सातारा । राज्यात आले पाच लाख कोटींचे उद्योग

मेढा – महाराष्ट्रातील उद्योग बाहेर पळाले म्हणणारांच्या काळात राज्यात काय झाले हे वेगळे सांगायची गरज नाही. पण आमचे सरकार विकासाभिमुख असून राज्यात पाच लाख कोटींचे उद्योग आले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मुनावळे येथील आतंरराष्ट्रीय दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ … Read more

राज्यात नसबंदीमध्ये महिलाच पुढे ! यंदा 23 टक्के महिलांची, तर केवळ दोन टक्के पुरुषांची शस्त्रक्रिया

  पुणे, दि. 19 -राज्यात गेल्या पाच वर्षांमध्ये नसबंदीचे प्रमाण घटले असले तरी ज्या नसबंदी झाल्या आहेत, त्यात पुरुषांपेक्षा महिलांचीच संख्या जास्त आहे. नसबंदीची आकडेवारी पाहिल्यास पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा अजूनही असल्याचे दिसून येते. यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत महिलांच्या नसबंदीचे प्रमाण 23 टक्के, तर पुरुषांच्या नसबंदीचे प्रमाण केवळ 2 टक्के इतके आहे. ही आकडेवारी … Read more

वाढत्या तापमानामुळे पाणीसाठ्यात सतत घट; राज्यावर पाणीटंचाईचेही संकट

मुंबई – राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण आहेत. अशात राज्यावर पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. सतत वाढणाऱ्या विक्रमी उष्णतेमुळे धरणांतील 27 टक्के पाणीसाठी आटला आहे. यामुळे नागरिकांना वापरासाठी आता केवळ 44 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईतील धरणांमध्ये 27 टक्के, तर ठाणे जिल्ह्यातील धरणांमध्ये 45 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत्या तापमानामुळे पाणीसाठ्यात सतत घट … Read more

राज्यातील पाच नद्यांच्या संवर्धनासाठी 1182.86 कोटी मंजूर

मुंबई – राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कृष्णा, पंचगंगा, गोदावरी, तापी आणि मुळा मुठा या नद्यांच्या संवर्धनासाठी, एकूण 1182.86 कोटी रुपये खर्चाचे प्रदूषण कमी करणारे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी केंद्राचा हिस्सा म्हणून 208.95 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. तसेच, कराड, सांगली, कोल्हापूर, नांदेड, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि प्रकाशा या शहरांमध्ये आतापर्यंत … Read more

राज्यात आता कौशल्य विकासासाठी जागतिक बॅंकेचे सहकार्य

मुंबई : राज्यात कौशल्य वृद्धीसाठी आवश्‍यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्थांच्या सहकार्याने ज्ञान आदान-प्रदान, अनुभव आणि उपक्रम यांच्या माध्यमातून उद्योजकता आणि नाविन्यतेच्या वृद्धीसाठी जागतिक बॅंकेच्या सहकार्याने महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प (महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्‍ट -चडऊझ) राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे … Read more

सगळ्यांच राज्यातील ओबीसी आरक्षण जाईल; वडेट्टीवार यांनी व्यक्त केली भीती

मुंबई – सहा राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे. केंद्र सरकारने एक पाऊल टाकून सरसकट 27 टक्के आरक्षण दिले तर प्रश्न सुटू शकतो. पंतप्रधान महोदय आम्हाला न्याय द्या ही मागणी ही आम्ही करणार आहोत. इम्पिरिकल डेटा कोरोना असल्याने गोळा करता आला नाही. करोना काळात माणसे वाचविणे गरजेचे होते. 2 वर्ष जग थांबले होते. अशावेळी … Read more

राज्यातील शाळा बंद राहणार : राजेश टोपे

मुंबई – राज्यातील मोठया शहरांसह ग्रामीण भागातही करोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत राज्यातील निर्बंध उठण्याची शक्‍यता नाही. करोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण आणि निर्बंध गरजेचे आहेत. सध्या करोनाचा संसर्ग कमी करण्याला राज्याचे प्राधान्य आहे. राज्यातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शाळा चालू करण्यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील … Read more

राज्यात 10 हजार किमीचे रस्ते बांधणार; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर – राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 10 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याबाबतचा सरकारी निर्णय जारी करण्यात आला आहे.अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 15 डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. अर्थमंत्री अजित पवार यांनी 2020-21 च्या अर्थसंकल्पीय भाषणात ग्रामसडक विकास … Read more

राज्यात 33,470 नवीन रुग्णांची नोंद

मुंबई  – संपूर्ण जगासह देशात करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने धाकधुक वाढवली आहे. सध्या राज्यातही करोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 33 हजार 470 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 29 हजार 671 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून करोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. दुसरीकडे … Read more

राज्यात 26,538 नवे करोनाबाधित

मुंबई – राज्यात आज दिवसभरात तब्बल 26 हजार 538 नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातल्या ऍक्‍टिव्ह करोनाबाधिताचा आकडा आता 87 हजार 505वर पोहोचला आहे. त्यासोबतच राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण बाधितांचा आकडा देखील तब्बल 797वर गेल्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात वाढ झालेल्या बाधितांमुळे आजपर्यंत राज्यात आढळलेल्या एकूण बाधितांचा … Read more