ICC Rankings : कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाकडून Team India ला मोठा धक्का; टी-20 आणि वनडेमध्ये मात्र वर्चस्व कायम..

 ICC Rankings : आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. खरं तर, भारताला मागे टाकत ऑस्ट्रेलियन संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. मात्र, वनडे आणि टी-20 क्रमवारीत भारतीय संघाचे वर्चस्व कायम आहे. आयसीसी वनडे आणि टी-20 क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानावर कायम आहे, पण कांगारूंनी टेस्ट फॉरमॅटमध्ये भारताला मोठा धक्का दिला … Read more

ICC Rankings : टीम इंडियाने रचला इतिहास, तिन्ही फॉरमॅटसह WTC मध्ये केली ‘ही’ कामगिरी…

India ICC Ranking in All Format : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला 4-1 अशा विजयाचा फायदा झाला आहे. या विजयासह रोहित शर्माचा संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. टीम इंडिया आधीच टी-20 आणि वनडेमध्ये अव्वल होती. अशाप्रकारे भारत एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनला आहे. डिसेंबरमध्येही असंच घडलं होतं… यापूर्वी डिसेंबरमध्येही टीम इंडियाने … Read more

ICC Test Rankings : जैस्वालची ‘यशस्वी’ झेप..! प्रथमच टॉप-10 मध्ये मिळवले स्थान, कोहलीला न खेळताही झाला फायदा…

ICC Test Rankings & Yashasvi Jaiswal : भारताचा युवा फलंदाज आणि सलामीवीर यशस्वी जैस्वालने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) कसोटी क्रमवारीत टॉप-10 मध्ये प्रवेश केला आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत बॅटने अनेक शानदार खेळी केल्यानंतर जयस्वालला बंपर फायदा झाला आहे. या मालिकेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या चार कसोटी सामन्यांमध्ये द्विशतकासह 655 धावा … Read more

ICC Test Rankings : क्रमवारीत जसप्रीत बुमराहची बादशाहत कायम, अन्य दोन भारतीय गोलंदाजांचाही टाॅप 10 मध्ये समावेश..

MEN’S ICC TEST BOWLING RANKINGS : जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटीत खेळला नव्हता. वास्तविक या वेगवान गोलंदाजाला विश्रांती देण्यात आली होती. मात्र जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah ) आयसीसी कसोटी क्रमवारीत कोणताही फरक पडलेला नाही. आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. त्यानुसार जसप्रीत बुमराह आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. जसप्रीत बुमराह 867 … Read more

ICC Test Rankings : केपटाऊन कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवूनही टीम इंडियाचं मोठं नुकसान, क्रमावारीत गमावलं…

ICC Test Rankings, Indian Cricket Team : भारतीय संघाने केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेटने पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला होता. टीम इंडियाने केपटाऊनमध्ये पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकला. मात्र या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक विजयानंतरही टीम इंडिया आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम राहू शकली नाही. सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं अव्वल स्थान पटकावलं आहे. … Read more

ICC ODI Rankings : क्रमवारीत विराटची एका स्थानाने घसरण, तर रोहित शर्मा…..

दुबई – आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत भारताचा मुख्य फलंदाज विराट कोहलीची एका स्थानाने घसरण झाली आहे. कर्णधार रोहित शर्माला मात्र, लाभ झाला असून त्याने सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. ही क्रमवारी विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारत विरूध्द बांगलादेश सामन्याच्या आधी जाहीर करण्यात आली आहे. कोहली सातव्या क्रमांकावरून संयुक्‍तरिक्‍या आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या नावावर … Read more

ICC rankings : कोहली, रोहित व बुमराहचे स्थान कायम

दुबई – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व हिटमॅन रोहित शर्मा यांनी फलंदाजांच्या क्रमवारीतील तसेच जसप्रीत बुमराहने गोलंदाजांच्या क्रमवारीतील आपले स्थान कायम राखले आहे. आयसीसीने गुरुवारी एकदिवसीय सामन्यांची क्रमवारी जाहीर केली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत कोहली 871 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम राहिला आहे. अर्थात त्याला रोहित (855) तर पाकचा बाबर आझम (829) यांचे आव्हान राहणार आहे. … Read more