‘सगळ्यांसाठीच रोजी-रोटी महत्वाची असते’; सिध्दूंबाबत प्रश्‍नाला चरणजितसिंग चन्नी यांचे उत्तर

जालंधर – पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी जालंधर लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. तर कॉंग्रेसचे आणखी एक बडे नेते आणि माजी मंत्री नवज्योत सिंग सिध्दू मात्र प्रचारापासून लांब आहेत. कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेले सिध्दू सध्या आयपीएची कॉमेंट्री करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांनी यावेळी कोणाचाच प्रचार केला नाही. त्याच अनुशंगाने सिध्दू यांची … Read more

पुणे जिल्हा | हिवतापमुक्त देशासाठी जागरुकता महत्त्वाची

लोणी काळभोर, (वार्ताहर) – हिवतापाविरुद्धच्या आपल्या सामुहिक लढाईत आणि वर्ष 2030पर्यंत देशाला संपूर्णपणे हिवतापमुक्त करण्याचे आपले ध्येय साध्य करण्यात केवळ निदान आणि उपचारच नव्हे; तर स्वतःची आणि आपल्या परिसरातील स्वच्छता तसेच हिवताप नियंत्रण आणि प्रतिबंध याबाबतची सामाजिक जागरुकता तेवढीच महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी केले. … Read more

गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात कोणते मुद्दे महत्वाचे? वाचा

Gadchiroli Chimur Lok Sabha ।

 Gadchiroli Chimur Lok Sabha ।  गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ. इथून भाजपनं विद्यमान खासदार अशोक नेते यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसकडून डॉ. नामदेव किरसान यांचं आव्हान आहे. या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत होणार हे स्पष्ट झालंय. मात्र याठिकाणी कितीही निवडणुका झाल्या तरी याठिकाणचे काही प्रश्न हे कायम तसेच राहताना दिसून … Read more

Resort Politics : सरकारला पाडण्यासाठी आणि वाचवण्यासाठी महत्वाचं आहे ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’: कशापद्धतीने काम होते या सिस्टीममध्ये ? वाचा संपूर्ण माहिती

Resort Politics : झारखंडमध्ये हेमंत सोरेनच्या अटकेनंतर रिसॉर्ट पॉलिटिक्सचा देशात पुन्हा एकदा खेळ सुरु झाला आहे.  ‘ऑपरेशन लोटस’च्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि जेएमएम सरकारने त्यांच्या सुमारे 35 आमदारांना हैदराबादला सुरक्षित ठिकाणी हलवले होते. तेलंगणाच्या मंत्री पूनम प्रभाकर आणि काँग्रेस सरचिटणीस दीपा दासमुन्शी यांच्या देखरेखीखाली सर्व आमदार एका रिसॉर्टमध्ये थांबले. झारखंडमधील प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता … Read more

Budget Session 2024 : मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामाचा लेखाजोखा ; राम मंदिर निर्माण, तिहेरी तलाक, अनुच्छेद ३७०, वाचा राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे

Budget Session 2024 : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्याआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करत मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षातील कामांचा लेखाजोखा मांडला. यावेळी राष्ट्रपतींनी, गेले वर्ष भारतासाठी ऐतिहासिक कामगिरीने भरलेले आहे. सरकारने सुधारणा, कार्यप्रदर्शन आणि परिवर्तनाची आपली वचनबद्धता सुरू ठेवली आहे.” असल्याचे म्हणत मोदी सरकारच्या १० वर्षांच्या कामगिरीचा … Read more

पुणे जिल्हा : पालकांची सकारात्मक भूमिका महत्वाची

बारामती : माणुसच परिस्थिती बनवतो आणि बिघडवतो. त्यामुळे परिस्थितीला दोष देऊ नका. संकटे, अडथळे आणि अडचणी या तुमच्यातील कौशल्य बाहेर काढतात. चांगली मूर्ती बनायची असेल तर घणाचे घाव सोसावेच लागतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी केले. इंदापूर येथील डॉ. कदम गुरुकुल कॅम्पसमधील १७२९ आचार्य अॅकॅडमीच्या ‘गरुडझेप यशाची’ कार्यक्रमात ते बोलत होते. … Read more

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; प्रकृतीबाबत महत्वाची माहिती समोर

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सोनिया गांधी याना सौम्य तापाची लक्षणे दिसून आल्याने त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी या सध्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. Congress Parliamentary Party Chairperson Sonia … Read more

पुणे : देशाच्या प्रगतीसाठी नीती, नियत आणि निष्ठा महत्त्वाची ; पंतप्रधान नरेंद्र मोदी 

पुणे, पिंपरी चिंचवड मनपा, “पीएमआरडीए’च्या प्रकल्पांसह मेट्रोचे लोकार्पण कर्नाटक, राजस्थानमधील कॉंग्रेस सरकारवर टीका पुणे – “महाराष्ट्राचा आणि पर्यायाने पुण्याचा विकास होत आहे. त्या तुलनेत कर्नाटकातील बंगळुरू मोठे आयटी हब असूनही तितका विकास होऊ शकला नाही. कर्नाटकात चुकीच्या घोषणा करून सत्ता बनविण्यात आली. एखादा पक्ष आपल्या स्वार्थासाठी सरकारची तिजोरी रिकामी करतो, त्याचे नुकसान राज्यातील जनतेला भोगावे … Read more

​सीएसआर निधी समाजातील योग्य घटकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे – चंद्रकांतदादा पाटील

 डॉ. संजय कुलकर्णी व जोत्स्ना कुलकर्णी यांच्या​ जागतिक दर्जाच्या सुविधा असणाऱ्या​ युरोलॉजी ​हॉस्पिटलचे​ पाटील यांच्या हस्ते उद्घाटन किडनी व मूत्रमार्गातील विकारांसाठीच्या सर्व चिकित्सा व शस्त्रक्रिया आता एकाच छताखाली होणे शक्य पुणे : ​व्यावसायिक​ संस्थांकडे आज ​मोठ्या प्रमाणात सीएसआर निधी​ उपलब्ध​ आहे, मात्र तो कसा व कोठे खर्च करायचा याची कल्पना त्यांना नसते. त्यामुळे हा निधी … Read more

क्षयरोग निर्मूलनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा

    प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 -नियोजन, अंमलबजावणी, संनियंत्रण, पाठपुराव्याद्वारे क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे गाव पातळीपर्यंत विकेंद्रीकरण करून या कार्यक्रमात लोकसहभाग घेण्याचे आवाहन राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले. येथील क्षयरोग अंमलबजावणी कक्षाचे (वॉर रुम) उद्‌घाटन डॉ. रामास्वामी एन. यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन आंबाडेकर, सहसंचालक डॉ. रामजी … Read more