राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद; ऑनलाइन परिक्षा घेण्याची मुभा

मुंबई, दि. 5 – करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शाळांपाठोपाठ आता राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ, महाविद्यालयेही 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मात्र, विद्यापीठ, महाविद्यालयातील परीक्षा या 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय सर्व अभिमत, खासगी विद्यापीठांना सुद्धा लागू होणार आहे. … Read more

Corona Update : राज्यात 12,160 नवीन करोनाबाधीत

मुंबई – राज्यात करोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 12,160 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1748 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात आज 68 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 578 ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली … Read more

राज्यात लोकशाहीला कुलूपबंद करण्याचा प्रयत्न; फडणवीसांची टीका

मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकार लोकशाहीला कुलुपबंद करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्य सरकारच्या चहापानावर विरोधक बहिष्कार टाकणार असल्याचे त्यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. उद्यापासून विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या सरकारच्या परंपरेप्रमाणे जितकी लहानात लहान अधिवेशने घेता येतील, जेवढ्या जास्तीत जास्त चर्चा टाळता … Read more

राज्यात निर्बंध लावण्याची शक्‍यता फेटाळली

जालना – राज्यात सध्या कोणतेही नवीन निर्बंध लावले जाणार नाहीत, असे स्पष्ट मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. तसेच केंद्र सरकारकडून ओमायक्रॉनमुळे 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणाला स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रात उड्डाणाबाबत केंद्र सांगेल त्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी केली जाईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. फ्रंट लाइन वर्कर्सना बूस्टर देण्यासाठी या … Read more

ठाकरे सरकारला मोठं यश; राज्यात 5 हजार कोटींची गुंतवणूक; 9000 जणांना रोजगार मिळणार

मुंबई : दुबई वर्ल्ड एक्स्पोच्या अभूतपूर्व यशानंतर उद्योग विभागाने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा वेग कायम ठेवला असून विविध १२ कंपन्यांसोबत सुमारे ५०५१ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन व विविध कंपन्यांचे उद्योजक यावेळी उपस्थित होते. या निमित्ताने मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० या … Read more

राज्यात दिवसभरात 707 करोनाबाधितांची नोंद; 7 ओमायक्रॉनच्या रुग्णांचा समावेश

मुंबई – राज्यात करोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 707 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 677 रुग्ण करोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 86 हजार 782 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.71 टक्के आहे. यात 7 ओमायक्रॉनच्या रुग्णांचा समावेश आहे. राज्यात आज सात … Read more

राज्यात नोव्हेंबरमध्ये 26 हजार बेरोजगारांना रोजगार : नवाब मलिक

मुंबई – करोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये नोव्हेंबर 2021 मध्ये 26 हजार 93 बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आले, अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात … Read more

Breaking News : दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरियंटने वाढवली चिंता; राज्यात पुन्हा निर्बंध लागू

मुंबई – मागील दीड वर्षाहून अधिक काळ त्रस्त करून सोडलेल्या करोना व्हायरसने मागील काही दिवसांत भारताला आणि महाराष्ट्राला दिलासा दिला होता. अनेक अंदाज वर्तवून देखील करोनाची तिसरी लाट आली नाही. त्यामुळे चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र आता पुन्हा एकदा करोना संसर्ग डोक वर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात नव्याने निर्बंध लागू करण्यात आले आहे. … Read more

राज्यात होणार 15 हजार कोटींची गुंतवणूक; दुबईत अनेक देशांसोबत करार

मुंबई – वर्ल्ड एक्‍स्पो, दुबई या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेत झालेल्या सामंजस्य करारामुळे राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या परिषदेत 25 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आलेली असून 15,260 कोटींची गुंतवणूक राज्यात होणार आहे. या माध्यमातून दहा हजारापेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या सामंजस्य करारात … Read more

आता राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय

मुंबई – महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली. खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. ए. पातूरकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी … Read more