Gold Silver Price : इस्राइल पॅलेस्टाईन युद्धाचा भारतावर परिणाम; सोने पुन्हा झाले महाग, वाचा आजचे दर

Gold Silver Price : इस्रायल आणि हमास यांच्यात जोरदार युद्ध सुरू आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायली सुरक्षा दल हमासला चोख प्रत्युत्तर देत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु झालेल्या या युद्धाचा फटका आता भारताला देखील बसत असल्याचे दिसत आहे.  कारण  आणि इस्राइल -हमास यांच्यातील संघर्षामुळे सोन्याचे भाव वाढले आहेत. देशात आता सणासुदीचे दिवस सुरु होणार आहेत. त्यातच आज … Read more

पृथ्वीच्या अंतरंगावरही क्लायमेट चेंजचा परिणाम ; जमिनीत होणाऱ्या बदलामुळे उंच इमारतींना धोका

वॉशिंग्टन : गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक पातळीवरच क्लायमेट चेंज किंवा तापमान वाढीचा विषय जास्त गंभीर बनत चालला आहे. पृथ्वीवरील विविध घटकांना या तापमान वाढीचा फटका बसत असताना आता एका नवीन अभ्यासानुसार पृथ्वीच्या अंतरंगालासुद्धा या क्लायमेट चेंजचा धोका निर्माण झाला आहे. हवामानातील बदलामुळे आणि तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागल्याने पृथ्वीच्या गाभ्यातही बदल होऊ लागले आहेत. … Read more

‘वरंधा’ बंद; कोकणात जाणाऱ्यांचे हाल; वाहतूकच ठप्प झाल्याने व्यवहारांवर परिणाम

विलास मादगुडे हिरडस मावळ  – वरंधा घाट सुरक्षिततेसाठी बंद केला मान्य आहे,पण या मार्गावर असणाऱ्या गावांतील विद्यार्थी, नागरिक, रुग्ण, बाजारहाट यासाठी प्रशासनाने काय सुविधा केल्या आहेत, हा प्रश्‍न आहे. महामंडळाच्या एसटी बस, खाजगी वाहने बंद झाली. दळणवळणच ठप्प झाले आहे. प्रशासनाने कमीत कमी हलक्‍या वाहनांची बंदी उठवावी, अशी मागणी प्रवासी, नागरिक करीत आहेत. भोर-महाड मार्ग … Read more

केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे सहकारावर परिणाम :दिलीप वळसे पाटील

घोडेगाव सहकारी संस्थेची शताब्दी मंचर – केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुढील काळात सहकारावर मोठा परिणाम होणार आहे. यात छोट्या बॅंका, सहकारी संस्था टिकवणे हे मोठे आव्हान आहे, असे मत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला शंभर वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील … Read more

बंडखोरांना मदत करून प्रभाव टाकण्याचा प्रयत्न

मणिपूरमध्ये कॉंग्रेसचा आरोप नवी दिल्ली – मणिपूरमध्ये बंदी घातलेल्या बंडखोरांच्या गटाला 17 कोटी रुपयांची मदत करून भाजपकडून आदर्श आचार संहितेचा भंग केला जात आहे, असा आरोप कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. मणिपूरच्या विधानसभेच्या निवडणूकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान 28 मार्च रोजी झाले आहे आणि दुसऱ्या टप्प्यात 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. मणिपूरमधील कुकी बंडखोरांच्या संघटनेला … Read more

पुणे! इंधन दरवाढीची सामान्यांच्या खिशाला झळ; प्रवासी, मालवाहतुकीवरही परिणाम

* प्रवासी, मालवाहतुकीवरही परिणाम * आगामी काळात वाहतुकीचे दर वाढण्याची शक्‍यता पुणे – मागील काही दिवसांपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. याची झळ सामान्यांच्या खिशाला बसत आहे. इतकेच नव्हे तर, याचा परिणाम प्रवासी आणि मालवाहतुकीवर होतो. परिणामी आगामीकाळात वाहतुकीचे दर वाढण्याची शक्‍यता आहे. मागील वर्षापासून करोनामुळे लागू केलेल्या निर्बंधांमुळे विविध क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. … Read more

भारत बंदमुळे ‘या’ परीक्षा झाल्या रद्द ;परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकरी संघटनांनी मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक दिली. आज सर्वत्र बंद पाळला जात असल्याने अनेक शिक्षण क्षेत्रातही परिणाम झाले आहे. अनेक विद्यापीठांनी आज होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. देशपातळीवरील काही परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, रद्द करण्यात आलेल्या परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. भारत बंदमुळे अनेक … Read more

वाहनांच्या निर्यातीवर झाला परिणाम

मुंबई – लॉकडाऊनमुळे पुरवठा साखळी खंडित झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या देशांतर्गत विक्रीबरोबरच निर्यातीवर 75 टेक्‍क्‍ परिणाम झाला. एप्रिल ते जून या तिमाहीत वाहन उत्पादकांनी केवळ 43 हजार 748 वाहनांची निर्यात केली. गेल्या वर्षी या तिमाहीमध्ये 1 लाख 73 हजार इतकी वाहने निर्यात केली होती. या तीन महिन्यांमध्ये कंपन्यांच्या उत्पादनावर, त्याचबरोबर देशांतर्गत वाहतुकीवर परिणाम झाला होता. … Read more

अर्थव्यवस्थेवर सुरू झालेला करोनाचा प्रभाव ओसरला?

अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांत ग्रीन शुट्‌स दृष्टिपथात नवी दिल्ली :- मार्चपासून करोनाचा अर्थव्यवस्थेवर सुरू झालेला परिणाम आता संपुष्टात आला असून विविध क्षेत्रांतील उत्पादकता वाढू लागली आहे. लवकरच पूर्ण अर्थव्यवस्था रुळावर येईल, असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. आर्थिक व्यवहार विभागाने स्थूल अर्थव्यवस्थेवरील अहवालात म्हटले आहे की, लॉकडाऊन अंशतः कमी केल्यानंतर मे आणि जून महिन्यामध्ये वीज उत्पादन आणि त्याचा … Read more

हात पिवळे करून दोनाचे चार नाही तर….सुरक्षित अंतर ठेवण्याचे आले दिवस

-शंकर दुपारगुडे पुणे – विवाह सोहळा म्हणजे प्रत्येकांच्या जीवनातील आनंदाचा क्षण. भारतीय संस्कृतीतील सोळा संस्कारापैकी एक विवाह संस्कार म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय पर्वणी असते. रंगीबेरंगी सजावट फुले, माळा, नातेवाईकांचा गोतावळा, लहान मुलांची किलबिल, मेंहदी, मेकअप, आकर्षक कपड्याचा बस्ता, सनई चौघडे आणि डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई, पाहुणचार, मानपान विविध पदार्थांच्या जेवणावळी अशी तीन ते चार दिवस … Read more