वसतिगृह बांधण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. वसतिगृहात नियुक्त करण्यात येणारा कर्मचारी वर्ग, वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शुल्क आकारणी आणि वसतिगृहाच्या व्यवस्थापनासाठी आठ लाख रुपये वार्षिक अनुदान निश्चित करण्यात आले आहे. शासन निर्णयान्वये ज्या वसतिगृहांची प्रवेशक्षमता ३०, ६० व १०० इतकी … Read more

नगर | नगरसेवक भास्कर भैलुमे यांचे सहा.समाज कल्याण आयुक्तांना निवेदन

नगर, (प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातून शिक्षणासाठी येणार्‍या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे वसतीगृहाची इमारत होणे गरजेचे आहे. सदर जागा कर्जत शहराजवळ असून, गेली अनेक वर्षे निधी पडून आहे. कर्जत शहराची विकास योजना तयार करतांना जोगेश्वरवाडी येथील गट नं.१८१, प्लॉट नं.६२ या जागेवर सामाजिक न्याय विभाग राज्य शासन हे आरक्षण टाकण्यात यावे. अन्यथा … Read more

पुणे : ताराचंद रुग्णालयातील विद्यार्थींनींच्या वसतिगृहास आग

पुणे : शहरातील ताराचंद रुग्णालयामधील विद्यार्थीनींचे असलेले वसतिगृहात आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन मुख्यालय व कसबा अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली. सदर घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, तळमजला अधिक तीन मजले असलेल्या वसतिगृहात पहिल्या मजल्यावर खोली क्रमांक चारमध्ये आग लागली आहे. जवानांनी प्रथम विद्यार्थीनी सुरक्षित आहेत … Read more

धक्कादायक! पंजाबमध्ये आठ विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न; खासगी व्हिडीओ लीक झाल्याने उचलले टोकाचे पाऊल

नवी दिल्ली : पंजाबमधील चंदीगड विद्यापीठात एक धक्कादायक घटना घडली आहे. विद्यापीठातील विद्यार्थिनींचे खासगी व्हिडीओ लीक झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर येथील विद्यार्थिनींनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाआहे. दरम्यान, या प्रकरणातील दोषींवर कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात येत आहे. विद्यापीठातील वसतीगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीनेच हे व्हिडीओ लीक केल्याचा आरोप केला जात आहे. या … Read more

सर्व समुदायासाठी सर्वात मोठे वसतिगृह उभारणार – अजित पवार

नाशिक – (जिमाका वृत्तसेवा) : वांद्रे येथील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या तीन एकर जागेत सर्व समुदायांसाठी राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह मुंबईत उभारणार असून, या वसतिगृहात सारथी, महाज्योती व आर्थिक दुर्बल घटक व सर्व जाती, धर्माच्या समुदायातील मुला-मुलींना प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत स्व. यशवंतराव चव्हाण … Read more

जयसिंगपूर येथे वसतीगृह उभारणीला मान्यता; 14 कोटी 71 लाखाचा निधी मंजूर

कोल्हापूर – अनुसूचित जाती नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथे वसतीगृह उभारण्यासाठी १४ कोटी ७१ लाख ३५ हजार २२४ रुपये इतक्या रकमेला मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे. शिरोळ तालुक्यातील मौजे आगर येथे अनुसूचित जाती, नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी मुलांचे स्वतंत्र अद्ययावत वसतीगृह व्हावे, याबाबतची मागणी सामाजिक न्याय विभागाकडे सातत्याने … Read more

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सर्व वसतिगृहे लवकरच सुरू होण्याची चिन्हे, उच्च व तंत्र शिक्षण विभाग सकारात्मक

पुणे – करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू झाली. त्याचप्रमाणे उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत विद्यापीठ व महाविद्यालयांमधील वसतिगृहे सुरू करण्याबाबत आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्व वसतिगृहे लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. जिल्हा प्रशासनाने करोनामुळे महाविद्यालयांची वसतिगृह विलगीकरण कक्षासाठी ताब्यात घेतली होती. अजूनही काही वसतिगृह जिल्हा प्रशासनाकडेच आहेत. परिणामी दिवाळीपूर्वी काही दिवस … Read more

आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेच्या वसतिगृहाचे भूमिपूजन

आळंदी – वारकरी शिक्षण संस्थेस राज्य शासनाने वसतिगृह इमारत बांधकाम व विविध सुविधा निर्माण करण्यासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या निधीतून विकसित होत असलेल्या वसतिगृह इमारत बांधकामाचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, वारकरी शिक्षण संस्थेचे खजिनदार भालचंद्र नलावडे, सचिव नाना महाराज … Read more

मराठा विद्यार्थ्यांसाठी १४ ठिकाणी वसतिगृहे सज्ज

मुंबई : मराठा समाजाच्या जवळपास सर्व मागण्यांची पूर्तता होत आली असून मराठा उमेदवारांच्या शासन सेवेतील नियुक्त्यांबाबत शासन निर्णय काढण्यात आले आहेत. तसेच उर्वरित प्रलंबित विषयांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांसाठी 14 ठिकाणी वसतिगृहे तयार असून स्थानिक पालकमंत्र्यांच्या हस्ते लवकरच त्यांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा  आरक्षण … Read more

अहमदनगर येथे अल्पसंख्याक विद्यार्थीनींसाठी 100 प्रवेश क्षमतेचे वसतिगृह बांधण्यास मान्यता

मुंबई : अल्पसंख्याक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींकरिता अहमदनगर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात १०० प्रवेश क्षमतेचे वसतिगृह बांधण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय प्रक्रियेची पूर्तता करून या वसतीगृहाच्या बांधकामास सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. अल्पसंख्याक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, … Read more