Karnataka : कांतारा पाहताना हृदयविकाराच्या झटक्‍याने एकाचा मृत्यू

मंड्या – ऋषभ शेट्टीचा कांतारा (Kantara) हा कन्नड चित्रपट भाषेचा कोणताही अडथळा न येता देशभरात सध्या जोरात व्यवसाय करतो आहे. कोणताही मोठा कलाकार नसतानाही कांतारा सुपरहिट झाला असून नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या मार्गावर आहे. असे असतानाच हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकाचा चित्रपटगृहात हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाल्याची घटना मंड्या जिल्ह्यात घडली आहे. राजशेखर असे मरण … Read more

कर्नाटकमध्ये भाजपला राज्यसभेच्या 3 जागा चौथी जागा कॉंग्रेसच्या हाती

बंगळुरू – कर्नाटकमधील सत्तारूढ भाजपने राज्यसभेच्या 4 पैकी 3 जागा खिशात घातल्या. तर, चौथी जागा कॉंग्रेसच्या हाती आली. मात्र, जेडीएसच्या पदरी साफ निराशा आली. कर्नाटकमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या 4 जागांसाठी 6 उमेदवार रिंगणात होते. भाजपने 3 तर कॉंग्रेसने 2 उमेदवार दिले. जेडीएसने 1 उमेदवार रिंगणात उतरवला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अभिनेते जग्गेश आणि आमदार लहरसिंह … Read more

कर्नाटकमध्ये रेंगाळला मान्सून; राज्यात पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व सरी

मुंबई, – अरबी समुद्राच्या बाजूने मान्सूनने 29 मे रोजीच केरळात प्रवेश केला. त्यानंतर 31 मे रोजी मान्सून कर्नाटकच्या कारवारपर्यंत पोहोचला. पण अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या महाराष्ट्रातील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मान्सून कर्नाटकच्या कारवारमध्येच रेंगाळला आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असल्याने लगतच्या बहुतांश भागांत मान्सूनने प्रवेश केला … Read more

कर्नाटकात धर्मांतर बंदी कायद्याचा अध्यादेश लागू

बेंगळूरू – कर्नाटकात धर्मांतर बंदी लागू करणारा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. कर्नाटक प्रोटेक्‍शन ऑफ राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन या नावाचे विधेयक गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विधानसभेने मंजूर केले होते. मात्र, ते विधान परिषदेत मंजूर होण्यासाठी प्रलंबित आहे, विधान परिषदेत सत्ताधारी भाजपचे संख्याबळ बहुमतासाठी कमी आहे. त्यामुळे तेथे हे विधेयक अद्याप मंजूर होऊ शकलेले नाही. … Read more

कर्नाटकांत ख्रिस्ती धर्मियांवरील हल्ल्यात वाढ

बंगळुरू- धर्मांतर बंदी कायदा राज्यात सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने लागू केल्यानंतर ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ख्रिश्‍चन समाजावरील हल्ल्यांच्या घटनांत वाढ झाली असल्याचे निरीक्षण अनेक सामजिक संघटनांनी केलेल्या सत्यशोधन अहवालात मांडण्यात आले आहे. या वर्षाच्या पहिल्या 271 दिवसांत केवळ 27 घटना नोंदवण्यात आल्या होत्या पण ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबर या दीड महिन्याच्या काळांत अशा पाच घटना … Read more

Breaking : भारतातील ‘या’ शहरात दक्षिण आफ्रिकेतील दोन नागरिक आढळले पॉझिटिव्ह

बंगळूर – कर्नाटकमध्ये दाखल दक्षिण आफ्रिकेतील दोन नागरिकांना करोनाबाधा झाल्याचे समोर आले. त्यांना करोनाच्या नेमक्‍या कुठल्या प्रकाराची बाधा झाली ते अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. दक्षिण आफ्रिकेत करोनाचा ओमिक्रॉन हा नवा अवतार आढळल्याने संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. अशात कर्नाटकमधून धोक्‍याची घंटा वाजवणारी बातमी आली. कर्नाटकच्या बंगळूरमध्ये 1 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत दक्षिण आफ्रिकेतून 94 … Read more

आता कर्नाटकात आरटीपीसीआर चाचणीतून शिथिलता; बेळगाव प्रशासनाचा प्रवाशांना दिलासा

बेळगाव,- कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी करोनाच्या आरटीपीसीआर चाचणीची सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विजयादशमीच्या दिवशी म्हैसूर येथे होणारा शाही दसरा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्नाटक राज्यात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला होता. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. त्यासाठी पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी … Read more

कर्नाटकात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कॉंग्रेस जाहीर करणार नाही

नवी दिल्ली  – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणार नाही असे केंद्रीय कॉंग्रेस नेतृत्वाने कर्नाटकातील कॉंग्रेस नेत्यांना स्पष्ट केले आहे असे सांगण्यात येत आहे. कर्नाटक विधीमंडळातील कॉंग्रेस पक्षाचे नेते सिद्धरामैय्या आणि प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी काल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही बाब स्पष्ट केल्याचे … Read more

कर्नाटकात नेतृत्व बदल नाही; मुख्यमंत्री येडियुरप्पांना अभय

बंगळुरू – गेले काही दिवस कर्नाटकात भाजप नेतृत्व बदल करणार अशी चर्चा होती. पण भाजपने त्यांना अभय दिल्याची चर्चा असून ते आपली उर्वरित टर्म पूर्ण करतील अशी स्पष्ट ग्वाही कर्नाटक प्रदेश भाजपचे अध्यक्ष नलिनकुमार कतील यांनी आज दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाहीर वक्तव्य देणारे पर्यटन मंत्री सी. पी. योगीश्‍वर यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला … Read more