पुणे जिल्हा | गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदानासाठी प्रोत्साहित करावे

वाघोली, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण सोसायट्या असून तेथील मतदारांची संख्या अधिक आहे. शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने रहिवासी सोसायट्यांमध्ये पदाधिकार्‍यांनी विविध उपक्रम राबवत सभासदांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्राद्वारे केले आहे. जिल्ह्यातील पुणे, शिरुर व मावळ लोकसभा मतदार संघात येत्या 13 मे … Read more

PUNE: गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारीसाठी व्यासपीठ

पुणे – राज्यभरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या (सोसायटी) सदस्यांच्या तक्रारी ऑनलाइन माध्यमातून सोडविण्यासाठी सहकार संवाद संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून सोसायटीशी निगडित सर्व समस्यांबाबत रहिवाशांना घरबसल्या तक्रार नोंदविता येणार आहे. या संकेतस्थळावर आलेल्या तक्रारी दोन महिन्यात निकाली काढण्याच्या सूचना सहकार विभागाने सर्व जिल्हा निबंधकांना दिल्या आहेत. राज्यात सुमारे एक लाख पंधरा हजार नोंदणीकृत … Read more

सोसायटी स्वयंपुनर्विकास प्रकल्पाला तीन महिन्यांत मंजुरी

पुणे – सोसायट्यांच्या स्वयंपुनर्विकासामध्ये गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. याचाच एक भाग म्हणून सोसायट्यांच्या स्वयंपुनर्विकासाचा प्रस्ताव एक खिडकी योजना राबविण्यात येणार असून प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत प्रकल्पास मंजुरी देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. तसेच वित्तीय पुरवठा व मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सहकारी बॅंकेला नोडल एजन्सी म्हणून नेमण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. … Read more

पाण्यासाठी हाउसिंग सोसायट्यांनी ठोठावले न्यायालयाचे दार

पिंपरी – भरपूर पाऊस असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांवर आता पिण्याच्या पाण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची वेळ आली आहे. अनेक निवेदने देऊन बैठकांमध्ये अधिकाऱ्यांसोबत चर्चा करूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातील विविध 11 संघटनांनी एकत्र येत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेसह नऊ शासकीय यंत्रणांना प्रतिवादी … Read more

राज्यातील 13 हजार गृहनिर्माण संस्थांचे डीम्ड कन्व्हेअन्स : बाळासाहेब पाटील

मुंबई  – राज्यातील गृहनिर्माण संस्थांचे मानिव अभिहस्तांतरणासाठी (डीम्ड कन्व्हेअन्स) लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. या प्रक्रियेत सुसूत्रता आणली असून 13 हजार 655 अर्जांवर कार्यवाही करुन प्रमाणपत्र देण्यात आले आहे, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. सदस्य संजय पोतनिस यांनी राज्यातील गृहनिर्माण संस्थांची मानिव अभिहस्तांतरण प्रकरणी प्रलंबित असल्याबाबत प्रश्न विचारला होता. त्याच्या लेखी … Read more